Class 11th Central Online Admission Process In House Quota Seats शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधे महाविद्यालयांतील ईन-हाऊस कोट्यातील जागा भरणेबाबत

Class 11 Central Online Admission Process In House Quota Seats

IMG 20250602 201547
Class 11 Central Online Admission Process In House Quota Seats

Class 11 Central Online Admission Process In House Quota Seats

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४

जाहिर प्रकटन

इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ दिनांक २६ मे, २०२५, पासून विद्यार्थी नोंदणी खालील संकेतस्थळावर सुरु झालेली होती तसेच त्याचा अंतिम दिनाक ०३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती.

शासन निर्णय ०६ मे २०२५ मधील मुद्दा क्रमांक १३ बाबत शासन पत्र दिनांक ३१ मे २०२५ अन्वये इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोटयातील जागा भरणेबाबत आवश्यक बदलाबाबत शासनाने आदेशित केलेले आहे.

१) इन-हाऊस कोटयाअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील.

२) मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे.

३) राज्यातील उर्वरीत जिल्हयांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्हयांमध्ये एक युनिट इन-हाऊस कोटयासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.

सदरील बदलाच्या अनुषंगाने वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करणेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक/विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा.

यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनाक ०३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती. सुधारीत मुदतवाढीसह आता त्याचा दिनांक ०५ जून २०२५ रोजी दुपारी २.०० पर्यंत करण्यात येत आहे.

तरी याव्दारे आवाहन करण्यात येते की, इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/पालक यांना विद्यार्थी नोंदणी करीता सुधारीत मुदतवाढीसह अंतिम दिनांक ०५ जून, २०२५ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी खालील संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील.

आज दिनांक ०२/०६/२०२५ रोजीपर्यंत एकूण विद्यार्थी नोंदणी १०८५८५१ इतकी झालेली आहे. विभागनिहाय नोंदणी खालीलप्रमाणेः

१) पुणे विभाग-१८७९२५

५) नाशिक विभाग-११२१०८

२) मुंबई विभाग- २६५९००

६) नागपूर विभाग -९५२१०

३) कोल्हापूर विभाग- १०७०१२

७) अमरावती विभाग – ९८३५९

४) छत्रपती संभाजीनगर विभाग-१०००४०

८) लातूर विभाग – ५८५८६

१) इतर – ६१७१२

या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.

अधिकृत संकेतस्थळ-
https://mahafyjcadmissions.in

ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in

हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४.

प्र. शिक्षण संचालक

स्थळः पुणे

दिनांकः ०२ जून, २०२५

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे

IMG 20250602 201118
Class 11 Central Online Admission Process In House Quota Seats

Also Read 👇

IMG 20250531 182140
Class 11th Central Online Admission Process In House Quota Seats

Class 11th Central Online Admission Process In House Quota Seats

Regarding filling up of seats in in-house quota in colleges in the Central Online Admission Process for Class 11 from the academic year 2025-2026.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), , मुंबई
क्रमांकः प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/ एसडी-२

दिनांक: ३१ मे, २०२५.

प्रति,
शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, पुणे.

विषय : शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधे महाविद्यालयांतील ईन-हाऊस कोट्यातील जागा भरणेबाबत.

संदर्भ : आयुक्त (शिक्षण), पुणे यांचे पत्र क्रमांक (जा.क्र. शिसंमा/११ऑप्रप्र/इनहाऊस कोटा २०२४-२५/ए-१/ विद्याशाखा.) दिनांक ३०.०५.२०२५ चे पत्र.

महोदय,

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात सन २०२५-२६ पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ११ वी प्रवेश केंद्रिया ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. त्याकरीता शासन निर्णय दि.६.५.२०२५ अन्वये सुसूत्रता आणण्याबाबत कार्यपद्धती सूचित करण्यात आली आहे. परंतु, दि.३०.०५.२०२५ रोजी मा. प्रधान सचिव यांचे समवेत झालेल्या चर्चेनुसार आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये, इयत्ता ११ वी च्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. १३ मधील ईन-हाऊस कोट्याबाबत असलेल्या तरतुदीत आवश्यक बदल करण्याबाबत संदर्भाधीन पत्राद्वारे शासनास विनंती केली आहे.

२. उपरोक्त विनंती च्या अनुषंगाने मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांच्या मान्यतेसाठी नस्ती सादर करण्यात आली होती. सदर नस्तीमध्ये इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२०२६ साठी इनहाऊस कोटा ग्राह्य धरताना आयुक्त (शिक्षण) यांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे दिनांक ०६.५.२०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रं १३ मधील बदलाच्या अनुषंगाने मान्यतेसाठी सादर करण्यात आली होती. त्यानुषंगाने प्रस्तावीत बदलास मान्यता देण्यात आली आहे.

३. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी-पालक व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यांना येणा-या अडचणी व सभ्रम तातडीने सोडविणे आवश्यक असल्याने, पुढील प्रमाणे बदल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील.

२. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील.

३. राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील.

तरी, उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरुन आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, ही विनंती.

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

IMG 20250531 WA0049
Class 11th Central Online Admission Process In House Quota Seats

Leave a Comment

error: Content is protected !!