भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना Bharatiya Bhasha Shibir

Bharatiya Bhasha Shibir

Bharatiya Bhasha Shibir

Bharatiya Bhasha Shibir Shalanmadhye Aayojit Karnyababat scert margdarshak suchana paripatrak

Regarding organizing Indian language camps in schools scert guidelines circular gr

भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत

दिनांक :- १६/०७/२०२६

जा क्र/रारीसप्रपं/मभावि/

16 JUL 2026

प्रति,
१) उपसंचालक, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व)

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे

३) शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक (सर्व जिल्हे)

   विषयः- भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत…

संदर्भ:

– १) मा. सह सचिव शिक्षा मंत्रालय, स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे D.O. लेटर No. 10-14/2025 NCERT, दिनांक २७ एप्रिल २०२६ चे पत्र.

२) संचालक प्राथमिक / माध्यमिक म.रा. पुणे यांना राज्यातील अधिनस्थ सर्व शाळांमध्ये सदरचे भाषा शिबीर राबविण्याबाबत निर्गमित या कार्यालयाचे पत्र क्र. २५८/दिनांक २७/०५/२०२६.

३) संचालक/प्राथमिक माध्यमिक यांना उक्त शिबीर राबविण्याबाबत त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणेबाबत निर्गमित या कार्यालयाचे पत्र क्र. २७२/दिनांक २२/०६/२०२६.

४) उपसंचालक (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांना उक्त शिबीर आयोजित करणेबाबत निर्गमित या कार्यालयाचे पत्र क्र. ३०३/दिनांक ३०/०६/२०२६

५) मा. सह सचिव CIET – NCERT, नई दिल्ली, यांचे दिनांक ८ जुलै २०२६ रोजीच्या Video Confreence मधील प्राप्त निर्देश…

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मा. सहसचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या कडून प्राप्त निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय भाषा शिबीर २०२६ आयोजित करणेबाबत संदर्भ क्रमांक १ व २ प्रमाणे कळविण्यात आलेले होते. तसेच संदर्भ क्र. ३ अन्वये केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणेबाबत कळविलेले आहे, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संदर्भ क्र.४ अन्वये उपसंचालक (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक यांचे समन्वयाने शिबीर राबविणेसंदर्भात कार्यवाहीसाठी पत्र निर्गमित केलेले आहे.

संदर्भ क्र.५ अन्वये मा. सह सचिव CIET NCERT, नई दिल्ली, यांनी दिनांक ८ जुलै २०२६ रोजी Video Confreence द्वारे घेतलेल्या राज्यनिहाय आढावा बैठकीमध्ये राज्याच्या सहभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उक्त भारतीय भाषा शिबीर आयोजित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना यापूर्वीचे पत्रांसोबत सहपत्रात जोडलेल्या आहेत. त्यामधील शेवटी परीशिष्ट-१ मध्ये सात दिवसाचे दिवसनिहाय सविस्तर उपक्रम व निर्देशित कृती आणि अध्यापन कृती दिलेल्या आहेत, त्याचे अवलोकन करावे, सदर शिबिराच्या वेळेमध्ये

स्थानिक गरजा आणि शैक्षणिक दिनदर्शिका लक्षात घेऊन शाळा स्थानिक पातळीवर आवश्यक तो बदल करू शकतात. त्यानुसार सर्व शाळांमध्ये जिल्ह्यानिहाय शिबीर राबविण्यासंदर्भात तसेच त्याची माहिती व फोटोग्राफ दिलेल्या लिंक वर अपलोड करणेबाबतची जिल्हानिहाय कार्यवाही प्राचार्य DIET व शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक यांनी समन्वयाने पूर्ण करावी, त्यासाठी प्राचार्य DIET यांनी सदर कामासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी (वरिष्ठ अधि./ अधिव्याख्याता पैकी १) शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी सुचविलेल्या सहा. नोडल अधिकारी (उपशिक्षणाधिकारी / वरी. शिक्षण विस्तार अधिकारी पैकी १) यांची नावे खालील प्रपत्रात तात्काळ मराठी भाषा विभाग SCERT पुणे यांना marthilangdept@maa.ac.in या इ-मेल वर पाठवावी.

नोडल अधिकारी/सहा. नोडल अधिकारी माहिती प्रपत्र :-

जिल्हा :-

अ.क्र. नोडल अधिकाऱ्याचे सहा, पदनाम

कार्यालयाचे नाव

मोवाईल नंबर

नोडल अधिकाऱ्याचे नाव

डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.)

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे-३०

प्रत – माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. सहसचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली.

२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

३) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४) संचालक प्राथमिक / माध्यमिक यांना माहिती तथा कार्यवाहीसाठी.

भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना Bharatiya Bhasha Shibir
भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना Bharatiya Bhasha Shibir

शाळांमध्ये “भारतीय भाषा समर कॅम्प बाबत मार्गदर्शक सूचना

 "आणखी एक भारतीय भाषा शिका"

१. प्रस्तावना

भारत हा बहुभाषिक देश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १३६९ मातृभाषा, भाषा आणि बोली भाषा असून त्यापैकी १२१ भाषांना भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या भाषांची विभागणी पुढे भारतीय संविधानाच्या अनुसूची मध्ये असलेल्या २२ भाषा आणि अनुसूची मध्ये नसलेल्या ९९ भाषांमध्ये करण्यात आली आहे. ही भाषिक विविधता आणि अनेक भाषिकांमधील आपुलकी भारतातील भावनिक एकोपा, सांस्कृतिक ऐक्य आणि सर्वसमावेशक एकतेला बळकटी देते. ही विविधतेतील सुंदरता प्राचीन काळापासून एकतेच्या बळावर जोपासली जाते.

ही भाषिक विविधता लक्षात घेता, भारतातील बहुतेक मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात, समुदायात किंवा सहकाऱ्यांमुळे त्यांच्या जीवनात एकाहून अधिक, कधी कधी तीन-चार भाषा अनुभवायला मिळतात. ते चित्रपट, गाणी, सांस्कृतिक कृती यांची सरसकट समज येण्यासाठी एखादी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त करतात किंवा त्यांना सहकाऱ्यांशी संवाद साधताना अडचणी येतात आणि ती भाषा शिकण्याची गरज निर्माण होते. लहान वयात मुले भाषा सहजतेने शिकतात आणि संवाद कौशल्ये लवकर आत्मसात करतात.

भारतीय भाषांना राष्ट्रीय एकतेचे एक उत्तम साधन म्हणून पाहिले गेले आहे त्यादृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये बहुभाषिकतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत देशातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक भारतीय भाषेचे महत्व शिकण्यासाठी प्रोत्साहित केले जावे, असे सुचविण्यात आले आहे. NEP २०२० मध्ये असे म्हटले आहे की, “देशातील प्रत्येक विद्यार्थी एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीमध्ये “भारतातील भाषा” या विषयावरील मजेदार उपक्रमात भाग घेतील.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना बहुतेक प्रमुख भारतीय भाषांच्या एकतेबद्दल, त्यांच्या समान ध्येयाबद्दल, वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थित वर्णमाला आणि लिपी, त्यांच्या सामान्य व्याकरणिक रचना, संस्कृती आणि इतर शास्त्रीय भाषांमधील शब्दकोशांची उत्पत्ती आणि स्रोत, त्यांचे समृद्ध आंतर-प्रभाव आणि फरक याबद्दल माहिती मिळेल. तसेच ते या उपक्रमांतर्गत कोणत्या भौगोलिक क्षेत्रात कोणती भाषा बोलली जाते, आदिवासी भाषांचे स्वरूप आणि संरचनेची माहिती, भारतातील प्रत्येक प्रमुख भाषेत सामान्यपणे बोलली जाणारी वाक्ये म्हणायला शिकतील तसेच प्रत्येक भाषेच्या समृद्ध आणि उत्तुंग साहित्याबद्दल थोडेसे शिकतील.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषांमधील एकता व वैविध्याचे सौंदर्य समजून घेण्याची भावना निर्माण होईल आणि त्यांच्यासाठी हा एक आनंददायी उपक्रम असेल की ज्यात कोणत्याही मूल्यांकनाचा समावेश नसेल.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आज अनेक भाषा शिकणे, आणि भाषांतर करणे अधिक सोपे झाले आहे. एक भारतीय भाषा शिकल्यावर दुसरी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळते. बहुतेक भारतीय भाषांमध्ये ध्वनीसंवेदना, वाक्यरचना, व्याकरण व शब्दसंपत्ती यामध्ये साम्य असल्याने एक नवी भाषा शिकणे म्हणजे नव्या ज्ञानविश्वात प्रवेश करण्यासारखे आहे. शिक्षकांनी ही स्थानिक/प्रादेशिक भाषा शिकावी, जेणेकरून संवाद सुधारेल आणि विद्यार्थीही नवीन भाषा शिकण्यासाठी प्रेरित होतील. विद्यार्थ्यांनी नवीन भाषा शिकणे म्हणजे बहुभाषिक नागरिक बनणे होय.

अनेक भारतीय भाषांचे ज्ञान, विशेषतः इतर राज्यांतील भाषा शिकल्याने विद्यार्थी भविष्यात देशभरात रोजगाराच्या संधी शोधू शकतील. देशभरात “आणखी एक भारतीय भाषा शिकणे” ही आता काळाची गरज आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून, भारतीय भाषा उन्हाळी शिबीर देशभरातील सर्व शाळांमध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

२. उद्दिष्टे

विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीनुसार मातृभाषा सोडून आणखी एक भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे.

विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी व सहभागी पद्धतीने बहुभाषिकता विकसित करणे,

भारतीय भाषांची भाषिक व सांस्कृतिक एकता अनुभवण्यासाठी मदत करणे.

विद्यार्थ्यांना निवडलेल्या भारतीय भाषेमध्ये संवाद कौशल्य शिकवणे.

परस्पर सन्मान, सांस्कृतिक समज आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे.

३. उन्हाळी शिबिर आयोजन कार्यपद्धती

भारतीय भाषा उन्हाळी शिबिरे देशातील सर्व शाळांसाठी एक उपक्रम आहे. NCERT/ राज्य समग्र शिक्षा (SPD) /SCERT / डायट / राज्य केंद्रशासित प्रदेशातील शासकीय आणि अनुदानित शाळांवर उपक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सदर उन्हाळी शिबिरे केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये, ईएमआरएस, संरक्षण मंत्रालयाच्या शाळा इत्यादीं सह CBSE शाळांमध्ये ही आयोजित केली जातील. NCERT कडून तयार होणारे साहित्य त्यांचे स्रोत CBSE शाळांनी वापरावे आणि देखरेख, निरीक्षण व डेटा संकलन (KVs, NVs यांचे सह) CBSE ने करावे व शिक्षण मंत्रालयाला त्यांचा अहवाल पाठवावा.

३.१ पार्श्वभूमी

उन्हाळी शिबिरे लहान वयातील मुलांना विविध भाषांचा परिचय देण्यासाठी व संवाद कौशल्य वाढवण्यासाठी तयार केली जातात. सदर उन्हाळी शिबिरात पुढील गोष्टींवर भर देण्यात यावा.

मूलभूत अभिवादन आणि अभिव्यक्ती, गरज व्यक्त करणे इ.

स्वतःची ओळख करून देणे आणि प्रश्न विचारणे.

शब्द संग्रह बांधणी व्यावहारिक वाक्ये आणि सामान्य अभिव्यक्ती इ.

संभाषण सराव (भूमिका सादरीकरण खरेदी, बसस्थानकावर मार्ग विचारणे, वाहतूक नियम समजणे इ.)

सांस्कृतिक समज, श्रवण कौशल्ये (संबंधित भाषेतील बालचित्रपट / सामाजिक लघुपट पाहणे)

पुनरावृत्ती व आत्मविश्वास वाढवणारे उपक्रम (भाषा प्रश्नमंजुषा, गटकृती)

प्रेरणा आणि समारोप (पालकांसमोर विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि प्रमाणपत्र वितरण)

३.२ लाभार्थ्यांच्या (Stakeholders) जबाबदाऱ्या

अ) उन्हाळी शिबिरांसाठी NCERT नोडल संस्था आणि तांत्रिक भागीदार असेल. NCERT चे RIES (प्रादेशिक

संस्था) ह्या देखील संबंधित राज्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मदत करतील. आवश्यकतेनुसार भारतीय भाषा समिती NCERT ला मार्गदर्शन करेल.

ब) समग्र शिक्षांतर्गत ही शिबिरे होणार असल्याने, शिबीर विषयक कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य शिक्षण विभाग / राज्य प्रकल्प संचालक या कार्यालयाची असेल.

क) SCERT आणि DIET हे राज्य आणि जिल्हा स्तरावर समन्वयक एजन्सी म्हणून काम पाहावेत.

ड) प्रत्येक शाळांनी ही शिबिरे प्रत्यक्ष आयोजित करावी. त्यासाठी त्यांच्या शाळेतील भाषा/कला/संगीत विषयांच्या शिक्षकांची मदत घ्यावी. या शिबिराच्या आयोजनात एका पेक्षा अधिक शिक्षक सहभागी होऊ शकतात.

ई) विविध भाषांमध्ये पारंगत असलेले पालक, स्थानिक शासकीय कर्मचारी यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेण्यात यावा.

फ) CBSE, KV,NV शाळांसह जिल्ह्यातील विविध शाळांमधील भाषा शिक्षकांचाही यामध्ये सहभाग घेता येईल.

३.३ तांत्रिक संसाधने शिबिरासाठी शिक्षकांना अध्ययन व अध्यापन साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी NCERT शिबिराच्या प्रत्येक दिवसासाठी मार्गदर्शक रूपरेषा तयार करेल.

NCERT / RIE कडून २२ अनुसूचित भाषांमधील कॅप्सूल कोर्स २० मे २०२५ पूर्वी वेबसाइट वर उपलब्ध केला जाईल.

SCERT राज्याच्या स्थानिक गरजेनुसार साहित्याचे रूपांतर करू शकतात.

ऑडिओ-व्हिडिओ सामग्री NCERT / RIE / SCERT / DIET कडून तयार/संपादित केली जाईल आणि उपलब्ध संसाधनांचा डेटाबेस / यादी NCERT आणि SCERT कडून उपलब्ध केली जाईल.

या कालावधीत PM-e Vidya वाहिनीचा उपयोग करून सतत भाषा संबंधित व्हिडिओ प्रसारित केले जातील.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांनी हिन्दी व संस्कृतसह कमीत कमी अनुसूचीतील एक भाषा शिक्षकांचा जिल्हा निहाय डेटा बेस तयार करावा.

३.४ शाळास्तरावरील आयोजन

उन्हाळी शिबिरादरम्यान कोणती भाषा शिकवायची याचा निर्णय प्रत्येक शाळा संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या त्या विशिष्ट क्षेत्रातील / प्रदेशातील भाषेचा शिक्षक / संसाधनांच्या उपलब्धतेनुसार निर्णय घ्यावा. शाळांनी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या भाषेची मागणी पाहून ही निवड करावी. उन्हाळी शिबिरासाठी भाषा ठरविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे शेजारच्या भागात सीमावर्ती जिल्ह्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांच्या आधारे नियोजन करता येणे शक्य असेल.

शिबिर प्रत्यक्ष (Physical) स्वरूपात घेतले जाईल. प्रत्येक शाळेत किमान ७०-१०० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

जर उन्हाळी सुट्टया संपल्या असतील आणि नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असेल तर शाळेस योग्य जर उन्हाळी सुट्टया संपल्या असतील आणि नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असेल तर शाळेस योग्य वाटेल तसे आठवड्याच्या शेवटी शनिवारी किंवा इतर दिवशी, शाळेच्या वेळेनंतर २८ तासांचा कॅप्सूल कोर्स आयोजित करावा तसेच भाषा शिबिर आयोजित करण्यासाठी शाळा अन्य पर्यायी मार्ग शोधू शकतात.

४. उन्हाळी शिबिराचे आयोजन

NCERT व SCERT ने तयार केलेल्या कॅप्सूल कोर्सवर आधारित उन्हाळी शिबिराचा कालावधी २८ तासांचा असेल. उन्हाळी शिबिरासाठी आदर्श कालावधी ७ दिवसांचा असेल. मात्र शाळा त्यांच्या स्तरावर उन्हाळी शिबिर आयोजित करण्याच्या दिवसांची संख्या बदलू शकतात तथापि एकूण तासांची संख्या २८ ठेवणे आवश्यक राहील.

 खालील सूचक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा

१) उन्हाळी सुट्टीत इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये एक आठवड्याचे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित करावे.

२) मुले त्यांच्या शाळेत शिकत असलेल्या भाषांव्यतिरिक्त इतर भारतीय भाषा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा करून निवडली जावी आणि ती Communicative Approach द्वारे शिकविण्यात यावी.

३) शाळांनी हे शिबीर मौज-मस्तीवर आधारित भाषा शिक्षण शिबीर म्हणून हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या शिबिरासाठी एक आठवडा स्वयंस्फूर्तीने काम करण्यासाठी एक किंवा दोन शिक्षक (उपलब्ध असल्यास) किंवा समाजातील एक किंवा दोन स्वयंसेवक यांची निवड करावी. उन्हाळी शिबिरासाठी शाळेने निवडलेली भाषा शिकवणाऱ्या / जाणणाऱ्या भाषा शिक्षकांच्या उपलब्धतेसाठी ते जवळच्या शाळांशी संपर्क साधू शकतात. NCERT ने तयार केलेल्या आराखड्याच्या (Frame Work) आधारे निवडलेल्या शिक्षकांनी शाळांमधील भाषा शिक्षकांसोबत चर्चा करून अध्ययन-अध्यापन उपक्रमांची आखणी करावी.

४) इच्छुक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपलब्धतेनुसार शाळांना अनेक बॅचेस घ्याव्या लागु शकतील.

५) CIIL. म्हैसूर, NCERT, केंद्रीय हिंदी संचालनालय, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिळ, नेशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी, संस्कृत विद्यापीठे आणि अशा इतर संस्थांनी तयार केलेल्या प्रिंट आणि डिजिटल अशा विविध प्रकारच्या भाषा शिक्षण साहित्याचा उपयोग शिबिरांमध्ये शिकण्याच्या उपक्रमासाठी केला जावा.

६) शिबिराच्या कार्यक्रमाची घोषणा, ऊन्हाळी शिबिरासाठी नाव नोंदणी आदी व्यवस्था शाळांनी अगोदरच करावी. जेणेकरून दिवसनिहाय कृती कार्यक्रमास अंतिम स्वरूप देता येईल.

७) उन्हाळी शिबिरादरम्यान राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फोटो / व्हिडिओ पोस्ट करावे, उद्घाटन, समारोप, सादरीकरण, विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ इत्यादीचा व्यापक प्रचार-प्रसार करावा व त्याद्वारे विविध भारतीय भाषांच्या शिक्षणास प्रोत्साहन द्यावे.

८) या उन्हाळी शिबिरादरम्यान किंवा नंतर शाळा भारतीय भाषा परिषद / क्लब स्थापन करू शकतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना कथाकथन, नाटक, वादविवाद, सांस्कृतिक उपक्रम इत्यादीच्या माध्यमातून आपली नवीन भाषा वापरता येईल. विद्यार्थ्यांना रस असेल तर शिक्षकांनी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ऑनलाइन पद्धतीने दीर्घकाळ सदर भाषा शिकवावी.

९) सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना संबंधित शिबिरात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र शालेय स्तरावर सामायिक स्वरुपात देण्यात येईल. NCERT विद्यार्थी तसेच तज्ञ मार्गदर्शकांसाठी प्रमाणपत्राचे एक समान स्वरूप डिझाइन करेल आणि सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना वितरीत करेल.

१०) राज्य / केंद्रशासित प्रदेश या कार्यक्रमाचे नियंत्रण करतील आणि शिबिराच्या शेवटी DSELने तयार केलेल्या Dash Bord /पोर्टल द्वारे राज्याच्या एकूण सहभागाची माहिती सादर करतील.

११) सदर उन्हाळी शिबिराच्या आयोजनासाठीचा आवश्यक खर्च शाळांनी लोकसहभागातून किंवा स्वतःच्या उपलब्ध निधी मधून भागवावा.

१२) पीएम ई विद्या चॅनेलच्या संसाधनाचा वापर करण्यासाठी, शाळेत टी. व्ही. उपलब्ध नसल्यास शाळांनी स्थानिक पातळीवर त्याची व्यवस्था करावी.

१३) शाळांकडून योग्य विद्यार्थी संख्येनुसार बॅचेस तयार कराव्यात. सर्व इच्छुक मुले त्यांच्या इयत्ता आणि वयाची पर्वा न करता शाळेच्या शिक्षकांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे भाषा शिकतील.

५. जबाबदारीची विभागणी

👉 पुढे अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून तसेच परिपत्रक व मार्गदर्शक सूचना पीडीएफ मध्ये प्राप्त करा 👈

भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना Bharatiya Bhasha Shibir
भारतीय भाषा शिबीर शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना Bharatiya Bhasha Shibir

Leave a Comment

error: Content is protected !!