Mahatma Jyotirao Fule Donshe Vi Janmshatabdi Varsh
Mahatma Jyotirao Fule Donshe Vi Janmshatabdi Varsh
Mahatma Jyotirao Fule Donshe Vi Janm Shatabdi Varsh Sajra karne Upkram Samiti gr circular
Mahatma jyotiba fule Donshe vi janm Shatabdi varsh
Mahatma Jyotirao Phule Bicentennial anniversary year
Mahatma Jyotirao Phule anniversary year Bicentenary
Activities to celebrate the 200th birth centenary of Mahatma Jyotirao Phule
Regarding the formation of a committee for the implementation of initiatives to celebrate the 200th birth centenary of Mahatma Jyotirao Phule in the year 2027

महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र.५२/एस.डी.-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
दिनांक :- १० एप्रिल, २०२६.
वाचा :- सामान्य प्रशासन विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक: शताब्दी-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-२, दिनांक १० मार्च, २०२६
प्रस्तावना :-
महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व मानवीमूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी १९ व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला.
त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच महात्मा फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात.
महात्मा फुले यांच्या जयंतीला सन २०२७ मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमीत्ताने मा. मुख्यमंत्री महोदयांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सन २०२७ हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. यानुसार सन २०२७ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमासाठी शासन निर्णय दि. १० मार्च, २०२६ अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत महात्मा जोतीराव फुले यांचे दि. ११ एप्रिल, २०२६ ते दि. १० एप्रिल, २०२७ या कालावधीत विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रांत केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, त्यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्यात यावेत.
१. दि. ११ एप्रिल, २०२६ रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व सर्व व्यस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे.
२. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यांच्या कार्याविषयी नियमित पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. त्यासाठी शाळांना पुस्तके पुरवून वाचनालये ही ज्ञानकेंद्रे म्हणून स्थापन करावीत.
३. महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करावे.
४. ऑनलाइन वेबिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांचे स्फूर्तिदायी लेखन व विचार यावर परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावीत.
५. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने महात्मा जोतीराव फुले यांचे स्री-शिक्षण आणि सामाजिक न्याय योगदानावर राज्यस्तरीय परिसंवाद, चर्चासत्रे, शैक्षणिक प्रबंध सादरीकरण कार्यशाळा आयोजित करावी.
६. महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटनांवर आधारित पथनाट्य, एकपात्री नाटक यांचे शालेय स्तरावर आयोजन करावे.
७. राज्यातील शाळांमध्ये, “महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह” साजरा करणे.
८. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी पुढील दिलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन #Phule २०० अभियान या HASHTAG चा उपयोग करून साजरे केलेल्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ व साहित्य अपलोड करण्यात यावे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालये यांनी आपल्या अधिनस्त राज्यातील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल या दृष्टीने नियोजन व सनियंत्रण करावे.
९. ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत, उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम/घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. परंतु, आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम/घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरिता ऐच्छिक राहील.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने उपक्रम, कार्यक्रम साजरा करावयाचा कृती आराखडा

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने उपक्रम, कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आपल्या अधिनस्त राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांचा दरमहा आढावा घ्यावा. या दृष्टीने नियोजन व सनियंत्रण करावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०४१०१८२९१३६४२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
TUSHAR VASANT MAHAJAN
Digitally signed by TUSHAR VASANT MAHAJAN DN-IN-GOVERNMENT OF MAHARASHTRA, SCHOOL EDUCATION AND SPORT DEPARTMENT, 2.5.4.20-15c6c23f50a80926eb7ee5db2359794523989181 186340 Арабска22, postalCode-400032, st-Maharashtra, serialNumber-1A39CEF SC15789EE6A2ABES779ACF233682613F789C3 35068F4877267695CECA, cn-TUSHAR VASANT MAHAJAN Date: 2026.04.10 18:30:16+0530
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन

ALSO READ 👇
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच एक पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अंतर्गतच्या उपक्रमांबाबत अवगत केले आहे.
द्विशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक आणि कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. ११ एप्रिल २०२६ रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमांची सुरुवात होणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकारातून शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच एक पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अंतर्गतच्या उपक्रमांबाबत अवगत केले.
महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंधने याविरुद्ध लढा देत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि मानवी मुक्तीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फुले दांपत्याने शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक आणि कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. 11 एप्रिल 2026 रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमांची सुरुवात होणार आहे.
व्याख्याने, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी महात्मा फुले यांच्या कार्यावरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळांमध्ये वाचनालये ज्ञानकेंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत. तसेच त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्याने, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचा प्रसार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
शालेयस्तरावर पथनाट्य, एकपात्री नाटके, समता दौड, ग्रामभेट, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, विज्ञान उपक्रम, आयसीटी आधारित उपक्रम अशा विविध स्पर्धा व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न होणार आहे. याशिवाय, #Phule200 या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी साजऱ्या केलेल्या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि साहित्य ऑनलाइन अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत या सर्व कृती कार्यक्रमांचे आयोजन शाळांसाठी अनिवार्य राहणार असून विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक असेल.
महिनानिहाय आखलेल्या कृती आराखड्यानुसार एप्रिलमध्ये जनजागृती, जूनमध्ये पर्यावरण व जलसंवर्धन, जुलैमध्ये सामाजिक समता, ऑगस्टमध्ये समाजसेवा, सप्टेंबरमध्ये नवोपक्रम, ऑक्टोबरमध्ये स्त्री सक्षमीकरण, नोव्हेंबरमध्ये नेतृत्व व नागरिकत्व, डिसेंबरमध्ये सांस्कृतिक विकास, जानेवारीत संशोधन प्रकल्प, फेब्रुवारीत विविध स्पर्धा आणि मार्च 2027 मध्ये समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून दरमहा आढावा घेतला जाणार असून संबंधित यंत्रणांना नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महात्मा फुले यांची 200 वी जयंती ही केवळ उत्सव नसून सामाजिक परिवर्तनाची संधी आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये समता, शिक्षण आणि मानवता या मूल्यांची रुजवण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यानिमित्ताने केले आहे.
ALSO READ 👇
सन २०२७ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांची २०० वी जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमासाठी समिती गठीत करण्याबाबत….
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: शताब्दी-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२
दिनांक: १० मार्च, २०२६
प्रस्तावना :-
महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व मानवमूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी १९ व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा, श्रीदमन आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. शूद्र-अतिशूद्र, वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, पाणी, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच महात्मा फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समरसता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात.
महात्मा फुले यांचा जन्म दि. ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या जन्माला दि.११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सन २०२७ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांची २०० वी जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सन २०२७ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांची २०० वी जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.
अ.क्र. नाव व पदनाम समितीतील पदनाम
१ मा. मुख्यमंत्री
अध्यक्ष
२ मा. उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
सदस्य
३ मा. उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ
सदस्य
४ मा. मंत्री, महसूल
सदस्य
४ मा. मंत्री, शालेय शिक्षण
सदस्य
५ मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
सदस्य
६ मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण
सदस्य
८ मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य
सदस्य
९ मा. मंत्री, महिला व बाल विकास
सदस्य
१० मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज
सदस्य
११ मा. मंत्री, सामाजिक न्याय
सदस्य
१२ प्रधान सचिव (प्र.ना.उ.व सु.), सामान्य प्रशासन विभाग
सदस्य सचिव
०२. सदर समिती, महात्मा जोतीराव फुले यांचे दिनांक ११ एप्रिल, २०२६ ते दिनांक १० एप्रिल, २०२७ या कालावधीत जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवील.
०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्र. २०२६०३१०१६५९२३८७०७ आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Digitally signed by HEMANT ANANT MAHAJAN Date: 2026.03.10 17:00:32 +05’30’ (हेमंत महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, लोकभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. उपमुख्यमंत्री (रा.उ.शु.), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
७. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
८. मा. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृहे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
९. सर्व सन्माननीय संसद सदस्य/विधानमंडळ सदस्य
१०. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
११. मा. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
१२. सर्व विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य.
१३. प्रधान सचिव (प्र.ना.उ. व सु.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. निवडनस्ती
