Shistbhang Karyavahi Shiksha Sevapustak Nond
Shistbhang Karyavahi Shiksha Sevapustak Nond
Disciplinary Action Service Book Entry
shistbhangavishayak karyavahimadhye shiksha dilelya prakarni sevapustakat ghenyat yenarya nondibabat
Regarding the entries to be made in the service book in cases of punishment given in disciplinary proceedings
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र.आस्था-अ-१०३/शिस्तभंगविषयक कार्यवाही/२०२६/
दिनांकः स्वाक्षरीखाली नमूद आहे
प्रति,
१. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
२. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ, पुणे
३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे
४. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सर्व
५. मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे-१
६. मा. शिक्षण संचालक, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे-१
७. मा. शिक्षण संचालक, (योजना) संचालनालय, म.रा., पुणे-१
८. विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ, सर्व विभाग
९. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
१०. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), सर्व
११. अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक/माध्यमिक), सर्व
विषय : शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा दिलेल्या प्रकरणी सेवापुस्तकात घेण्यात येणाऱ्या नोंदीबाबत.
उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचेविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये प्रकरणपरत्वे निलंबन/वेतनवाढ रोखणे/ठपका ठेवणे इ. विविध शिक्षा आदेशित करण्यात येतात. शिक्षा दिलेल्या प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल (सेवापुस्तकातील नोंदीच्या छायाप्रतीसह) शासन/शिक्षण आयुक्तालयास/नियुक्ती प्राधिका-यास विहीत वेळेत सादर करणे आवश्यक असते. तथापि काही प्रकरणी शासन आदेश/शिक्षा आदेश यांची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत होत नसल्याचे व त्यानुसार आवश्यक नोंदी सेवापुस्तकात वेळीच घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यानुसार सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा आदेशित केलेल्या प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल (सेवापुस्तकातील नोंदीच्या छायाप्रतीसह) शासन/शिक्षण आयुक्तालय/नियुक्ती प्राधिका-यास वेळोवेळी विहीत वेळेत सादर करण्याची दक्षता घ्यावी.
Digitally signed by Harun Ismail Atar Date: 29-09-2026
शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१
प्रत – मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सादर.