Rajya Agricos Krushi Vidyarthi Din
Rajya Agricos Krushi Vidyarthi Din
Dr. Punjabrao urf bhausaheb deshmukh yanchya jayantinimitt dinank 27 december ha divas “rajya ægricos – krushi vidyarthi din” mhanun ghoshit karnyababat
Regarding the declaration of December 27th—the birth anniversary of Dr. Panjabrao alias Bhausaheb Deshmukh—as “State Agricos (Agriculture Students) Day.”
महाराष्ट्र शासन
कृषि विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१२०/३-जे (ई-१२१४६००)
मुंबई
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२६
वाचा :
१. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक १७.०३.२०२६ रोजीचे पत्र.
२. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक २५.०५.२०२६ रोजीचे पत्र.
प्रस्तावना :-
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी कृषि शिक्षण, संशोधन व शेतकरी संघटनांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशात कृषि विद्यापीठांची संकल्पना पुढे आणणे, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे पुनर्गठन तसेच सन १९५५ मध्ये “भारत कृषक समाज” या संस्थेची स्थापना या कार्यांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, कृषि पदवीधरांना, संशोधकांना व युवकांना प्रेरणा मिळावी आणि कृषि शिक्षण व संशोधनातील योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिवस, दिनांक २७ डिसेंबर, “राज्य अॅग्रीकॉस कृषि विद्यार्थी दिन” म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
१. महाराष्ट्र राज्यात दिनांक २७ डिसेंबर हा दिवस डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त “राज्य अॅग्रीकॉस कृषि विद्यार्थी दिन” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१०२२१२४४४१९५४६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन