Earned Leave For Census BLO Duty
Earned Leave For Census BLO Duty
Earned Leave For Teacher For Census And BLO Duty
Janaganana V BLO che rashtriya kartavya karnarya shikshakanchya arjit rajechi nond service bukat karanebabat
Regarding recording of earned leave in the service book of teachers performing national duty of “Census and BLO”
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र.शिसंमा/संकीर्ण/जनणनावबीलएलओ/२०२६/ए-१/विद्या शाखा/प्रति,
दिनांक स्वाक्षरीचे खाली नमूद आहे
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
विषयः- जनगणना व बी.एल.ओ. चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करणेबाबत.
संदर्भः- विजयकुमार गुंड, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर यांचे जा.क्र.४६/२०२६-२७, दिनांक ०८/०९/२०२६ रोजीचे पत्र.
महोदय,
जनगणना व बी.एल.ओ. चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करणेबाबत संदर्भिय पत्र संचालनालयास प्राप्त झाले आहे. (प्रत सलंग्न) सदर निवेदनामध्ये खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
जनगणना व बी.एल.ओ. ची कामे करताना माध्यमिक शिक्षकांनाही त्यांच्या नियमित शैक्षणिक कामकाजाव्यतिरिक्त शासनाने सोपलेले अतिरिक्त राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे लागते.
अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षकांना अर्जित राजेचा लाभ देण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित झालेले असताना समान स्वरुपाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सदर लाभापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक व भेदभावपूर्ण ठरेल तसेच जनगणना व बी.एल.ओ. चे काम हे शिक्षकांनी स्वेच्छेने स्वीकारलेले काम नसून शासनाच्या आदेशानुसार पार पाडलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या कालावधीतील प्रत्यक्ष कामाचे दिवस शिक्षकांच्या सेवाकालाचा भाग म्हणून विचारात घेऊन त्यानुसार अर्जित रजेचा लाभ देणे आवश्यक असून खालील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत.
१. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक २६/०८/२०२६ रोजी निर्गमित केलेल्या आदेशाच्या धर्तीवर माध्यमिक वा उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र आदेश तातडीने निर्गमित करावेत.
२. जनगणना व बी एल ओ चे राष्ट्रीय कर्तव्य बजावलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या दिवसांच्या प्रमाणात अर्जित रजा त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये जमा करणचे निर्देश संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना द्यावेत.
३. यापूर्वी जनगणना व बी एल ओ चे काम केलेल्या शिक्षकांनाही या निर्णयाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत.
४. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनाही समान राष्ट्रीय कर्तव्य बजावलेले असल्याने प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच त्यांनी समान निकष व समान लाभ देण्यात यावा.
५. या संदर्भात जिल्हानिहाय कार्यवाही करण्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना स्पष्ट सूचना निर्गमित कराव्यात.
वरील प्रमाणे करण्यात आलेल्या मागणी ही धोरणात्मक स्वरुपाची बाब असल्याने सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर, सहपत्र-वरीलप्रमाणे
आपला विश्वासू, Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 06-10-2026 16:30:38
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर.
प्रत माहितीस्तव :- विजयकुमार गुंड, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्हा.

क्र. प्राशिसं/संकीर्ण-८०२/जनग. बीएलओ /२०२६
दिनांक – Digitally Signed Date
प्रति,
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
विषय :- "जनगणना व बीएलओ" चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करणेबाबत
संदर्भ
- शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र. प्राथ/संघटना/२०२६/२०२७७८९, दि.१९/०७/२०२६ (सोबत प्राप्त श्री. अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक महासंघ कोकण विभाग, निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र यांचे दि.११ मे, २०२६ चे निवेदन)
महोदय,
“जनगणना व बीएलओ” चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करणेबाबतचे अध्यक्ष, शिक्षक महासंघ कोकण विभाग, निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र यांचे दि.११ मे, २०२६ चे निवेदन मा.शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडुन संचालनालयास प्राप्त झाले आहे. (प्रत संलग्न)
विषयांकित निवेदनामध्ये नमुद करण्यात आल्यानुसार, “महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८० अन्वये सुट्टी काळात काम केल्यास शिक्षकांना अर्जित रजा देता येते. तसेच या अर्जित रजेची नोंद शिक्षकांच्या सर्व्हिस बुकात करता येते, तथापि अनेक शाळांमध्ये ह्या रजा सर्व्हिस बुका मध्ये मांडल्या जात नाही आणि शिक्षकांना या बदली रजांचा लाभ देत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात.
हेही वाचाल –
राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा “जनगणना तसेच बी.एल.ओ.” च्या कामासाठी अधिग्रहित केल्या असून मे महिन्याच्या हक्काच्या सुट्टीतही शिक्षकांना हे काम करावे लागत आहे.
रजेच्या कालावधीत (उन्हाळी, हिवाळी सुट्ट्या) काम केल्यास शिक्षकांना त्यांच्या सर्व्हिस बुक (सेवा पुस्तक) मध्ये नोंद करता येते आणि अशा कामासाठी ‘अर्जित रजा’ (Earned Leave EL) मिळण्याचा अधिकार असतो. काम पूर्ण केल्यावर सेवेच्या पुस्तकात (Service Book) या कालावधीची नोंद करणे अनिवार्य आहे. अर्जित रजा (Earned Leave): सुट्टीच्या काळात काम केल्यास, जितके दिवस काम केले आहे, त्या प्रमाणात अर्जित रजा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते त्याची नोंद सर्व्हिस बुकात केली जाते” असे नमुद करण्यात आले आहे.
विषयांकित निवेदनातील बाब ही धोरणात्मक स्वरुपाची असल्याने याअनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.
आपला विश्वासु,
सहपत्र – वरीलप्रमाणे
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 26-08-2026 08:13:45
( शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव – शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत – श्री. अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक महासंघ कोकण विभाग, निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र ३०२, शंकरा, सोमन सन सिटी, भोईरवाडी, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे
