Local Holiday Declared
Local Holiday Declared
अधिसूचना
सामान्य प्रशासन विभाग, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२५.
परक्राम्य संलेख
अधिनियम. १८८१
क्रमांक:- सार्वसु-११२५/प्र.क्र.१७४/जपुक (२९) ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक ८ मे १९६८ च्या अधिसूचना क्रमांक ३९/१/६८/JUDI-II, दिनांक ०८ मे, १९६८ अन्वये केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने २०२५ सालासाठी महाराष्ट्र राज्यात एकूण २४ सार्वजनिक सुट्टया अधिसूचना क्र.सार्वसु ११२३/प्र.क्र.१४८/कार्या-२९, दि.०४ डिसेंबर, २०२४ अन्वये जाहिर केल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांपैकी, ईद-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी दर्शविली आहे. मुस्लिमांचा धार्मिक सण ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने, राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे;
म्हणून, आता, महाराष्ट्र सरकार, दिनांक ८ मे १९६८ च्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा XXVI) च्या कलम २५ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहिर करण्यात येत आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी, शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसास्व नावाने,
(दिलीप देशपांडे) उप सचिव, महाराष्ट्र शासन
Also Read 👇
Local Holiday Declared
शासन परिपत्रकः
गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत…
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९)
मुंबई
दिनांक : १८ डिसेंबर, २०२४.
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येते. त्यानुसार सन २०२५ मध्ये पुढीलप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
Local Holiday 2025 Declared in Maharashtra
अ.क्र. सुट्टीचा दिवस
इंग्रजी तारीख
भारतीय सौर दिनांक
वार
१ गोपाळकाला (दहिहंडी)
१६ ऑगस्ट, २०२५
२५ श्रावण शके १९४७
शनिवार
२ अनंत चतुर्दशी
०६ सप्टेंबर, २०२५
१५ भाद्रपद शके १९४७
शनिवार
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार
जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२१८१८०२०५४५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
(दिलीप देशपांडे) शासनाचे उप सचिव


