NPS Contributions Credit To PRAN Procedures Revised
NPS Contributions Credit To PRAN Procedures Revised
NPS Contributions Credit Guidelines
PRAN Procedures Revised
Revised procedures for crediting monthly contributions under the National Pension System to Pran Accounts.
rashtriya nivruttivetan pranali antargat rajya shasakiy adhikari/karmchari yanna star-1 madhye jama asleli anshdanachi rakkam guntavnukicha vikalpababat
Regarding investment options for the contribution amount deposited in Tier-1 by State Government Officers/Employees under the National Pension System
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-१ मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्पाबाबत.
दिनांक: १०.०७.२०२६.
वाचा
: १. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो २०२०/प्र.क्र.७/सेवा-४, दि.३०.०९.२०२२.
२. निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचे परिपत्रक क्र.PFRDA/२०२५/१६/REG-PF/०२, दि.१७.१०.२०२५.
प्रस्तावना :-
३. केंद्र शासनाचे वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय यांची अधिसूचना क्र. एफएक्स-४/२/२०२५-पीआर, दि.१३.११.२०२५.
वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३०.०९.२०२२ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता त्यांच्या PRAN खात्यात स्तर-१ मध्ये जमा असलेली मासिक अंशदानाची रक्कम संचित निधीसह गुंतवणूक करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक (PFM) व गुंतवणूक करावयाच्या योजना (scheme preference) निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
सदर विकल्पासह निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांच्या संदर्भाधीन क्र.२ येथील परिपत्रकान्वये दोन अतिरिक्त विकल्प ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Fund) अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांचे संदर्भ क्र.२ च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Fund) अंतर्गत कन्झरव्हेटीव्ह लाईफ सायकल निधी (Conservative Life Cycle Funds) LC-25 Scheme व मॉडरेट लाईफ सायकल निधी (Moderate Life Cycle Funds) LC-50 Scheme या पर्यायाचे नावात अनुक्रमे Life Cycle 25-Low (5E/55Y) व Life Cycle 50-Moderate (10E/55Y) असा बदल करण्यात आला आहे.
२. तसेच ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Fund) अंतर्गत
पुढीलप्रमाणे दोन अतिरिक्त विकल्प उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
a) Life Cycle 75-High (15E/ 55 Y) या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या ३५ वर्षापर्यंत कमाल ७५% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व तद्नंतर वयाच्या ५५ वर्षापर्यंत १५% च्या मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. (वयाप्रमाणे गुंतवणूकीच्या प्रमाणाबाबतचे जोडपत्र-१ पहावे.)
b) Life Cycle Aggressive (35E/ 55 Y) या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या ४५ वर्षापर्यंत कमाल ५०% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व तद्नंतर वयाच्या ५५ वर्षापर्यंत ३५% च्या मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. (वयाप्रमाणे गुंतवणूकीच्या प्रमाणाबाबतचे जोडपत्र-२ पहावे.)
३. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या PRAN खात्यात स्तर-१ मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणूकीकरीता दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार उपलब्ध करुन दिलेल्या विकल्यांसह निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी उपलब्ध करुन दिलेले १) Life Cycle 75- High (15E/55 Y) व 2) Life Cycle -Aggressive (35E/55Y) हे अतिरिक्त विकल्प निवडण्याची मुभा देण्यात येत आहे.
४. याबाबत जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नीत मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये/संस्था यांच्या सेवेत दि.०१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या/होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र शासन आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०७१०१४३५५७०१०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासनाचे उप सचिव
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः अंनियो-२०२६/प्र.क्र.११/सेवा-४, मंत्रालय, मुंबई
_____ ALSO READ ____
Rashtriya nivruttivetan pranali / ekikrut nivruttivetan yojanentargat rajya shasakiy adhikari / karmchari yanche masik anshdan PRAN khati jama karavayachi sudharit karyapaddhati
Improved procedure for depositing monthly contributions of State Government officers/employees under National Pension System/Integrated Pension Scheme into PRAN accounts.
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन परिपत्रक क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
दि.११.०६.२०२६.
वाचा:-
१) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो १००५/१२६/सेवा-४, दि.३१.१०.२००५.
२) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो २०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दि.२७.०८.२०१४.
३) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-२०१५/ (NPS)/प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४.२०१५.
४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, दि.०४.१२.२०२३.
५) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. सेनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४, दि.२०.०९.२०२४.
प्रस्तावना :
उपरोक्त नमूद संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे. संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला असून, दि.१ एप्रिल २०१५ पासून सदर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील स्तर-१ ची राज्यांतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे संदर्भ क्र.४ च्या शासन परिपत्रकान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी, आहरण व संवितरण अधिकारी आणि कोषागार अधिकारी यांच्या स्तरावर पार पाडावयाच्या कार्यवाहीची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, आणि संदर्भ क्र. ५ च्या शासन निर्णयान्वये, केंद्र सरकारने दिनांक २४.०८.२०२४ रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तिवेतन योजना (Unified Pension Scheme) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासन परिपत्रक दिनांक ०४.१२.२०२३ सोबतच्या परिशिष्ट अ मधील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदान कर्मचाऱ्यांच्या PRAN खाती जमा होण्याकरीता वेतन देयकावर कार्यवाही करण्याच्या कालमर्यादेसंदर्भात सविस्तर कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या प्रान खाती जमा होण्यासाठी सुधारीत कार्यपध्दती पुढीलप्रमाणे असेल व त्यानुसार सुधारीत परिशिष्ट- अ खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.तपशील कार्यवाहीचा दिनांक
१. आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजनेत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी /कर्मचारी यांची वेतन देयके कोषागारात सादर करणे.
प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला किंवा त्यापूर्वी
२. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्राधान्याने पारित करुन त्याचे प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्याच्या ०१ तारीख अथवा देय दिनांक “Not payable before the first day of the next month or due date” असा शेरा नोंदवून प्रमाणक क्रमांक (Voucher No.) संस्करीत करणे.
प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत
३. कोषागार कार्यालयांकडून मुख्य लेखाशीर्ष २०७१ अंतर्गत नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत १४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत १०%) आहरीत करण्याकरिता निरंक रक्कमेचे ई-देयक तयार करणे, सदरचे ई-देयक पारीत करुन प्रमाणक क्रमांक संस्करीत करणे.
प्रत्येक महिन्याच्या २४ तारखेपर्यंत
४. कर्मचाऱ्याचे अंशदान व नियोक्त्याचे अंशदान संदर्भात Subscriber Contribution File (SCF) तयार करुन CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) करणे व व्यवहार क्रमांक (Transaction ID) प्राप्त करुन घेणे.
प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत
५. कर्मचाऱ्याच्या व नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत २४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत २०%) आहरित करण्याकरिता मुख्य लेखाशीर्ष ८३४२-०१३२ अंतर्गत ई-देयक तयार करणे, सदरचे ई-देयक पारीत करुन प्रमाणक क्रमांक संस्करीत करणे.
प्रत्येक महिन्याच्या २९/३० तारखेपर्यंत
६. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत मासिक अंशदानाची रक्कम कोषागार कार्यालयांच्या DDO Account ला जमा न करता थेट ई-कुबेर प्रणालीद्वारे विश्वस्त बँकेत (Trustee Bank) वर्ग करणे,
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी
२. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रान खाती जमा होण्यासाठी सुधारीत कार्यपध्दतीनुसार खालीलप्रमाणे विकसन करण्यात आले आहे.
1. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्राधान्याने पारित करुन त्याचे प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्याच्या ०१ तारीख अथवा देय दिनांक “Not payable before the first day of the next month or due date” असा शेरा नोंदवून प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत प्रमाणक क्रमांक (Voucher No.) संस्करीत करण्यासाठी Treasury Net प्रणालीमध्ये विकसन करण्यात आले आहे.
॥. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत नियोक्त्त्याच्या (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत १४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत १०%) अंशदानाचे देयक तसेच कर्मचाऱ्याच्या व नियोक्त्याच्या अंशदानाच्या (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत २४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत २०%) रकमेच्या देयकांचे E-Bill बाबत सेवार्थ प्रणालीमध्ये विकसन करण्यात आले आहे. महालेखापाल कार्यालयाच्या निर्देशानुसार ई-व्हाऊचर निर्धारीत केलेल्या कालावधीपर्यंत जतन करणे व लेखापरिक्षण /न्यायालयीन प्रकरण / माहिती अधिकार प्रकरणी मागविल्यास सादर करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत २४% व एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत २०%) कोषागार कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या खात्यात (DDO Account) ला जमा न करता थेट ई-कुबेर प्रणालीद्वारे विश्वस्त बँकेत (Trustee Bank) वर्ग करण्याबाबत सेवार्थ प्रणाली व TreasuryNet प्रणाली मध्ये विकसन करण्यात आले आहे.
सर्व आहरण व संवितरण अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी तसेच अधिदान व लेखा अधिकारी यांनी उपरोक्त सुधारीत कार्यपध्दतीनुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली / एकीकृत निवृत्तिवेतन योजने अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रान खाती जमा करण्याची कार्यवाही करावी.
सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.५८/२०२६/को.प्र.४,दि.११.०६.२०२६ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आले आहे.
हा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२६०६१११७०३५०२३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
MANISHA
YUVRAJ KAMTE
(मनीषा यु.कामटे) शासनाचे उप सचिव

___________ ALSO READ ________
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती.
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४०/सेवा-४
मंत्रालय, मुंबई
दिनांकः ३०.१२.२०२४.
वाचा :-
१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो-१००५/१२६/सेवा-४, दि.३१.१०.२००५.
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो-१००७/१८/सेवा-४, दि.०७.०७.२००७.
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो-२०१२/प्र.क्र.९६/सेवा ४, दि.२७.०८.२०१४.
४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो-२०१५/ (NPS) प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४.२०१५.
५) केंद्र शासनाचे Office Memorandum, Ministry of Finance, Office of Controller General of Accounts, New Delhi dated ०२.०९.२००८.
६) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, दि.०४.१२.२०२३.
प्रस्तावना
संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे. तसेच संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे. तसेच संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत स्तर-१ ची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिताची अंमलबजावणीची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान जमा करण्याच्या कार्यपध्दतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे
The provision and expenditure on the government contribution to the DCPS/NPS is required to be made under the head “2071-Pension & Other Retirement Benefits, 117- Defined Contribution Pension Scheme.”
महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत उपरोक्तप्रमाणे नोंदविलेले निरीक्षण व संदर्भ क्र.५ येथील केंद शासनाच्या ज्ञापनास अनुसरुन नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम वेतनाच्या लेखाशीर्षाखाली खर्च न होता “2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme” या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील कार्यपध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :
महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत नोंदविलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दि.०२.०९.२००८ च्या ज्ञापनास अनुसरुन संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयामधील कार्यपध्दतीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.
१. राज्य शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत –
१.१ आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही –
१.१.१ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून दरमहा केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसूली (मूळ वेतन महागाई वेतन (असल्यास) + महागाई भत्ता या रकमेच्या १०%) करण्यात यावी. यामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश नसावा.
१.१.२ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करुन ती प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावीत.
१.१.३ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीखाली वजाती होणारी अधिकारी / कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे संबंधित योजना सांकेतांकामध्ये प्रवर्गनिहाय जमा म्हणून दर्शविण्यात यावी.

अ.क्र. प्रवर्ग
अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या जमेचे लेखाशीर्ष
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी – ८३४२५०८१
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी – ८३४२५२२१
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी – ८३४२५२४१
भारतीय वन सेवेतील अधिकारी – ८३४२५२६८
१.१.४ कर्मचाऱ्याच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशील दर्शविणारी आवश्यक ती अनुसूची (Schedule) वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.
१.१.५ राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम २५९ (१) नुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाती म्हणून दर्शविण्यात याव्यात.
१.१.६ नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाचे अधिकारी / कर्मचारी यांचे Projected Employer Contribution Schedule वेतन देयकासोबत तयार होईल. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे Schedule वेतन देयकासोबत जोडावे.
१.१.७ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना, कर्मचाऱ्यांच्या १०% तसेच नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्य रकमा Auto-calculate होतील. तथापि, Pay Arrears / DA Arrears / Pay Arrears Difference / DA Arrears Difference ची थकबाकीची देयके तयार करताना, कर्मचाऱ्यांच्या १०% तसेच नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्या रक्कमेची आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिगणना करुन ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये (Manually) भरावी.
१.१.८ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना करताना, नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची १४% रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शविण्यात यावी. याबाबतची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची अधिकारी / कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल.
१.२ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करावयाची कार्यवाही
१.२.१ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सामील असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसूली संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत करण्यात आली असेल तरच वेतन देयके पारित करण्यात यावीत अन्यथा नाकारण्यात यावीत. वेतन देयकामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश असणार नाही याची खातरजमा करण्यात यावी. तद्नंतरच राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्राप्त वेतन देयके प्राधान्याने पारित करुन प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत प्रमाणक क्रमांक (Voucher No.) संस्करीत करावेत.१.२.२ अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन देयकास प्रमाणक क्रमांक संस्करीत झाल्यानंतर, अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा आहरित करण्याकरिता म. को.नि. साधी पावती नमुना ४५-अ निरंक रक्कमेची (Nil Bill) महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र देयके सेवार्थ प्रणालीमध्ये Auto- generate स्वरुपात तयार करावीत.
१.२.३ नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा आहरीत करण्याकरिता, महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचेकरिता “2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme (2071 0651)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५३६६, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५०२६, भारतीय वन सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५३७५ या लेखाशीर्षाखाली जमा दर्शविण्यात यावी. तसेच राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता “2071-Pension & Other Retirement Benefits, 117- Defined Contribution Pension Scheme (2071 0642)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून ८३४२५०९९ या लेखाशीर्षाखाली जमा दर्शविण्यात यावी.
१.२.४ वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, दि.०४.१२.२०२३ सोबतच्या विवरणपत्रामधील मुद्दा क्र.३.१ मध्ये “प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला SCF तयार करुन NPS प्रणालीवर अपलोड करावी. मासिक अंशदानाची रक्कम SCF तयार करुन NPS प्रणालीवर अपलोड झाल्याच्या दिनांकापासून ७ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विश्वस्त बँकेकडे (Trustee Bank) वर्ग करावी” असे नमूद आहे. तथापि, नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहरित करण्याकरिता निरंक देयक तयार करुन पारित करण्याचा कालावधी लक्षात घेता, अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयातून नियोक्त्याच्या अंशदानाचे निरंक रकमेचे देयक पारित झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला कर्मचाऱ्याचे अंशदान व नियोक्त्याचे अंशदान संदर्भात Subscriber Contribution File (SCF) तयार करुन CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) करावी व व्यवहार क्रमांक (Transaction ID) प्राप्त करुन घ्यावा.
१.२.५ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी “८३४२-Other Deposits-००-११७- Defined Contribution Pension Scheme” या लेखाशीर्षाखाली कर्मचाऱ्याच्या व नियोक्त्याच्या अंशदानाच्या जमा रकमा आहरित करण्याकरिता ८३४२०१३२ या मुख्य लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून साधी पावती म. को.नि. नमुना ४५-अ मध्ये देयक सादर करावे.१.२.६ सदर देयकाद्वारे आहरित करण्यात आलेली मासिक अंशदानाची रक्कम, Subscriber Contribution File (SCF) CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) झाल्याच्या दिनांकापासून ७ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विश्वस्त बँकेकडे (Trustee Bank) वर्ग करण्यात यावी.
२. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत
प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत मासिक अंशदानाची वसुली व सदर वसूलीची रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक अंनियो-२०१५/ (NPS)/ प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४.२०१५ नुसार विहित कार्यपध्दती लागू राहील.
३. हे शासन निर्णय जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.
४. उपरोक्त कार्यपध्दती कोषागार कार्यालय, वाशिम अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून दि.१५.०२.२०२५ पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पुरक देयकांसंदर्भात नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारीत प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात येत आहे. दि.१५.०३.२०२५ पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पुरक देयकांसंदर्भात नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारीत कार्यपध्दती सर्व कोषागार कार्यालयांच्या स्तरावर चालू करण्यात येईल.
५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१२३०१२०५४१६६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
(मनिषा यु. कामटे) शासनाचे उप सचिव
