धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate

Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate

Dhamma Chakra Quiz and Certificate Poster compressed

Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate

dhammachakra pravartan din

Dhamma Chakra Pravartan Day

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

१४ ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी विजयादशमी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन घडविले.या दिवशी त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा अंगीकार केला. त्या दिवशी विजयादशमी होती. त्यामुळे हा दिवस देशभर ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. विजयादशमीला देशभरातील बौद्ध बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून, ‘तिमिरातुनी तेजाकडे’ झेपावण्याची कास धरून महामानवाला कोटी-कोटी प्रणाम करतात. बाबासाहेबांनी धर्मातराच्या सर्व भाषणांतून ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्माची उदाहरणे घेतली असली तरी ख्रिस्त किंवा महम्मद पैगंबर यांचा आदर्श ठेवा असा उपदेश केलेला दिसून येत नाही.

‘कुणीही एकटय़ाने धर्मातर करू नये, जे करायचे ते सर्व मिळून करू’ असा सबुरीचा सल्ला त्यांनी १९२७-२८ च्या दरम्यान मुसलमान होऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांना दिला. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ अशी घोषणा केली. पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही.

बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला. अनेक धर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव सुरु झाला. १९३५ च्या पूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. इस्लाम स्वीकारला तर देशाचे काय होईल याचा विचार बाबासाहेबांनी केला होता म्हणून मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून मुस्लिम धर्मगुरूंच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला. ३० व ३१ मे १९३६ रोजी ‘मुंबई इलाखा महार परिषद’ मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

२ मे १९५० रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे सूचित केले होते. १९३७ साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यापूर्वी डॉ.बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. तथापि पक्षाच्या जाहीरनाम्यात धर्मातरितांना कोणत्याही विशेष सवलती त्यांनी जाहीर केल्या नाहीत.

मतदारांना केलेल्या आवाहनात ‘धर्मातराचा प्रश्न वेगळा असून विधान मंडळात निवडून जाण्याशी त्याचा काहीच संबंध नसल्याचे’ स्पष्ट केले. धर्मातराचा वापर करून अस्पृश्य समाजाला सत्ता व संपत्तीत वाटा मिळवून देणे शक्य असूनही डॉ.बाबासाहेबांनी ते टाळले. त्यांनी भारत देश व हिंदू समाज यांच्याशी बेइमानी न करता, राजकारणात आपल्या नीतिमूल्य, तत्त्वांचा व्यापार केला नाही. १४ ऑक्‍टोबर १९५६ ची पहाट उगवली. माईसाहेब आणि नानकचंद रत्तू यांच्या मदतीने बाबासाहेब तयार झाले. दीक्षाविधीसाठी आणलेला विशेष पोशाख त्यांनी परिधान केला. पांढरा सदरा, पांढरा बंद गळ्याचा कोट, कोइम्बतूरहून आणलेले पांढरे तलम रेशमी धोतर बाबासाहेबांनी घातले. सकाळचे नऊ वाजले होते. बाबासाहेब आणि माईसाहेब बुद्धमूर्तीकडे तोंड करून उभे राहिले. बाबासाहेब आणि माईच्या हाती कमळाचे पुष्पहार होते. भंते चंद्रमणी

महास्थवीर यांनी त्रिशरण पंचशील दिले. बुद्ध, धम्म आणि संघ शरणम्‌ गच्छामि वदवून घेतले. धम्म स्वीकारताना बाबासाहेब म्हणाले होते, “मी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून तुम्ही स्वीकारलाच पाहिजे असे नाही. बुद्ध धम्म पचवण्यास खूप अवघड आहे. यातील नियम खूप कडक आहेत. जमत असेल तर स्वीकारा.” कारण बाबासाहेबांनी अगोदरच ओळखले होते, आपली भोळी, अडाणी जनता हा धम्म पचवू शकत नाही. पण हा विज्ञानवादी धम्मच या जनतेला तारू शकतो. दुसऱ्या धर्मात गेलो तर ‘आगीतून उठून फुफाट्यात’ पडल्या सारखे होईल. तब्बल दोन तास चाललेल्या आपल्या प्रभावी, अर्थपूर्ण भाषणाचा समारोप करताना डॉ. बाबासाहेबांनी उपस्थितांना बजावले की, ‘‘तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान-सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू शकू.’’ अशा तऱ्हेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी सुरू झालेल्या ‘धम्म’ प्रवासाची सांगता १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाली.

धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate
धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate

धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा

0%
0 votes, 0 avg
32
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Dhammachakra Pravartan Din

धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate and earn attractive certificate instantly

धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate
धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रश्न मानुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Dhammachakra Pravartan Din Quiz With Certificate

1 / 25

1. १४ ऑक्टोबर हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

2 / 25

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोणत्या वर्षी घेतली?

3 / 25

3. धम्मदीक्षा सोहळा कोणत्या शहरात झाला?

4 / 25

4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धम्माचा स्वीकार केला?

5 / 25

5. धम्मदीक्षा सोहळा कोणत्या स्थळी झाला?

6 / 25

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा कोणी दिली?

7 / 25

7. डॉ. आंबेडकर यांच्यासोबत त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धम्माचा स्वीकार केला?

8 / 25

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती प्रतिज्ञा स्वीकारल्या?

9 / 25

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बौद्ध धम्मावरील ग्रंथ कोणता?

10 / 25

10. गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

11 / 25

11. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली?

12 / 25

12. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला?

13 / 25

13. गौतम बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात?

14 / 25

14. चार आर्यसत्यांची शिकवण कोणी दिली?

15 / 25

15. बौद्ध धम्मातील अष्टांगिक मार्गात किती घटक आहेत?

16 / 25

16. बौद्ध धम्मात कोणत्या मूल्याला विशेष महत्त्व आहे?

17 / 25

17. बौद्ध धम्मातील त्रिरत्न कोणती?

18 / 25

18. सम्राट अशोकाने कोणत्या धम्माचा प्रसार केला?

19 / 25

19. पंचशीलाचा मुख्य उद्देश कोणता?

20 / 25

20. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन कधी साजरा केला जातो?

21 / 25

21. भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकर यांची महत्त्वाची भूमिका कोणती?

22 / 25

22. कोणते संविधानिक मूल्य सामाजिक समतेशी संबंधित आहे?

23 / 25

23. डॉ. आंबेडकर यांच्या धम्मस्वीकारामागील प्रमुख सामाजिक ध्येय कोणते?

24 / 25

24. धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणता संदेश देतो?

25 / 25

25. दीक्षाभूमी कोणत्या कारणामुळे प्रसिद्ध आहे?

Your score is

0%

अधिक जाऊन घ्या या ओळीला स्पर्श करून

Leave a Comment

error: Content is protected !!