PM YASASVI Scholarship
PM YASASVI Scholarship
PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS tasech PM- YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS (iyatta 9 vi te 10 vi) ya yojananantargat shishyavrutti arj NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) varun sadar karanyababat, shaikshanik sansthanchi nondani tasech vidyarthyanchya arj nondani karanebabat
Regarding submission of scholarship applications under PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS and PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS (Class 9 to 10) schemes through NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP), registration of educational institutions and registration of student applications
जा.क्र. इमाबकसं/शिक्षण / पीएम यशस्वी /2026-27/3706
दिनांक 22/06/2026
प्रति,
1. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सर्व
2. सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सर्व
विषय : “PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS” तसेच “PM- YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS (इयत्ता ९ वी ते १० वी)” या योजनांअंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वरून सादर करण्याबाबत, शैक्षणिक संस्थांची नोंदणी तसेच विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणी करणेबाबत.
संदर्भ : दि. १०/०३/२०२६ रोजी मा. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार.
उपरोक्त विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्रमांक. 1 च्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये मा. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC) तसेच विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या PM-YASASVI शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या पत्राद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सूचना आपल्या जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त महाविद्यालय व उच्च शिक्षण संस्था यांचे प्राचार्य / संचालक यांना देण्यात याव्यात.
सद्यस्थितीत महाडीबीटी प्रणाली द्वारे एकूण खालील ११ योजना ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जातात.
१. ओबीसी विद्यार्थ्याकारीता शिष्यवृत्ती योजना
२. विजाभज विद्यार्थ्याकारीता शिष्यवृत्ती योजना
३. विमाप्र विद्यार्थ्याकारीता शिष्यवृत्ती योजना
४. ओबीसी विद्यार्थ्याकारीता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना
५. विजाभज विद्यार्थ्याकारीता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना
६. विमाप्र विद्यार्थ्याकारीता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना
७. राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (विजाभज व विमाप्र विद्यार्थी, इयत्ता 11 वी व 12 वी)
८. व्यावसायिक अभ्यासक्रमातील विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता योजना
९. व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना (ITI)
१०. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या ओबीसी मुलींसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क योजना
११. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित इतर मागास प्रवर्गातील मुलींना पदव्युत्तर शिष्यवृत्ती.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS” तसेच “PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS (इयत्ता ९ वी ते १० वी)” या योजनांअंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज केवळ NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वरूनच स्वीकारण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने सदर बाबींची अंमलबजावणी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमार्फत प्रभावीपणे करण्यात यावी, या दृष्टीने खालीलप्रमाणे सविस्तर सूचना देण्यात येत आहेत.
१) सर्व महाविद्यालयांसाठी सूचना POST MATRIC (मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना)
१. इयत्ता ११ वी व त्यापुढील स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत लागू असलेली योजना “PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS” ही आहे.
२. सदरहू योजनेंतर्गत अर्ज स्विकारणे व संस्थास्तरावर पडताळणी करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाने NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वर नोंदणी (INSTITUTE REGISTRATION) करणे आवश्यक आहे.
3. ज्या महाविद्यालयांनी यापूर्वीच NSP PORTAL वर नोंदणी केलेली आहे, अशा महाविद्यालयांनी पुननोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांनी आपला INSTITUTE PROFILE अद्ययावत करून विद्यार्थ्यांच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू ठेवावी.
२) माध्यमिक शाळांसाठी सूचना PRE MATRIC (मॅट्रिकपुर्व योजना) स्तर इयत्ता ९ वी ते १० वी)
१. इयत्ता ९ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत लागू असलेली योजना “PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS” ही आहे.
2. त्या अनुषंगाने सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना NSP PORTAL वर अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करणे व आवश्यक सूचना देणे अपेक्षित आहे.
3. विद्यार्थ्यांना अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, आधार क्रमांक, वैध बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी बाबींची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करावे.
4. विद्यार्थ्यांच्या अर्जाची संस्थास्तरावर पडताळणी करण्यासाठी माध्यमिक शाळांनी देखील NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वर नोंदणी (INSTITUTE REGISTRATION) करणे अनिवार्य राहील.
5. ज्या माध्यमिक शाळांनी यापूर्वीच NSP PORTAL वर नोंदणी केलेली आहे, अशा शाळांना पुननोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांनी केवळ आपला संस्थेचा प्रोफाइल अद्ययावत करून अर्ज पडताळणीची प्रक्रिया करावी.
3) NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वर संस्थांची नोंदणी प्रक्रिया
ज्या महाविद्यालये व माध्यमिक शाळांनी अद्याप NSP PORTAL वर नोंदणी केलेली नाही, अशा संस्थांनी खालीलप्रमाणे INSTITUTE REGISTRATION करणे आवश्यक आहे:
१.
या संकेतस्थळास भेट द्यावी.
२. मुख्य पृष्ठावरील “INSTITUTE REGISTRATION” हा पर्याय निवडावा.
३. नोंदणी प्रक्रियेदरम्यान खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे:
संस्थेचे संपूर्ण नाव
AISHE CODE/UDISE CODE/INSTITUTE CODE
राज्य व जिल्हा
संस्थेचा संपूर्ण पत्ता
संस्थेच्या प्रमुखांची माहिती (PRINCIPAL / HEAD OF INSTITUTION)
अधिकृत ई-मेल आयडी
अधिकृत मोबाईल क्रमांक
४. नोंदणी करताना संस्थेसाठी NODAL OFFICER नियुक्त करणे आवश्यक आहे.
५. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित संस्थेला पोर्टलमार्फत USER ID व PASSWORD उपलब्ध होतील.
6. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर डिस्ट्रिक नोडल ऑफिसन / सहाय्यक संचालक संबंधित जिल्हा यांचेकडुन APPROVAL मिळाल्यानंतर संस्थेचा INSTITUTE PROFILE अद्यावत करून विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करणे आवश्यक पडताळणी करणे आवश्यक राहील.
4) कालमर्यादा
ज्या महाविद्यालये व माध्यमिक शाळांनी अद्याप NSP PORTAL वर नोंदणी केलेली नाही, अशा सर्व संस्थांनी आपली नोंदणी दि. 31 जुलै २०२६ पर्यंत करणे बंधनकारक राहील, अशा सक्त सूचना देण्यात याव्यात.
निर्धारित कालावधीत नोंदणी पूर्ण न झाल्यास संबंधित संस्थांना विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी करणे शक्य होणार नाही, याची नोंद घ्यावी.
वरील सूचनांची सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांनी तात्काळ नोंद घेऊन आपल्या संस्थेतील पात्र विद्यार्थ्यांना व पालकांना याबाबत आवश्यक ती माहिती देऊन तदनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (सर्व) तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (सर्व) यांनी सर्व महाविद्यालये व माध्यमिक शाळांची दर आठवड्याला बैठक आयोजित करावी. सदर प्रक्रियेच्या अंमलबजावणीकरिता प्रत्येक महाविद्यालय/शाळेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावा तसेच तांत्रिक बाबीसाठी स्वतंत्र आदेशाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. सदर बैठकीचे आयोजन प्रत्येक आठवड्याला नियमितपणे करण्यात यावे व बैठकीचा आढावा घेऊन खाली दिलेल्या तक्त्यानुसार आठवड्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच सर्व संबंधित महाविद्यालये व शाळांना याबाबतची सूचना ई-मेलद्वारे तात्काळ कळविण्यात यावी.
आठवड्याचा अहवाल सादर करण्यासाठी नमुना तक्ता :
अक्र जिल्हा एकूण शाळा / महाविद्यालय मॅट्रिकपुर्व संस्था
मॅट्रिकोत्तर संस्था
नोंदणीपूर्ण REGISTRATI ON COMPLETED
प्रलंबित PENDING 241
INSTITUTE VERIFY केलेल्या इस्टिट्यूटची संस्था
उपरोक्त नमूद केलेल्या सर्व प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित जिल्हा कार्यालय व प्रादेशिक कार्यालय जबाबदार राहील. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे. सदर अंतिम मुदतीनंतर कोणत्याही नोंदणी प्रक्रियेचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
सोबत – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना वाचा किंवा पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून
सोनाली मुळे (भा.प्र.से) संचालक इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे
प्रत माहितीस्तवः-
मा. सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय, मुंबई-32