Jalsandharan Din
Jalsandharan Din GR
राज्यस्तरीय रील स्पर्धा: ‘Reel for Soil and Water Conservation’
माती आणि जलसंधारणाचा संदेश पोहोचवण्यासाठी राज्य शासनाचा अभिनव उपक्रम! तरुणांसाठी सुवर्णसंधी ३० ते ६० सेकंदांची रील बनवून आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी.
Jalsandharan diwas GR
Jalsandharan Day Shasan Nirnay
Water Conservation Day Government Resulovation
maharashtra rajyache maji mukhyamantri sudhakarravaji naik yancha janmdivas 21 august ha “jalsandharan din” mhanun sajara karanebabat
Regarding celebrating the birthday of former Chief Minister of Maharashtra State Sudhakarraoji Naik, 21st August, as “Water Conservation Day”
Additional instructions regarding the celebration of “Water Conservation Day” and “Water Conservation Week/Campaign” on 21st August.
21 august “jalsandharan din” aani “jalsandharan saptah / abhiyan” sajara karanebabat atirikt suchana
२१ ऑगस्ट “जलसंधारण दिन” आणि “जलसंधारण सप्ताह / अभियान” साजरा करणेबाबत अतिरिक्त सूचना.
महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७० (E-१३३४६७१)/ जल-७ मंत्रालय, मुंबई
दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२६
वाचाः मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७० (E-१३३४६७१)/जल-७, दि.०३.०७.२०२६
प्रस्तावना :
राज्यातील अनेक भागामध्ये खालावलेली भूजल पातळी आणि पाणी टंचाई वर कायमस्वरुपी उपाय म्हणून, मोठ्या धरणावर अवलंबून राहण्याऐवजी पाणलोट विकास आणि भूजल पुर्नभरणावर भर देण्यासाठी “पाणी अडवा, पाणी जिरवा” हा मूलमंत्र देत राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी उभी केली. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा “जलसंधारण दिन” म्हणून राज्यात साजरा करणेबाबत शासन निर्णय दि.०३.०७.२०२६ अन्वये निर्णय घेण्यात आला आहे.
२. मृदसंधारण व जलसंधारण हे शेती, पर्यावरण व शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पिढीसाठी त्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. जनसमूदायामध्ये याबाबतची जागरुकता वाढविणे गरजेचे असून आजच्या युवा पिढीला याचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.
३. राज्यात “जलसंधारण दिन” साजरा करताना राज्यातील युवा पिढीचा सहभाग वाढविण्याकरिता आणि क्षेत्रिय स्तरावर नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याकरिता अतिरिक्त सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय :
शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्व पटवून देण्याकरिता राज्यात दि. १५ ऑगस्ट, २०२६ ते दि.२१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान “जलसंधारण सप्ताह” आणि दि. १५ ऑगस्ट, २०२६ ते दि. २६ जानेवारी, २०२७ दरम्यान “जलसंधारण अभियान” आयोजित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. २१ ऑगस्ट रोजी शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत राज्यव्यापी जनजागृती
करुन जलसंवर्धगाला लोकचळवळीचे स्वरुप देण्यासाठी “महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर” (“Maha
Walkathon-Walk for Water”) या उपक्रमाचे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात आयोजन करण्यात यावे.
a) Theme: Save Soil, Save Water, Secure Tomorrow
b) घोषवाक्य: पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा.
c) कार्यक्रमाचे स्वरुप: राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात २९ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा
वॉकेथॉन) चालणे. मृद व जलसंधारणाची शपथ घेणे.
d) सदर कार्यक्रमाच्या आयोजनाची आणि कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी शासन निर्णय,
दि.१३.०२.२०२६ अन्वये गठित जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून
जिल्हाधिकारी महोदयांची राहील. २९ ऑगस्ट रोजी खाली नमूद केल्याप्रमाणे सर्वांना निमंत्रित
करण्यात यावे.
e) विशेष निमंत्रित : मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री (नगरविकास), मा.उपमुख्यमंत्री (राज्यउत्पादन
शुल्क), मा.सर्व मंत्री, मा.सर्व राज्यमंत्री, मा. राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा
सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर/ उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/
उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद/ पंचायत समिती/ ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/
नगरपालिका/ नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी.
सहभागी अधिकारी: मुख्य सचिव, सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व विभागीय
आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व
पोलीस आयुक्त/पोलीस अधिक्षक, सर्व शासकोय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकोय
अधिकारी व कर्मचारी,
g) इतर सहभागी: जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती/ डॉक्टर/ कलाकार/ उद्योजक,
जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविदयालयीन व शालेय
विद्यार्थी, NCC, NSS, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड
क्रॉस,होमगार्ड ,स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य,
सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, CSR भागीदार कंपन्या, विविध क्रीडा
संघटना, गुड मॉनिंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक.
h) स्पर्धेसाठी वयोगट: वय १५ वर्षे व त्यावरील सर्व पुरुष व महिला स्पर्धक सहभागी होण्यास पात्र
राहतील.
i) राज्यस्तरावरील कार्यक्रम: २१ ऑगस्ट रोजी मुंबई मध्ये आयोजित करावा.
j) महा वॉकेथॉन मार्ग: संबंधीत जिल्हाधिकारी यांनी याबाबत नियोजन करावे.
k) नोंदणी: QR आधारित ऑनलाईन नोंदणी, २१९ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी
प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र.
1) साहित्य: प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीस टि-शर्ट, कॅप, मी जलदूत बॅज देण्यात यावा.
m) वेळापत्रक:
- सकाळी ६.०० वाजेपर्यंत – कार्यक्रम स्थळी आगमन
- सकाळी ६.१५ वा.- वॉर्म अप
- सकाळी ६.४५ वा.- मृद व जलसंधारणाची शपथ
- सकाळी ७.०० वा.- मान्यवरांमार्फत हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉन ला प्रारंभ.
- सकाळी ८.०० वा.- महा वॉकेथॉन समाप्त.
- सकाळी ८.३० वा.- संदेश, पुरस्कार वितरण व आभार.
n) महा वॉकेथॉनमध्ये प्रथम पाच विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह जिल्हाधिकारी
महोदयांमार्फत देण्यात यावे.
०) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त पिण्याचे पाणी, वैदयकीय मदत, पोलीस बंदोबस्त, वाहतुक
नियंत्रण आणि आपत्कालीन सूविधा देणेबाबत नियोजन करण्यात यावे.
p) प्रसिध्दी: सदर कार्यक्रमाची प्रसिध्दी व्यापक स्वरूपात करण्यात यावी. प्रसिध्दीसाठी सोशल
मिडीया वर #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग
वापरण्यात यावे.
q) जिल्हाधिकारी महोदयांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक विभागाला निश्चित सहभागी संख्या देण्यात
यावी. उदाहरणार्थ: शालेय शिक्षण विभाग- ३००० विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग-२०००
विद्यार्थी, NCC / NSS / MY Bharat-400 सहभागी, शासकीय अधिकारी व कर्मचारी-
१००० सहभागी, स्वयंसेवी संस्था व नागरिक- ५००० सहभागी. अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात
किमान १०,००० ते १५,००० सहभागी सहज नोंदवता येतील आणि सदर कार्यक्रमास व्यापक
लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होईल.
r) सदर कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसिध्दी, बक्षिसे ब साहित्य वाटपासाठी माहिती a जनसंपर्क
संचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली संस्था
राज्यभरात जिल्हाधिकारी महोदयांना सहकार्य करेल.
s) महा वॉकेथॉनसाठी QR Code, ई-प्रमाणपत्र, प्रमाणपत्रावरील युनिक नंबर, प्रमाणपत्रावरील
स्वाक्षरी याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क संचालनालयाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत
करण्यात येईल.
3. तसेच, १५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात
मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे.
a) उद्दिष्ट- महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन
Instagram च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक
जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी “Reel for Soil and Water Conservation” Fat
आयोजित करण्यात यावी.
b) Theme: Save Soil, Save Water, Secure Tomorrow
c) सोशल मिडीया वर हे #SaveSoilSaveWater हॅशटॅग वापरण्यात यावे. यामुळे एकाच
हॅशटॅगखाली विक्रमी GSM Reels तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होईल.
d) स्पर्धेचे स्वरूप:
- स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात यावी.
- पात्र वयोगट – १५ ते ३० वर्षे.
- प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी.
- व्हिडीओ/ रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ/ tert उद्देश, स्वत:चे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव
- नमूद करावे.
- Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी.
- मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक
राहील.
- अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरणे अनिवार्य राहील.
e) स्पर्धसाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत एक अधिकृत QR
Code तयार करण्यात येईल. QR Scan केल्यानंतर — नोंदणी — Reel Link Submit > जिल्हा
निवड — Verification > सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया असेल. Instagram हॅशटॅगबरोबर
स्वतंत्र डिजिटल नोंदणी केल्यामुळे शासनाकडे प्रत्येक सहभागीची अधिकृत नोंद उपलब्ध राहील,
f) रील्स अपलोड करण्याचा कालावधी: १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट
g) या स्पर्धेत सहभागी होणार्यास जास्तीत जास्त तीन रील अपलोड करता येतील
h) Reel साठी संभाव्य विषय:
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे
संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी
मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या
नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन — उद्याचे सुरक्षित भविष्य
i) रिल्स बनवितांना Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI
Creative, Comedy, Short Film, Before-After, Drone Visuals किंवा अन्य
नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येईल.
j) मात्र Reel चा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक राहील.
k) गुणांकन पद्धती:
- विषय व संदेश – ३० गुण
- कल्पकता – २५ गुण
- प्रभावी सामाजिक संदेश – २० गुण
- सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ गुण
- Instagram Engagement — १० गुण
- एकूण — १०० गुण
- केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social
- Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात यावा.
- उक्त गुणांकानुसार विजेत्याची निवड जिल्हाधिकारी महोदयांनी करावी.
l) पुरस्कार: जिल्हास्तरावर महाराष्ट्र युवा जलदूत या नावाने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासहित
खालील ३ पुरस्कार २९ ऑगस्ट रोजी देण्यात यावे.
- प्रथम पुरस्कार — रु. २५,०००/-
- द्वितीय पुरस्कार — रु. १५,०००/-
- तृतीय पुरस्कार — रु. १०,०००/-
- उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात यावे.
m) युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे व महाविद्यालये, शाळा, NSS, NCC, नेहरू युवा केंद्र, क्रीडा व युवक संस्था, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संस्था, Insta gram Creators, YouTubers, Social Media Influencers ard सहकार्य घ्यावे.
n) रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश:
“एक Reel… मातीसाठी /, एक Reel… पाण्यासाठी /, एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी |”
o) या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ स्पर्धा आयोजित करणे नसून युवकांच्या माध्यमातून मृद व
जलसंधारणाची विक्रमी डिजिटल लोकचळवळ निर्माण करणे हे असेल. १ लाख युवक- १ लाख
रिल्स- मृद व जलसंधारणाचा एकच संदेश असे स्वरुप स्पर्धेचे राहिल.
४. उक्त नमूद स्पर्धांसोबतच १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी या जलसंधारण अभियान दरम्यान राज्यातील
सर्व ३६ जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये खालील कार्यक्रम घेण्यात यावे. उत्कृष्ट कामगिरी
करणा-या शाळा व महाविद्यालयांना आणि उत्कृष्ट सादरीकरण करणा-या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी
रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात यावे.
a)) निबंध स्पर्धा (जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व, जल है तो कल है, जलसंवर्धन उपाय,
घरातील पाण्याचा वापर- Water Bud. get).
b)) चित्रकला/ पोस्टर स्पर्धा- जलसंवर्धन उपाय, पाणी बचत उपाय, Rainwater Harvesting.
C)) वाद-विवाद स्पर्धा: विषय- जलसंधारण शासनाची जबाबदारी कि जनतेची जबाबदारी, इतर
d) एक शाळा- एक शोषखड्डा उपक्रम राबविणे.
e) सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्व विद्यार्थांना सांगणे.
f) जलमित्र/ जलदूत घोषित करणे.
g) २१ ऑगस्ट रोजी शाळेत मा. सुधाकरराव नाईक यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करणे,
h) २१ ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारणाची शपथ घेणे,
i) २१ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र/ सन्मानचिन्ह/ पुरस्कार वितरण करणे,
j) २१ ऑगस्ट रोजी गावातील किंवा शहरातील जलतज्ञ/प्रतिष्ठीत व्यक्ती यांस प्रमुख पाहूणे
म्हणून आमंत्रित करणे.
k) शाळा व महाविद्यालयांमध्ये उक्त उपक्रम यशस्वी होण्याकरिता जिल्हा क्रिडा अधिकारी,
शिक्षण अधिकारी यांवर जिल्हाधिकारी महोदयांनी जबाबदारी सोपवावी.
५. पाणी हे ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील नागरिकांसाठी मुलभूत निकड आहे. सबब,
१५ ऑगस्ट ते २६ जानेवारी या जलसंधारण अभियान दरम्यान क्षेत्रिय स्तरावर खालील कार्यक्रम
घेण्यात यावेत.
a) ग्रामीण भागात व शहरी भागात मृद व जलसंधारण कामांचे भूमीपूजन/ लोकार्पण/ जलपूजन करणे.
b) केंद्र शासनाच्या कॅच द रेन पोर्टल वर अद्यावत कामांचे स्थळी भेट देणे.
c) अमृत सरोवरला भेट देणे. सरोवराच्या आसपास वृक्षारोपण करणे.
d) हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी ग्रामीण भागात व शहरी भागात वृक्षारोपण करणे.
e) एक पेड मॉ के नाम अभियान राबविणे.
f) लोकसहभागातून कामे करणे (नाला/ तलाव/ विहीर/ पाझर तलाव स्वच्छता).
g) शेततळे/ शेतबंधारे/ CCT/ Deep CCT यांची पाहणी करुन फोटो काढणे.
h) याकरीता, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात महानगरपलिका आयुक्त,
मुख्याधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांवर जिल्हाधिकारी महोदयांनी जबाबदारी सोपवावी.
i) वृक्षारोपणासाठी क्षेत्रीय स्तरावर सामाजिक वनीकरण, वनविभाग आणि कृषि विभागाने मुबलक रोपे
उपलब्ध करुन द्यावी, तशा सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी द्याव्यात.
६. जलसंधारण सप्ताह कालावधीत आणि २१ ऑगस्ट रोजी खालील नमूद मृद ब जलसंधारणाची
शपथ घेण्यात यावी.
“मी. महाराष्ट्राचा सुजाण व जागरूक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेतो/बेते की– माती आणि पाणी
ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे; याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी सी सदैव कटिबद्ध राहीन:
पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन; पाण्याचा अपव्यय टाळेन आणि “पाणी अडवा; पाणी जिरवा” हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेन.
पाणलोट विकास; गद व जलसंधारण; पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या
उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करीन. “साती वाचवा; पाणी जपा सुरक्षित भविष्य
घडवा” हा संकल्प मनाशी बाळगून जलसगृद्ध दुष्काळमुक्त व शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र
शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन. चला माती वाचवू — पाणी जपू ! जल समृद्ध महाराष्ट्र घडवू!
जय हिंद! जय महाराष्ट्र”
७. जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी महोदयांची
जबाबदारी
a) राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात “महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर” (“Maha Walkathon-Walk
for Water”) या उपक्रमाचे आयोजन करणे.
b) जलसंधारण सप्ताह/ अभियान दरम्यान राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रिल्स
स्पर्धाचे आयोजन करणे.
c) उक्त कार्यक्रमात जिल्ह्यातील कृषी, ग्राम विकास, महसूल व वन, जलसंपदा, पाणी पुरवठा आणि
स्वच्छता, रोहयो, शिक्षण या विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग असेल, याबाबत
सर्वांना जिल्हास्तरावरून सूचना देणे.
d) जलसंधारण सप्ताह/ अभियान दरम्यान राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये
आणि क्षेत्रिय स्तरावर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रा, विविध शासकिय
कार्यलयांमध्ये उक्त नमूद कार्यक्रम आयोजित करणे आणि मृद व जलसंवर्धनबाबत जनजागृती
घडविणे.
e) जिल्हास्तरावर भूमीपूजन/ लोकार्पण/ जलपूजन करावयाच्या कामांची/ स्थळांची जागा निश्चित
करणे, लोकसहभागातून करावयाची कामे निश्चित करणे, वृक्षारोपण करावयाच्या स्थळांची जागा
निश्चित करणे.
f) जलसंधारण सप्ताह/ अभियान यशस्वी करण्यासाठी आणि राज्यस्तरावर जनजागृती करण्यासाठी
मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील विविध योजनांतर्गत काम करणा-या स्वयंसेवी संस्था
यांचा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी आवश्यक सूचना देणे.
g) विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये यांनी आयोजित केलेले कार्यक्रम व इतर
माहिती आणि त्याचे फोटो संकलित करून शासनास उपलब्ध करून देणे.
h) सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यम आराखडा
नियोजन व अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली संस्था आणि मृद व जलसंधारण विभागाचे
सर्व अधिकारी राज्यभरात जिल्हाधिकारी महोदयांना सहकार्य करतील.
८. २१ ऑगस्ट जलसंधारण दिन आयोजन जिल्हा माहिती अधिकारी यांच्या व माहिती व जनसंपर्क
संचालनालयाकडून कार्यारंभ आदेश प्राप्त संस्थेच्या समन्वयाने करण्यात यावे. २९ ऑगस्ट जलसंधारण
दिनाच्या आयोजनासाठी होणारा खर्च मागणी क्र. झेडएच-३, मुख्य लेखाशिर्ष २४०२- मृद व जलसंधारण, १०२- मृद संधारण, (०१) मृद व जलसंधारण, (०१)(०१) पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम प्रसिध्दी व पारीतोषिक (कार्यक्रम), २६- जाहिरात व प्रसिध्दी, २४०२ ए १९३ खाली सन २०२६-२७ मधील मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.
९. २१ ऑगस्ट जलसंधारण दिनाच्या आयोजनासाठी होणारा खर्च करण्यास माहिती व जनसंपर्क
संचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या मान्यतेस अनुसरून मान्यता
देण्यात येत आहे.
१०. प्रस्तुत प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रम राबविण्यासाठी खर्च करतांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/ आदेश/ परिपत्रके यानुसार तसेच वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र/१०१२/प्र. क्र. ३०/२०१३/विनियम, दि. १७.०४.२०१५ अन्वये निर्गमित केलेल्या वित्तिय प्राधिकारानूसार नमूद अटी व शर्तीचे पालन करावे. तसेच, उद्योग विभागाच्या खरेदी धोरणानूसार विहित तरतूदी व कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेताक २०२६०८०७१९१६४३०४२६ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्य आदेशानुसार व नावाने,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी https://register.mahaevent.co.in ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे.
मृद व जलसंधारण विभागाचे सोशल मीडिया अकाऊंट याप्रमाणे.
Instagram – https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en
Facebook – https://www.facebook.com/mahawalkathon2026
Twitter –https://x.com/MahaWalkathon26

सर्व नागरिकांना विनम्र आवाहन
💧🌧️ “कॅच द रेन 2026” – जलसंवर्धनाची शपथ घेऊया! 🌧️💧
पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. चला, जलसंवर्धनासाठी आपली जबाबदारी ओळखून “Catch the Rain 2026” या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊया.
👉 खालील लिंकवर क्लिक करून अवघ्या 1 मिनिटात आपली शपथ पूर्ण करा.
🔗
https://pledge.mygov.in/catch-the-rain-2026
✅ स्वतः शपथ घ्या.
✅ आपल्या कुटुंबीयांनाही शपथ घेण्यास प्रोत्साहित करा.
✅ हा संदेश आपल्या सर्व WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा.
“पाऊस जिथे पडतो, तिथेच पाणी अडवा – प्रत्येक थेंब वाचवा!” 💧🇮🇳
CatchTheRain
catchtherain2026
majhivasuandhara7

याबाबतचा शासननिर्णय मृद व जलसंधारण विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
सुधाकररावनाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून २००३ पासून साजरा केला जात होता. मात्र आता त्यात बदल करून त्यांच्या जन्मदिवशी २१ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा “जलसंधारण दिन” म्हणून साजरा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७० (E-१३३४६७१)/जल-७हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक : ०३ जुलै, २०२६
प्रस्तावना :
स्व. सुधाकररावजी नाईक हे सन १९९१ ते १९९३ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागामध्ये खालावलेली भूजल पातळी आणि पाणी टंचाई वर कायमस्वरुपी उपाय म्हणून, मोठ्या धरणावर अवलंबून राहण्याऐवजी पाणलोट विकास आणि भूजल पुर्नभरणावर भर देण्यासाठी “पाणी अडवा, पाणी जिरवा” हा मूलमंत्र देत राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ त्यांनी उभी केली.
२. नविन प्रकल्पापेक्षा अस्तित्वात असलेले जुने जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यावर आणि माती नाला बांध, सलग समतल, नाला बंडीग यासारख्या छोटया मृद व जलसंधारण संरचना बांधण्यावर त्यांनी भर दिला. याकरिता, त्यांनी सन १९९२ साली स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना करुन जलसंधारणाची कामे हे केवळ सरकारी योजना न राहता लोकचळवळ बनावी यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले.
३. महाराष्ट्रातील प्रसिध्द रोजगार हमी योजनेचा वापर जलसंधारणाच्या कामासाठी करुन दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम दिले. यामुळे राज्यात ग्रामीण भागात एकाच वेळी रोजगार निर्माण झाला आणि जलसाठे निर्माण होण्यास मदत झाली.
४. माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा स्मृती दिवस १० मे राज्यात सन २००३ पासून “जलसंधारण दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे. १० मे ऐवजी माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा “जलसंधारण दिन” म्हणून राज्यात साजरा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय :
माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा “जलसंधारण दिन” म्हणून राज्यात दरवर्षी शासकीय स्तरावर साजरा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर खालील कार्यक्रम करण्यात यावे.
१) मृद व जलसंधारण विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहाराने अभिवादन करण्यात यावे आणि “मृद व जलसंधारणाची शपथ” घेण्यात यावी.
२) मृद व जलसंधारणाच्या विविध योजनांतर्गत समाविष्ट कामांचे भूमीपूजन/लोकार्पण/जलपूजन करण्यात यावे.
३) मृद व जलसंधारणाचे महत्व पटवून देण्याकरिता प्रिन्ट मिडीया, सोशल मिडिया, न्यूज वाहिनी आणि स्थानिक पातळीवर प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी.
४) मृद व जलसंधारण विभागात उत्कृष्ट व उल्लेखणीय काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार/प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे.
५) मृद व जलसंधारणाच्या विविध योजनांतर्गत लोकसहभागाची/श्रमदानाची कामे करण्यात यावी.
३. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिनस्त असलेल्या आयुक्त (मृद व जलसंधारण), महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, जल व भूमी व्यवस्थापन संस्था, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता या सर्व कार्यालयांनी उपरोक्त नमूद कार्यक्रम साजरा करण्याचे नियोजन करावे. ४. राज्यात जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांना अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येणार नसून, योजनांतर्गत प्रशासकीय खर्च आणि कार्यालयीन खर्च यातील मंजूर तरतूदीतून कार्यक्रमावरील खर्च भागवावा.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०७०३१६२१३३६१२६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
DEVENDRA PANDIT BHAMARE
(देवेंद्र भामरे ) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
शासननिर्णय पीडीएफ लिंक 🔗
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202607031621336126….pdf
