Jyeshtha Nagrik Kalyan GPTM Baithak
Jyeshtha Nagrik Kalyan GPTM Baithak
jyeshtha nagrikanche kalyanasathi upayayojana “aaji-aajoba, shikshak v mule” (GPTM) ase baithakiche aayojan karanebabat
Regarding organizing a meeting called “Grandparents, Teachers and Children” (GPTM) to take measures for the welfare of senior citizens
क्र.आशिका/२०२६/संकीर्ण/ (आस्था-क १४४)/
दि. स्वाक्षरीखाली नमूद आहे
प्रति.
१. मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय- ज्येष्ठ नागरिकांचे कल्याणासाठी उपाययोजना “आजी-आजोबा, शिक्षक व मुले” (GPTM) असे बैठकीचे आयोजन करणेबाबत…
संदर्भ- समाजकल्याण आयुक्तालय यांचे पत्र जा.क्र. सकआ/ज्येष्ठना/भेट-GPTM/आयोजन/२०२६-२७/का-१२/९४२, दि. २४ सप्टेंबर, २०२६
महोदय,
उक्त संदर्भीय पत्राचे व सहपत्राचे अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न) उपरोक्त विषयांकित प्रकरणी, संदर्भीय पत्रान्वये कळविल्यानुसार, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टल
https://scw.dosje.gov.in
https://www.dosje.gov.in/organisation/senior-citizens-welfarescwhttps://www.dosje.gov.in/organisation/senior-citizens-welfarescw
कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशातील सर्व राज्यांच्या शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने प्रत्येक शैक्षणिक वर्षातील कोणत्याही एका “पालक व शिक्षक बैठक” (PTM) ऐवजी “आजी-आजोबा, शिक्षक व मुले” (GPTM) या बैठकीचे आयोजन करण्यात यावे.
शासन निर्णय दि. ०९.०७.२०१८ मधील तरतुदीनुसार दिनांक ०१ ऑक्टोबर हा “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने, प्रत्येक शैक्षणिक वर्षात दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करणेबाबत शपथ घेणे तसेच “आजी-आजोबा, शिक्षक व मुले” (GPTM) बैठकीचे आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
तरी, आपल्या अधिनस्त सर्व शाळांना आपले स्तरावरून संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, ही विनंती.
आपला, Digitally signed by Harun Ismail Atar Date: 29-09-2026 17:13:28
(हारुन आतार) शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)
प्रत माहिती तथा पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. प्रशासन अधिकारी / शिक्षण निरीक्षक (सर्व मनपा)
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)
प्रत माहितीस्तव- मा. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
