Mahaparinirvan Din Sutti Jahir
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत..
दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२५.
वाचा : १.
सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/ जपुक (२९), दि. १८.१२.२०२४.
२. सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक क्र. स्थानिसू-२०२५/प्र.क्र. १४८/जपुक (२९), दि. ७.०८.२०२५
शासन परिपत्रकः
उपरोक्त वाचा क्र. २ येथील शासन शुद्धीपत्रक दि. ०७.०८.२०२५ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सन २०२५ या वर्षी दि. ०८ ऑगस्ट रोजी “नारळी पौर्णिमा” व दि.०२ सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२५ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
| अ.क्र. | सुट्टीचा दिवस | इंग्रजी तारीख | भारतीय सौर दिनांक | वार |
| १ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन | ०६ डिसेंबर, २०२५ | १५ मार्गशीर्ष, शके १९४७ | शनिवार |
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/॥/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१११९१२२३००२६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासनाचे उप सचिव
Mahaparinirvan Din Sutti Jahir
👉परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈