विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘अपार’ (APAAR ID) व डिजीलॉकर (DigiLocker) नोंदणी तसेच क्रेडिट डेटा Create APAAR ID अपार आयडी रजिस्ट्रेशन कसे करावे?

Create APAAR ID

Create APAAR ID

How To Make APAAR ID

How to download Apaar ID

How to register online for Apaar ID for students

Student Apaar ID Step by Step Guidance

How to Get The APAAR

APAAR ID Generate Process

Automated Permanent Academic Account Registry

अपार रजिस्ट्रेशन कसे करावे?

डिजीलॉकरमध्ये लॉगिन करा. ‘अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट्स’ सेक्शनमध्ये जा. ‘माझं अकाउंट’वर क्लिक करा आणि ‘विद्यार्थी’ पर्याय निवडा. शाळा/कॉलेजची माहिती आणि इतर तपशील भरा. आधार कार्ड, फोटो, निवास प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा. नंतर अपार आयडीची अधिकृत वेबसाइट

apaar.education.gov.in

वर जाऊन अपार आयडी डाऊनलोड करता येतो.

अपार आयडी कसे बनवावे?

अपार आयडी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. डिजीलॉकरवर साइन अप करावे. डिजीलॉकरची वेबसाइट किंवा अॅप उघडा. अपार आयडीसाठी ‘साइन अप’ करा. मोबाईल नंबर आणि आधार कार्डची माहिती भरा. ई-केवायसी पूर्ण करा.

How to Create a DigiLocker Account

अपार आयडीसाठी कोण अर्ज करू शकतो?

अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा ५ वर्षे असावी लागते. यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी तयार केली जाणार नाही. अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्यातरी मान्यताप्राप्त शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा लागतो.

सीईटीसाठी बंधनकारक

शाळेमार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून अपार आयडी तयार करता येतो. अपार आयडीसाठी पालकांचे संमतीपत्र पालकांनी भरून स्वाक्षरी करून शाळेमध्ये देणे आवश्यक असते. शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही. मात्र सीईटी, नीट, जेईई अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी अपार आयडी लागत आहे.

अपार आयडी म्हणजे काय ?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे अपार आयडी होय. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन

उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

४१२ ई, बहिरट पाटील चौक, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे- ४११ ०१६

Web: www.dhepune.gov.in

फोन नं.०२०/२६१२२११९

E-Mail: mavi.dhepune@gov.in

क्र. उशिसं/जीवन शैली बदलाबाबत/मवि-१/२०२६/ई/686

दि.१३.५.२०२६

अत्यंत महत्त्वाचे / कालबद्ध

13 MAY 2026

प्रति,

सर्व कुलसचिव,

राज्य सार्वजनिक विद्यापीठे,

महाराष्ट्र राज्य.

विषयः विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘अपार’ (APAAR ID) व ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत

संदर्भः

  1. उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे डी.ओ. पत्र क्र. १६-५/२०२०-TEL-Part (४) दि. 07.11.2024.
  2. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), नवी दिल्ली यांचे परिपत्रक क्र. F. १-५०/२०२१ (ABC/NAD) दि. 07.08.2024.
  3. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके.

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख’ (One Nation, One Student ID) या संकल्पनेतून APAAR (Automated Permanent Academic Account Registry) आणि Academic Bank of Credits (ABC) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली (UGC) यांनी खालीलप्रमाणे अनिवार्य तरतुदी केल्या आहेतः

अपार आयडीची अनिवार्यताः प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा 12 अंकी ‘अपार आयडी’ तयार करणे आणि तो आधार कार्ड व डिजीलॉकरशी लिंक करणे अनिवार्य आहे.

क्रेडिट अपलोड करण्याची मुदतः प्रत्येक शैक्षणिक वर्षाचा प्रलंबित श्रेयांक (Credits) डेटा त्या त्या वर्षाच्या 31 डिसेंबर अखेरपर्यंत ‘ABC’ पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

नवीन मुदत (2026 परीक्षा): सन 2026 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांचा व मूल्यमापनाचा श्रेयांक (Credits) डेटा विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’शी मॅप करून जून 2026 पर्यंत पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या मुदतीनंतर पोर्टलवरील डेटा गोठविला (Freeze) जाईल आणि त्यात कोणताही बदल करता येणार नाही.

डिजीलॉकर नोंदणीः विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि श्रेयांक (Credits) सुरक्षित ठेवण्यासाठी डिजीलॉकरवर नोंदणी असणे आवश्यक आहे.

विद्यापीठांनी करावयाची कार्यवाहीः

Create APAAR ID
विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 'अपार' (APAAR ID) व 'डिजीलॉकर' (DigiLocker) नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत
Create APAAR ID
विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘अपार’ (APAAR ID) व ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत

  1. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त संस्था आणि पदव्युत्तर विभागांना विद्यार्थ्यांची 100% अपार आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत.
  2. प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा अर्ज भरताना ‘अपार आयडी’ अनिवार्य करावा.
  3. विहित मुदतीत क्रेडिट डेटा अपलोड न झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची राहील याची नोंद घ्यावी.

आपल्या कार्यक्षेत्रातील किती महाविद्यालये/विद्यापीठे/उच्च शैक्षणिक संस्थांमधील किती विद्यार्थ्यांनी APAR ID ची नोंदणी पूर्ण केली आहे याचा संपूर्ण तपशील तात्काळ संचालनालयास mavi.dhepune@nic.in या इमेलवर सादर करण्यात यावा. तरी, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेऊन, आपल्या स्तरावरून तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर) प्र. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१६

प्रतः मा. स्वीय सहाय्यक, मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई 32.

मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई 32.

Regarding ‘APAAR ID’ and ‘DigiLocker’ registration and uploading of credit data of university and college students,

Create APAAR ID
विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 'अपार' (APAAR ID) व 'डिजीलॉकर' (DigiLocker) नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत
Create APAAR ID
विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘अपार’ (APAAR ID) व ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत

Leave a Comment

error: Content is protected !!