Vetan E Kuber Pranali Marfat

Implementation of e-Kuber system जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई-कुबेर प्रणालीव्दारे

Local holidays

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

मुंबई-४०० ००१

क्रमांकः – सेवार्थ २०२३/प्र.क्र.६८/वित्त-५

प्रति, मा. संचालक लेखा व कोषागारे, कस्तुरी इमारत, तळमजला, पेट्रोलियम हाऊसजवळ, चर्चगेट,

मुंबई-४०० ०२०.

Email ID: nilima.shinde@nic.in

दिनांक : ७ मे, २०२४.

विषय :- ई-कुबेर प्रणालीबाबत

संदर्भ :- या कार्यासनाचे पत्र क्र. सेवार्थ २०२३/प्र.क्र.६८/वित्त-५, दि. १५ सप्टेंबर, २०२३.

Vetan E Kuber Pranali Marfat

महोदया,

उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई-कुबेर प्रणालीव्दारे करावयाचे असल्याने पंचायतराज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचा-यांची माहिती ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे.

२. याबाबत पंचायतराज सेवार्थ टीमने ई-टेस्टींगसाठी फाईल आपणाकडे पाठविली असून यासोबत मॅपिंगसाठी व बीम्स इंटीग्रेशन मध्ये कोणते अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपले स्तरावरुन देणे आवश्यक आहे.

ई-कुबेर प्रणालीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

३. पंचायतराज सेवार्थ प्रणाली ही ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबींची पुर्तता होईपर्यंत पंचायतराज सेवार्थ प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयके ही प्रचलित पध्दतीनेच स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिका-यांना आपले स्तरावरुन देण्यास आपणांस विनंती करण्यात येत आहे.

आपला,

(रा.प्र. भोईर)

उप सचिव तथा सहसंचालक, महाराष्ट्र शासन

प्रत माहितीस्तव रवाना:-

१) सहसंचालक (सुधारणा), संचालनालय, लेखा व कोषागारे, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२.

२) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व) यांना पुढील कार्यवाहीसाठी.

शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (Cash Management project)/ ई- कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः वेतन-१२२१/प्र.क्र.३५/टिएनटी – ३ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

तारीखः ४ जानेवारी, २०२४. चे ई-कुबेर प्रणालीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!