वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाच्या सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करणेबाबत MBBS Samajik Dayitva Seva

MBBS Samajik Dayitva Seva

MBBS Samajik Dayitva Seva

vaidyakiya padavi MBBS abhyaskram purna kelyanantar karavayachya samajik dayitva sevechi at radd karanebabat shasan nirnay

Regarding cancellation of the condition of social responsibility service to be done after completing the medical degree (MBBS) course GR

वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाच्या सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन निर्णय क्रमांक. एमईडी १०२६/प्र.क्र.२३९/२६/शिक्षण-२, नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१

दिनांक:- २३/०७/२०२६

संदर्भ:

१. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१००६/सीआर-५/०६/शिक्षण-२, दिनांक ३१/०७/२००६.

२. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१००७/सीआर-४९०/०७/शिक्षण-२, दिनांक ०८/०२/२००८.

३. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक डब्ल्यूपीएम-१०११/प्र.क्र.३५२/११/शिक्षण-२, दिनांक ०४/०४/२०१२.

४. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक मुमंस-३३१६/प्र.क्र.३१/१६/शिक्षण-२, दिनांक २५/१०/२०१६.

५. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१०१५/प्र.क्र.२४१/१५/शिक्षण-२, दिनांक २२/०९/२०१७.

६. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१०१७/प्र.क्र.१७१/१७/शिक्षण-२, दिनांक १२/१०/२०१७.

७. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१०१७/प्र.क्र.१७१/१७/शिक्षण-२, दिनांक २४/११/२०१७.

८. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१०१६/प्र.क्र.३४५/१६/शिक्षण-२, दिनांक ०५/०१/२०१८.

९. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१०१७/प्र.क्र.४५५/१७/शिक्षण-२, दिनांक १२/०६/२०१८.

१०. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक एमईडी-१०२१/प्र.क्र.१२८/२१/शिक्षण-२, दिनांक १३/०६/२०२२.

प्रस्तावना :-

शासकीय / महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम शिकणा-या तसेच शासन अनुदानित व खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांत शासनाच्या विविध विभागांकडून देण्यात येणा-या शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेऊन वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम शिकणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासनाकडून/महानगरपालिकांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासन/महानगरपालिका करीत असलेला खर्च हा जनतेकडून आकारण्यात येत असलेल्या कराच्या उत्पन्नातून भागविला जात असल्याने जनतेच्या ऋणांची काही अंशी परतफेड व्हावी, या उद्देशाने वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांकडून शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/संरक्षण दलाची एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करण्याबाबतचे बंधपत्र लिहून घेण्यात येत होते.

तथापि, सद्यस्थितीप्रमाणे राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची वाढलेली संख्या, त्यातून दरवर्षी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व सदर विद्यार्थ्यांना विहीत कालावधीत सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी असलेली शासनाच्या विविध विभागातील मर्यादित पदसंख्या यांचे व्यस्त प्रमाण विचारात घेता, संबंधित विद्यार्थी/ उमेदवार सामाजिक दायित्व सेवेकरीता पात्र असून देखील त्यांना विहीत वेळेत सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध करुन देता येत नाही. परिणामी अनेक उमेदवारांना पात्रता असून देखील सामाजिक दायित्व सेवा पूर्ण नसल्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास आवश्यक प्रवेश पात्रतेची अट पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.

तसेच नव्याने उत्तीर्ण उमेदवार हे वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रमानंतर केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र होण्यासाठी सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी ते पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सेवा देत नाहीत. सदर उमेदवार हे वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम नुकतेच उत्तीर्ण झालेले असल्याने ते आपत्कालीन सेवा देण्यास देखील पुरेसे सक्षम नसतात.

प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०९/०७/२०२५ रोजी मंत्रिमंडळ सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित बैठकीत झालेल्या चर्चेस अनुसरुन, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाची एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा याबाबत विभागाच्या धोरणाचा पुनर्विचार करुन सदर धोरण रद्द करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने सहमतीसह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास सादर केला आहे.

उपरोक्त सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन राज्यातील शासकीय / महानगरपालिका/ शासन अनुदानित/खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतून वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाची एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

  शासन निर्णयः-

राज्यातील शासकीय/महानगरपालिका/शासन अनुदानित/खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतून वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाची एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवेची अट याव्दारे रद्द करण्यात येत असून, वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या सामाजिक दायित्व सेवेच्या अटीबाबत उपरोक्त संदर्भाधीन विविध शासन निर्णयांतील तरतूदी देखील खालील अटींच्या अधीन राहून याव्दारे अधिक्रमित / रद्द करण्यात येत आहेत.

i. जे उमेदवार सामाजिक दायित्व सेवेस पात्र असून देखील त्यांना सामाजिक दायित्व सेवेचे अद्यापी वाटप झालेले नाही अथवा काही कारणास्तव त्यांना सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करता आलेली नाही, अशा उमेदवारांना नव्याने अथवा उर्वरीत कालावधीकरीता सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही.

ii. सद्यस्थितीत ज्या उमेदवारांची सामाजिक दायित्व सेवा सुरु आहे त्यांना उर्वरीत विहित कालावधीकरीता सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करणे हे अनिवार्य राहील.

iii. सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत ज्या उमेदवारांना ऑनलाईन पोर्टलव्दारे नोंदणी केल्यानंतर सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध झालेली आहे व त्यानुसार सदर उमेदवार सामाजिक दायित्व सेवेच्या ठिकाणी रुजू झालेला असेल तर त्यास सामाजिक दायित्व सेवा पुर्ण करणे अनिवार्य राहील. तथापि असा
उमेदवार सामाजिक दायित्व सेवेच्या ठिकाणी रुजू झालेला नसेल तर त्यास सामाजिक दायित्व सेवा पुर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही.

iv सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून कोणत्याही उमेदवारास सामाजिक दायित्व सेवेचे वाटप करण्यात येऊ नये. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमानंतर सामाजिक दायित्व सेवेचे वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेले ऑनलाईन पोर्टल तातडीने बंद करण्यात यावे.

V ज्या उमेदवारांनी सामाजिक दायित्व सेवेबाबत यापूर्वी निर्गमित विविध शासन निर्णयांतील तरतूदींप्रमाणे विहित केलेल्या दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन सदर सेवेतून सूट मिळविलेली आहे, अशा उमेदवारांना सदर दंडाच्या रक्कमेचा कोणताही परतावा अनुज्ञेय असणार नाही.

३. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०७२३१७३५००८१५१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

SWAPNA
NILESH
DESHPANDE
(स्वप्ना देशपांडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाच्या सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करणेबाबत MBBS Samajik Dayitva Seva
वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाच्या सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करणेबाबत MBBS Samajik Dayitva Seva

Leave a Comment

error: Content is protected !!