राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राज्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना Rashtriya Jantnashak Mohim Din

Rashtriya Jantnashak Mohim Din

Rashtriya Jantnashak Mohim Din

Worm Bookworm Day Jantnashak Diwas

Rashtriya Jantnashak Mohim Din Rajyat Prabhavipane Rabavinyababat Suchana

Instructions regarding the effective implementation of the National Deworming Campaign/Day in the state

राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राज्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. शापोआ २०२६/प्र.क्र.१५७/एसडी-३ मंत्रालय, मुंबई

दिनांक :- २२ ऑक्टोबर, २०२६

वाचा:

प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे अ.शा.क्र.संकिर्ण १९२६/१८२/प्र.क्र.३०/कु.क.१, दि.१९ ऑक्टोबर, २०२६ रोजीचे अर्धशासकीय पत्र.

शासन परिपत्रक:-

प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१९ ऑक्टोबर, २०२६ रोजीच्या अर्धशासकीय पत्रान्वये “दि. २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राज्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये वय वर्षे १ ते १९ वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशकाची एक गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश सदर वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

सन २०१४-१५ या वर्षापासून ही मोहिम राज्यात राबविण्यात येत आहे. दर वर्षीप्रमाणे सन २०२६-२७ मध्ये १ ते १९ वर्ष वयोगटातील राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. अंगणवाडी / शाळा / कनिष्ठ महाविदयालय / वरिष्ठ महाविद्यालय (प्रथम वर्ष) या स्तरावर दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी “राष्ट्रीय जंतनाशक दिन” व या मोहिमेच्या दिवशी अनुपस्थित /सुटलेल्या मुला मुलींकरिता दि. ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप अप दिन राबवावयाचा आहे. तरी जंतनाशक दिन मोहिमेदरम्यान अंगणवाडी / शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेचा लाभ देता येईल.

राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन साठी खालील लक्ष निश्चित करण्यात आले आहे.

  1. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आतड्यांतील जंताचा प्रादुर्भाव कमी करणे.

ii. बालकांचे व किशोरवयीन मुला-मुलीचे आरोग्य सुधारणे, रक्तक्षय व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत करणे.

ii. वय वर्षे १ ते १९ वयोगटातील मुले व मुलीची पोषण स्थिती सुधारून त्यांच्या शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे, शारीरिक व बौध्दिक वाढ करण्यास मदत करणे.

सदर जंतनाशक मोहिम / दिन दरम्यान अंगणवाडी / शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेचा लाभ देता येईल.

दि.२७ ऑक्टोबर, २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम/दिन राज्यात प्रभाविपणे राबविण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

  1. शालेय शिक्षण विभागांतर्गत येणा-या एकूण लाभार्थ्यांची संख्या आरोग्य विभागास कळवावी जेणेकरुन त्यांना पुरेशा प्रमाणात जंतनाशक गोळयांचा (Albendazole Tablet) साठा आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येईल.

i. शिक्षण विभागाद्वारे सर्व शासकीय शाळा/शासकीय अनुदानित शाळा/आश्रम शाळा/नगरपालिका/महानगरपालिका शाळा, सर्व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळा, आर्मी स्कूल, सी. बी. एस. ई. स्कूल, नवोदय विदयालय, सुधार गृह सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकूल, संस्कार केंद्र, सर्व कनिष्ठ महाविदयालय व वरिष्ठ महाविदयालयाचे प्रथम वर्षाचे विदयार्थी (नर्सिंग कॉलेज, आय. टी. आय. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविदयालय, डी. एड. महाविद्यालय) यांचा जंतनाशक मोहिमेमध्ये समावेश करुन घ्यावा.

Ⅲ. विभागाच्या अधिपत्याखालील संबंधित अधिका-यांद्वारे राष्ट्रीय जंतनाशक दिन व मॉप अप दिनी संनियत्रण व पर्यवेक्षणाकरिता क्षेत्रभेटी करण्यात याव्यात व त्यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करण्यात यावा.

जंतनाशक मोहिमेकरिता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितींची स्थापना करण्यात आली आहे. जंतनाशक मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सदर समितीची बैठक घेण्याकरिता समन्वय साधावा. सदर मोहिमेकरिता आरोग्य विभागामार्फत शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तसेच शाळेचे नोडल शिक्षक यांचे प्रशिक्षण वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या स्तरावर घेण्यात येणार आहे आणि महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व महानगरपालिका शाळा व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण हे तेथील हेल्थ पोस्टच्या वैदयकीय अधिकारी यांच्या स्तरावर घेण्यात येणार असून सदर प्रशिक्षणास संबंधितांनी उपस्थित राहावे.

जंतनाशक गोळ्या देताना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. आजारी असलेल्या किंवा औषध देण्याबाबत विशेष काळजी आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा

सल्ला घ्यावा. औषध सेवनानंतर कोणतीही प्रतिकूल लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध असणारे प्रसिध्दी साहित्य शाळा / अंगणवाडी तसेच गावातील प्रमुख ठिकाणी व दर्शनिय भागांमध्ये लावण्यात यावे.

शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

संदर्भाधिन पत्रान्वये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम/दिन राज्यात प्रभाविपणे राबविण्यासाठी खालील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

अ.क्र. पदनाम स्तर

१.सह संचालक, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

राज्य

२. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य)

जिल्हा

३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी सर्व महानगरपालिका

महानगरपालिका

वरील सूचनांनुसार संबंधित सर्व विभाग प्रमुख, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, व संबंधित आरोग्य अधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलाल असून त्याचा संकेताक २०२६१०२२११२१३१३७४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

उप सचिव, महाराष्ट्र शासन

1000887219

Leave a Comment

error: Content is protected !!