इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांबाबत
Regarding Textbooks Of Class 2nd To Class 8th
Regarding the supply of textbooks for classes 3rd and 4th to 6th under Samagra Shiksha and PM Shree for the academic year 2026-27 as well as free distribution of extra-curricular books to government schools in the state on the occasion of the Diamond Jubilee 2026 of the Board.
shaikshanik varsh २०२६-२७ karita samagr shiksha v pmshri antargat iyatta 3 ri v 4 thi chya 6 visathi pathypustakancha puravatha tasech mandalachya hirak mahotsav 2026 nimitt pathyetar pustakanche rajyatil shasakiy shalanna mofat vitaran karanyababat.
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
दिनांक/०६/२०२६
जा.क.प्राशिर्स/टे-३०३/२०२६/1936640
03 JUN 2026
विषय:- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री व ४ थी च्या ६ वीसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तसेच मंडळाच्या हीरक महोत्सव २०२६ निमित्त पाठ्येतर पुस्तकांचे राज्यातील शासकीय शाळांना मोफत वितरण करण्याबाबत.
संदर्भः-१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दिनांक १६.०४.२०२५
२) राज्यस्तरीय समन्वय समितीचे दिनांक १३.१०.२०२५ रोचीच्या बैठकीचे इतिवृत्त.
३) नियामक मंडळ ठराव क्रमांक ५५९९ दिनांक ०५.०५.२०२६
४) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचे पत्र दि.२६/०५/२०२६
सदर्भ क्रमांक १ अन्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दयावयाची आहेत.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या दिनांक ०५.०५.२०२६ रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या समेत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७करिता राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांना इयत्ता ३ री व ४ थीसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण तसेच इयत्ता ६ वीसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण, कलाशिक्षण ही अनिवार्य पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी प्रत्येकी २ संच उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.
तसेच ‘बालभारती हीरक महोत्सव २०२६० वर्षानिमित्त प्रकाशित केलेले (१) बालभारतीच्या कविता (२) स्फूर्तीगीते (३) ५० किशोर गोष्टी भाग-२ (४) डोके नसलेला माणूस (चित्रकथा) व (५) थोरांची ओळख तसेच (1) माझा पहिला इंग्रजी-मराठी शब्दकोश या सहा पाठ्येतर पुस्तकांचा प्रत्येकी १ संच मंडळामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.
वरील निर्णयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री, ४ थी व ६ वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांना पाठ्बपुस्तकांच्या प्रत्येकी २ प्रती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व इतर माध्यमांसाठी सदरची पाठ्यपुस्तके मंडळाच्या ‘ई-बालभारती
या वेबसाईटवर PDF स्वरूपात प्रकाशित करण्यात येतील, तसेच बालभारती हीरक महोत्सव २०२६० वर्षानिमित्त सहा पाठचेतर पुस्तकांचा प्रत्येकी १ संच मंडळामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्तबाबत आपल्यास्तरावरून सर्व शाळांना अवगत करण्यात याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठवण्यात यावा.
Digitally signed by SHANKARGIRI GOSAVI Date: 03-06-2026 17:43:16
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-०१
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
३. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे -०१
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व
३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी महानगरपालिका, सर्व
४. शिक्षण निरीक्षक दक्षिण, पश्चिम, उत्तर (बृहन्मुंबई)

__________ ALSO READ ________
Regarding Textbooks Of Class 2nd To Class 8th
Regarding textbooks from class 2nd to class 8th
इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांबाबत…
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२१६/एसडी-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई
दिनांक :- २८ जानेवारी, २०२५
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.११६/एसडी-४, दिनांक ०८ मार्च, २०२३
२) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांचे पत्र क्र. ह / भाषा-भाषेतर/६०६०, दिनांक १८.१२.२०२४
प्रस्तावना :-
शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे; या सर्व मुद्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. या शासन निर्णयातील अनु. क्र. ८ मध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष २०२४-२५ पासून सदर योजना पुढे सुरु ठेवावी, असे नमूद करण्यात आले आहे.
संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांनी यासंदर्भात संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की, सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन, ही योजना पुढे सुरु ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करुन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही.
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन, संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय :-
संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.
२. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०१२८१६०१०२४०२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
circular PDF copy link
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन
