Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide
Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide
Class 10th and 12th Feb. / March 2025 appearing in the examination giving additional concessional marks to students participating in district level, department level, state, national and international level as well as students participating in krida NCC, scout guide.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागीय मंडळ, अमरावती
MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY AND HIGHER SECONDARY EDUCATION, AMRAVATI DIVISIONAL BOARD, AMRAVATI 444602
पत्र.क्र. अविमं./माप/उमाप/ २२४१ अमरावती दि. ३०/१२/२०२४
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा व क.म.वि.,
अमरावती विभाग, अमरावती
विषय :- इ.१०वी व इ.१२वी फेब्रु. / मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होणा-या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मध्ये भाग घेणा-या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत..
संदर्भः शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क. उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एसडी-२ दि. २०/१२/२०१८ व शासन शुध्दीपत्रक क्र. उमाशि-२०१५/२६२/एसडी-२ दि.२५/०१/२०१९.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) च उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा फेब्रु./मार्च २०२५ करीता प्रविष्ठ होणा-या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मध्ये भाग घेणा-या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याच्या सुधारीत कार्यपध्दतीबाबत उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमुद तरतुदीनुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी खेळाडूचे परिपुर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात दिनांक ०१/०१/२०२५ ते दि.०५/०४/२०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन प्रस्ताव दि. ३०/०४/२०२५ पर्यंत आपल्या शिफारशीसह अमरावती विभागीय मंडळ कार्यालयात सादर करावेत.
२. संबंधित समादेशक अधिकारी/गटप्रमुख, राष्ट्रीय छात्रसेना व जिल्हा संघटन आयुक्त, स्काऊट व गाईड यांनी संदर्भाकित शासन निर्णयातील परिशिष्ट क. २ मधील नमूद शिबीरे/संचलन यामध्ये सहभागी होऊन यशस्वीपणे पूर्ण केलेल्या तसेच राष्ट्रपती पदक विजेत्या विद्यार्थ्यांची यादी दि.०१/०३/२०२५ पर्यंत स्वाक्षरीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे सादर करावी. संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित शाळा/महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्याकडून प्राप्त झालेले विहित नमुन्यातील एन.सी.सी. व स्काऊट गाईड गुणांसाठीचे अर्ज, समादेशक अधिकारी/गटप्रमुख, राष्ट्रीय छात्रसेना व जिल्हा संघटन आयुक्त, स्काऊट गाईड यांचेकडुन प्राप्त झालेल्या अभिलेख्यानुसार छाननी करुन दि. ३०/०४/२०२५ पर्यंत आपल्या शिफारशीमह अमरावती विभागीय मंडळ कार्यालयान सादर करावेत.
हेही वाचाल 👇
सदर कार्यवाही विहीत मुदतीत करणे आवश्यक आहे. कोणताही पात्र विद्यार्थी मदर सवलतीच्या गुणांपासुन बंचित राहणार नाही, याची सर्व शाळाप्रमुख/क.म.वि प्रमुख व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
विभागीय सचिव,
अमरावती विभागीय मंडळ, अमरावती