वित्त विभागाचे आदेश निवृत्तिवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी १५ वर्षा ऐवजी १२ वर्षे Nivruttivetan Ansharashikaran Punarsthapana

Nivruttivetan Ansharashikaran Punarsthapana

Nivruttivetan Ansharashikaran Punarsthapana

Nivruttivetan Ansharashikaran Punarsthapana-12-varsha

pension-commutation-restoration-period-12-years

nivruttivetan ansharashikaran punarsthapana kalavadhi 15 varsha aivaji 12 varshe

Pension accrual period to be reinstated to 12 years instead of 15 years

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
क्रमांक : न्यायाप्र २०२५/प्र.क्र.२७/सेवा-४

दि. ०१/१०/२०२५

प्रति,
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई

विषय : निवृत्तिवेतन अंशराशीकृत भागाची देय रक्कम वसूल करावयाचा कालावधी कमी करण्यासाठी दाखल करण्यात येणाऱ्या याचिकांसंदर्भात.

संदर्भ : आपले पत्र क्र. संलेवको-२०२५/व.ले./ निवृत्तीवेतन (संगणकीकरण)/२१८/१६३/३९७५, दि.२३.०९.२०२५.

महोदय,

निवृत्तिवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी १५ वर्षा ऐवजी १२ वर्षे होणेबाबत विविध न्यायालयीन प्रकरणामध्ये अंशराशीकरणाच्या रक्कम वसुलीस स्थगिती देण्याबाबत आदेश मा. न्यायालयाकडून देण्यात येतात, सदर न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र.११६४/२०२५ मध्ये दि.१८.०३.२०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामध्ये अंशराशीकरणाच्या वसुलीस स्थगिती दिली आहे. त्या आदेशाच्या आधारे संबंधित महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मुंबई, औरंगाबाद, नागपूर) दाखल झालेल्या दाव्यांमध्ये न्यायाधिकरणानेही उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या संदर्भ देऊन स्थगिती दिली असल्यास अशा सर्व प्रकरणी संबंधितांच्या अंशराशीकरणाच्या वसुलीस मा. उच्च न्यायालयाच्या तसेच त्या-त्या संबंधित न्यायाधिकरणाच्या अंतिम आदेशाच्या अधिन स्थगिती देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आपली.

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिपत्रक पीडीएफ लिंक

वित्त विभागाचे आदेश निवृत्तिवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी १५ वर्षा ऐवजी १२ वर्षे Nivruttivetan Ansharashikaran Punarsthapana
वित्त विभागाचे आदेश निवृत्तिवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी १५ वर्षा ऐवजी १२ वर्षे Nivruttivetan Ansharashikaran Punarsthapana

Leave a Comment

error: Content is protected !!