आपले सरकार सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबाबत Aaple Sarkar Seva Kendramadhun milanarya shaley vidyarthyanchya dakhalyambabat

Aaple Sarkar Seva Kendramadhun milanarya shaley vidyarthyanchya dakhalyambabat

Aaple Sarkar Seva Kendramadhun milanarya shaley vidyarthyanchya dakhalyambabat

Regarding school student certificates obtained from Aaple Sarkar Seva Kendra

aaple sarkar seva kendramadhun milanarya shaley vidyarthyanchya dakhalyambabat

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

आपले सरकार सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबाबत….

महाराष्ट्र शासन

इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग शासन परिपत्रक क्रः संकीर्ण-१७२५/प्र.क्र.४५/२०२४

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : २२ जून, २०२६.

वाचाः १. सा. प्र. वि. शासन निर्णय क्र. मातंसं-१७१६/प्र. क्र. ५१७/३९, दि. १९ जानेवारी, २०१८

२. सा. प्र. वि. शासन निर्णय क्र. आसेकें-१७२५/प्र. क्र. ८६/मातं (३९), दि. २७ मार्च, २०२५

प्रस्तावना

वाचा क्र. १ येथील दि. १९ जानेवारी, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या CSC 2.0 योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, त्याअन्वये आपले सरकार सेवा केंद्राचे स्थापना, सनियंत्रण व प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्राबाबत सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वाचा क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये विहित केल्यानुसार लोकसंख्येच्या आधारे आपले सरकार सेवा केंद्र वाटप करण्यात येते. तसेच वाचा क्र. २ येथील शासन निर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्रातंर्गत नागरीकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर घरपोच सेवेच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तथापि, असे निदर्शनास आले आहे की, शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश कालावधीत प्रमाणपत्रे/दाखले काढण्याची आवश्यकता असते, त्यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, प्रसंगी विध्यार्थ्यांना शालेय तासिकांना देखील मुकावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या प्रवेश कालावधीत शाळेमध्येच दाखले काढून मिळावेत अश्या प्रकारची सोय असणे आवश्यक आहे.

शासन परिपत्रक :

उपरोक्त पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष मोहीम / शिबिरे आयोजित करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

१) जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले/प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष शिबिरे आयोजित करावीत. संबंधित तालुका, ग्रामपंचायत अथवा नजीकच्या “आपले सरकार सेवा केंद्रां” मार्फत ठराविक दिवशी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे कामकाज प्राधान्याने करण्यात यावे.

२) प्रवेश कालावधी अथवा प्रमाणपत्रांची वाढीव मागणी असलेल्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याबाबत आवश्यक नियोजन करावे.

३) संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी/ग्रामीण), शिक्षण विभाग व शाळा प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी.

२. सदर परिपत्रकातील सूचनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२६०६२२१५२३१९६८११ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!