School Quality Assessment And Assurance Framework

School Quality Assessment And Assurance Framework

image 134
School Quality Assessment And Assurance Framework

School Quality Assessment And Assurance Framework

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत विकसित केलेल्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) साठी मान्यता देण्याबाबत.


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २८ जानेवारी, २०२५
वाचा :- १
. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रप / संकीर्ण / SQAAF /२०२४/४६९, दि.१९.०१.२०२४
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६, दि.१५.०३.२०२४
३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र राशैसंप्रम/ मूल्यमापन/SQAAF२०२४-२५/००३२१, दि.२३.०१.२०२५
प्रस्तावना :-
संदर्भ क्र.२ येथील दि.१५.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास SQAAF – School Quality Assurance and Accreditation Framework शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदरील शासन निर्णय School Quality Assurance and Accreditation Framework (SQAAF) म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा (SQAAF) या नावाने प्रकाशित करण्यात आला होता. CBSE यांनी SQAAF साठीची एप्रिल, २०२३ मध्ये इंग्रजी व हिंदी माध्यमातून पुस्तिका प्रकाशित केली आहे. CBSE ने पुस्तिका प्रकाशित करताना इंग्रजी माध्यमासाठी School Quality Assessment and Assurance Framework तर हिंदी माध्यमासाठी विद्यालय गुणवत्ता आकलन एवं आश्वासन की रूपरेखा या शब्दावलीचा अवलंब केला आहे. तसेच शिक्षण मंत्रालय (Ministry of Education), भारत सरकार यांनी PARAKH अंतर्गत दि.१३/१२/२०२४ रोजी SQAAF पुस्तिका इंग्रजी माध्यमातून School Quality Assessment and Assurance Framework या नावाने प्रकाशित केलेली आहे. त्यानुसार SQAAF ची प्रकाशित करावयाची मार्गदर्शन पुस्तिका व वाचन साहित्य यामध्ये इंग्रजीतून School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) तर मराठीतून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या शब्दावलीचा अवलंब केला असल्याने दि.१५.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४ / प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SQAAF) नुसार असलेली शब्दावली
इंग्रजीतील शब्दावली: School Quality
Assurance and Accreditation Framework (SQAAF)
मराठीतील शब्दावलीः शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा

आवश्यक असलेली शब्दावली / बदल (च्या ऐवजी खालील बदल करण्यात येत आहे.)
इंग्रजीतील शब्दावली: School Quality
Assessment and Assurance Framework (SQAAF)
मराठीतील शब्दावली: शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२८१५५६३०४८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

circular PDF copy link


(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!