I Got Karmayogi Registration Link
I Got Karmayogi Registration Link
I Got Karmayogi Training Registration Link Process Certificate
क्रमांक : आशिका २०२६ / साधना सप्ताह । GOT/ आस्था-अ१०७
दिनांक: Digitally signed
प्रति.
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे
३. अध्यक्ष, म.रा. माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ पुणे (राज्य)
४. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) म.रा.पुणे
५. शिक्षण संचालक (प्राथमिक) म.रा.पुणे
६. संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) म.रा.पुणे
७. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे
८. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
विषयः- दि. २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याबाबत
संदर्भ :- शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.५/प्राशि-५ दि.२५.०३.२०२६
उपरोक्त संदर्भाधीन शासन पत्र व सहपत्र यांचे अवलोकन व्हावे (प्रत संलग्न)
विषयांकित प्रकरणी भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७.०३.२०२६ रोजी झालेल्या VC द्वारे प्राप्त निर्देशान्वये दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल. २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. (पत्रांची प्रत सोबत जोडली आहे). त्यास अनुसरुन राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (IGOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) कार्यालय प्रमुखांना मे. २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या “TECH-वारी २.०” या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :-
अ) सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस पूर्ण करावेत. पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असावा.
ब) सदर कोर्सेस दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल. २०२६ या कालावधीत पुर्ण करावेत.
Sadhana Saptah Now Extended Till 10th April 2026
मुदत वाढ कर्मयोगी भारत साधना सप्ताह आता १० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे

क) आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सक्रियरित्या सहभागी व्हावे.
Digitally signed by
SACHINDRA PRATAP SINGH
Date: 30-03-2026 22:00:13
SADHANA Saptah iGOT Course List 2nd to 8th April 2026
During SADHANA Saptah (2nd–8th April 2026), all government employees shall complete courses from this curated iGOT list with a total cumulative duration of at least 4 hours.
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त, (शिक्षण)

“साधना सप्ताह” मध्ये iGot Karmayogi Portal वरती करावयाचे कोर्सेसः
वर्ग १ ते वर्ग ३ कर्मचाऱ्यांनी करावयाचे कोर्सेस
Sr. No. Course Name Course provider Duration Level
1 Build and Execute an Organisational Al Strategy
Coursera Instructor Network 5h 52m ¡GOT Marketplace Courses
2 Fundamentals of Generative Artificial Intelligence
IIT Madras 58m Intermediate
3 Do’s and Dont’s for Government Employees- Hindi
Institute of Secretariat Training and Management 54m Beginner
4 जलसुरक्षा वाढफवणे : जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन
By ATE Chandra Foundation 1h 13m Beginner
5 Deep tech and India ORF 53m Beginner
वर्ग ४ कर्मचाऱ्यांनी करावयाचे कोर्सेस
Sr. No. 1 Course Name Course provider Duration
2 Level Cybersecurity (Basic Level) IIT Madras 1h 24m Beginner
प्रशासन के लिये उत्तरदायी एआई का उपयोग
Wadhwani Foundation 44m Beginner
3 Do’s and Dont’s for Government Employees- Hindi
Institute of Secretariat Training and Management 54m Beginner
4 जलसुरक्षा वाढफवणे : जलस्रोतांचे पुनरुज्जीवन
By A TE Chandra Foundation 1h 13m Beginner
5 Deep tech and India ORF 53m Beginner

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०५/प्रशि-५
दिनांक : २५ मार्च, २०२६.
प्रति,
१. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई-४०००३२.
२. सर्व विभागीय आयुक्त
विषय: दि.२ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ राबविण्याबाबत.
महोदय/महोदया,
भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. (पत्रांची प्रत सोबत जोडली आहे). त्यास अनुसरुन राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (IGOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) खालील कार्यालय प्रमुखांना मे, २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या “TECH-वारी २.०” या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे:-
अ) मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (खुद्द विभाग अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालये)
ब) विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालये विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा)
०२. साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:-
अ) सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी GOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस करावेत. पुर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असावा. (GOT पोर्टलवरील आकडेवारीनुसार)
ब) सदर कोर्सेस दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत पुर्ण करावेत.
क) आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सक्रियरित्या सहभागी व्हावे, ही विनंती.
आपली,
व्ही. राधा)
अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन
👉 SADHANA Saptah iGOT Course List PDF LINK 👈
प्रत :-
१. सर्व जिल्हाधिकारी
२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी
३. सर्व ¡GOT MDO Leader

Sadhana Saptah 2026
‘साधना सप्ताह 2026’ (Sadhana Saptah 2026) (2 अप्रैल से 8 अप्रैल 2026)
‘साधना सप्ताह 2026’ भारत की सबसे बड़ी सहयोगी क्षमता निर्माण पहल है, जो 2 से 8 अप्रैल 2026 तक आयोजित की जा रही है।
इसे क्षमता निर्माण आयोग (Capacity Building Commission) द्वारा शुरू किया जा रहा है।
अधिक जानकारी के लिए PIB लिंक:
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2247374®=3&lang=2
SadhanaSaptah,हमबनेंकर्मयोगी,
Regarding admission of teachers in government schools to an online course on school safety.
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. शिसंमा/संकीर्ण/शाळा सुरक्षितता/विद्याशाखा/ए-१/06304
दिनांक : १६/०३/२०२६
17 MAR 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व.
विषय : शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत..
संदर्भ : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ नुसार शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये संचालनालयास कळविण्यात आले आहे. (संदर्भिय पत्राची प्रत सोबत जोडली आहे).
संदर्भाधीन पत्रान्वये दिनांक १६ जून, २०२५ नुसार IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर शिक्षकांसाठी शाळा सुरक्षितता या विषयावर ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त असणाऱ्या या कोर्स ची माहिती शिक्षकांपर्यंत पोहचवण्यात यावी.
(डॉ. सुचिता पाटेकर)
शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय महा. राज्य पुणे.
प्रत : माहितीस्तव.
१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. National Institute of Disaster Management, Ministry of Home Affairs, Gov.of India.
Mobile No: 09989528699, naziz.ccdrr@gmail.com.
📌 *I Got Karmayogi Registration Process*
LINK
👆 दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
➡️ iGot karmayogi registration/login वर क्लिक करा.
* नाव, ईमेल (तुमचा नियमित उपयोगी ईमेल), पद, मोबाईल नंबर, कर्मचारी गृप, इत्यादी माहिती भरा व सबमिट करा.
* ईमेल वर आलेल्या लिंक ने पासवर्ड बनवा.
* आता तुम्ही मोबाईल ओटीपी किंवा ईमेल व बनवलेला पासवर्ड टाकून लॉगिन करू शकतात.
📌 *कोर्स पूर्ण झाले की त्याची माहिती येथे भरा व सर्टिफिकेट अपलोड करा.*
* दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
* ➡️ igot karmayogi कोर्स माहिती येथे भरा वर क्लिक करा.
* विचारलेली माहिती भरा.
* ईमेल मध्ये आपला रेग्यूलर ईमेल टाका.
* कोर्स सर्टिफिकेट अपलोड करा.
* प्रत्येक कोर्स साठी स्वतंत्र फॉर्म भरा.
* प्रत्येक कर्मचारी ने ही स्वतंत्र नोंद करावी.
♻️ या लिंक वरून करा. लवकर होईल
IGOT Karmayogi Progress
150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT)डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवरील कोर्सेसपूर्ण करून या Google Form मध्ये आपली माहिती भरायची आहे. त्या सोबत सदर कोर्सचे प्रमाणपत्र अपलोड करावयाचे आहे. सदरची माहिती हि प्रत्येक कर्मचाऱ्यांने स्वतंत्रपणे भरावयाची आहे.
हेही वाचा
क्रमांकः जिपचं/साप्रवि/आस्था-३/१२३३/२०२५
दिनांक:- १६.१०.२०२५
विषय :- पंचायतराज व ग्रामिण विकास विभागांतर्गत Igot कर्मयोगी प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या कर्मचा-यांचे वेतनवाढ रोखून ठेवण्याबाबत.
संदर्भ :
- १. महा. शासन, सा.प्र.वि. मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र./९२/प्रशि-४ दि. १० मार्च, २०२५
२. या कार्यालयाचे पत्र क्र. साप्रवि/स्था-३/१३३६/२०२५ दि. १०.१०.२०२५
३. या कार्यालयाचे पत्र क्र. साप्रवि/स्था-३/१३३७/२०२५ दि. १०.१०.२०२५
संदर्भिय क्र.१ ते ३ अन्वये पंचायतराज व ग्रामीण विकास विभागातंर्गत Igot कर्मयोगी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असल्याबाबत सप्ष्ट सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पंरतू Igot कर्मयोगी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतांना आपले विभाग/कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले नसून प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांची टक्केवारी अत्यंत कमी असल्याचे निदर्शणास आले आहे. यावरून आपल्या विभाग / कार्यालयातंर्गत कार्यरत ब-याच अधिकारी/कर्मचा-यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. याबाबत आपणास वारंवार सभेत सुचना देण्यात आले आहे. तरी सुध्दा आपले स्तरावरुन सुचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची वाव आहे.
यास्तव आपले विभाग/कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे पैकी ज्यानी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले नाहीत अश्या संबधित अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण होईस्तव त्यांची पुढील वेतनवाढ रोखण्यात यावे व तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय जिल्हा परिषद, चंद्रपूर (सामान्य प्रशासन विभाग)

प्रति,
१. विभाग प्रमुख.. (सर्व) जिल्हा परिषद चंद्रपूर
२. गट विकास अधिकारी, पंचायत समिती ..(सर्व).
३. कार्यालय प्रमुख…
