Mahaparinirvan Diwas Quiz
Mahaparinirvan Diwas Quiz
Mahaparinirvan Diwas
Mahaparinirvan Din
Dr. Babasaheb Ambedkar’s death anniversary
Mahaparinirvan Diwas
Dr. Mahaparinirvan Day of Babasaheb Ambedkar : Prashn Manjusha
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिन : प्रश्न मंजुषा
Dr. Babasaheb Ambedkar’s Mahaparinirvana Day Quiz
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिन : प्रश्न मंजुषा
Dr. Babasaheb Ambedkar’s Mahaparinirvana Day Quiz
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
[१४ एप्रिल १८९१-६ डिसेंबर १९५६]
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ”प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला. त्यांचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. भारताच्या संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या या महामानवाने ६ डिसेंबर १९५६ साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला?
१४ एप्रिल १८९२
१४ एप्रिल १८९१क
०६ डिसेंबर १८५६
१४ आक्टोंबर १८५६
परदेशात शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या राजाने आर्थिक मदत केली ?
हैद्राबादचा निजाम
ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे
बडोदाचे सयाजीराव गायकवाड
सातारचे भोसले राजे
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ या पुरस्काराने केंव्हा सन्मानित करण्यात आले ?
१४ एप्रिल १९९०
०६ डिसेंबर १९९०
६ डिसेंबर १९९२
१४ एप्रिल १९९२
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सार्वजनिक कार्याला कुठून सुरवात केली ?
काळाराम मंदीर,नाशिक
चवदार तळे,महाड
अस्पृश्यांची परिषद, माणगाव
धर्मांतरचा घोषणा,येवला
कोणत्या मुख्य कारणामूळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला ?
हिंदू कोड बिलावरुन
मंडल आयोगावरुन
रेल्वे अपघातामूळे
संस्थानिकांच्या विलनीकरणामुळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या राजकिय पक्षाचे नाव काय ?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
स्वतंत्र मजूर पक्ष
समाजवादी पार्टी
समता पार्टी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेले नियतकालिक ( वृतपत्र ) कोणते ?
समता
दीनबंधू
बहिष्कृत भारत
पुढारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध,महात्मा जोतीराव फुले व संत कबीर यांना आपले गुरु मानले.
बरोबर
चूक
स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्थ खात्याचे मंत्री होते.
बरोबर
चूक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे नाव काय ?
मिलींद महाविद्यालय
रयत शिक्षण संस्था
सिद्धार्थ महाविद्यालय
पिपल्स एज्यूकेशन सोसायटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये संपन्न झालेल्या किती गोलमेज परिषदांना उपस्थित होते ?
एक
दोन
तीन
कधीही नाही
जातिय निवाड्याविरुद्ध महात्मा गांधीनी सुरु केलेले आमरण उपोषण सुटावे म्हणून कोणत्या करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी केली ?
पुणे करार
लखनौ करार
लाहोर करार
दिल्ली करार
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पी एच डी ही पदवी कोणत्या विद्यापिठातून मिळवली ?
सिडने विद्यापीठ
लंडन स्कूल ऑफ इकाँनाँमिक्स
कोलंबिया विद्यापीठ
केंब्रीज विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर कोणत्या राज्यातून निवडून गेले होते?
उत्तर प्रदेश
बिहार
महाराष्ट्र
बंगाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण कोणत्या शहरात झाले ?
दिल्ली
औरंगाबाद
मुंबई
नागपूर
“माझे संविधान माझा अभिमान” प्रश्न मंजुषा नक्की सोडवा या ओळीला स्पर्श करा
Dr Ambedkar Mahaparinirvan Diwas Holiday
Mahaparinirvan diwas
What is mahaparinirvan diwas
Mahaparinirvan diwas meaning
Mahaparinirvan diwas date
The death anniversary of which leader is observed as mahaparinirvan diwas
Best
Bhut acchi malumat mili
Good
V. Good
Excellent 👌
This is very useful information for me