Rashtriya Krida Din
Rashtriya Krida Din
Regarding organizing various sports and fitness activities from 28th to 30th August, 2026 on the occasion of National Sports Day 2026
rashtriya krida din 2026 nimitt di.28 te 30 august, 2026 ya kalavadhit vividh krida v fitness upkramanche aayojan karnyababat
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉ. अनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे
क्र. प्राशिसं/संकीर्ण-८०२/राष्ट्रीय क्रिडा दिन-२०२६/२०२६/
प्रति.
दिनांक /०८/२०२६
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक (उत्तर / दक्षिण / पश्चिम)
४) शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. (सर्व)
विषय - राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त दि.२८ ते ३० ऑगस्ट, २०२६ या कालावधीत विविध क्रीडा व फिटनेस उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत
संदर्भ –
१) मा. आयुक्त, क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. क्रियुसे/राक्रिदि/का.१०/२७२८, दि.२५ ऑगस्ट, २०२६
२) भारतीय खेळ प्राधिकरण (SAI), नवी दिल्ली यांचे दिनांक ०७.०८.२०२६ रोजीचे पत्र.
३) National Sports Day 2026 Standard Operating Procedure.
राष्ट्रीय क्रीडा दिन हा दरवर्षी दिनांक २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. क्रिडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना व निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ हा दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत “Khelega Bharat, Jeetega Bharat” या संकल्पनेखाली साजरा करण्यात येणार आहे.
सदर अभियानांतर्गत “Tribute, Play and Move” या तीन स्तंभांनुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. दिनांक २८ ऑगस्ट २०२६ “TRIBUTE” मेजर ध्यानचंद व भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाला अभिवादन करण्यासाठी
पुढीलपैकी योग्य उपक्रम आयोजित करावेत –
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली/अभिवादन करणे.
विदयार्थ्यांकडून विविध क्रीडा प्रकारांशी संबंधित 29 Challenge” राबविणे,
“Pass the Ball Challenge” आयोजित करणे.
विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये “Sports Bandhan” उपक्रम राबविणे.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू व स्थानिक क्रीडा व्यक्तिमत्वांची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
उपलब्ध डिजिटल साहित्याचा वापर करून राष्ट्रीय क्रीडा दिनाबाबत जनजागृती करणे.
२. दिनांक २९ ऑगस्ट २०२६ “PLAY” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य दिवशी “Ek Ghanta Khel Ke Maidan Mein” या आवाहनानुसार प्रत्येक विदयार्थ्याला किमान एक तास मैदानी खेळ अथवा शारीरिक उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे.
यासाठी – प्रत्येक वर्गासाठी एक खेळ/क्रिडा प्रकार निश्चित करणे.
खो-खो, कबड्डी, लगोरी, पिड्डू यांसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे.
शिक्षक विरुद्ध विदयार्थी मैत्रीपूर्ण सामने आयोजित करणे.
धावणे, रिले रेस, विविध क्रीडा स्पर्धा व साधे शारीरिक उपक्रम आयोजित करणे,
विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी शक्य असल्यास क्रिडा पोशाख परिधान करावा.
मुली, दिव्यांग विदयार्थी तसेच सर्व वयोगटातील विदयार्थ्यांचा समावेशक सहभाग सुनिश्चित करावा.
३. दिनांक ३० ऑगस्ट २०२६ “MOVE” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या समारोपाच्या दिवशी “Sundays on Cycle” विशेष उपक्रमांतर्गत सायकल रॅली/सायकलिंग, वॉकथॉन, रन-अँड-राईड इत्यादी उपक्रम स्थानिक परिस्थितीनुसार आयोजित करावेत. या उपक्रमांमध्ये रस्ता सुरक्षा, हेल्मेटचा वापर व स्थानिक वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.
४. प्रसिद्धी व जनजागृती राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांची माहिती विदद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व समाजामध्ये पोहोचविण्यासाठी उपलब्ध पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया क्रिएटिव्हज व इतर प्रचार साहित्याचा वापर करावा. उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व रील्स उपलब्ध असल्यास #FitIndiaNSD2026, #KhelegaBharatJeetegaBharat, #FitIndia या हॅशटॅगसह प्रसारित करण्यास प्रोत्साहन द्यावे.
५. समन्वय व अहवाल प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित शाळांना याबाबत आवश्यक सूचना देऊन उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी सुनिश्चित करावी. उपक्रमांची नोंद, छायाचित्रे व आवश्यक माहिती संकलित करून संबंधित प्राधिकरणास सादर करण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या उपक्रमांसाठी डिजिटल टूलकिट व अहवाल सादरीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सदर उपक्रम राबवितांना उपलब्ध पायाभूत सुविधा, स्थानिक परिस्थिती व हवामान यांचा विचार करून सुरक्षितता, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, सुलभता व सर्वसमावेशक सहभाग यांची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
राष्ट्रीय क्रिडा दिन २०२६ हा उपक्रम विदयार्थ्यांमध्ये क्रिडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना व निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधितांना देण्यात याव्यात.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar
Date: 26-08-2026 08:37:34
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
Di SHARAD SHANKARGIRI GOSAVI
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सादर
१. मा. आयुक्त, क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. मा. आयुक्त, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
