Organizing Indian Language Summer Camps
Organizing Indian Language Summer Camps
Regarding organizing Indian language summer camps SCERT GUIDELINES
Bharti Bhasha Grisham Kalin Shibir
जा.क. राशैसंप्रप/मभावि/ग्री.शी.रा./२०२५-२६/०२९४४
दिनांक: २१/०५/२०२५
विषय: भारतीय भाषा उन्हाळी शिबीर आयोजित करण्याबाबत
संदर्भ :- मा. सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांचे पत्र क्र. D.O.No.१०-१४/२०२५-NCERT, दि.१४/०५/२०२५
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या कडून प्राप्त निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय भाषा ग्रीष्म कालीन शिबीर आयोजित करावयाचे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, भारतातील बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारे असून लहान वयातच मुलांना विविध भाषांची ओळख व्हावी, गमतीशीर आणि आकर्षक पद्धतीने अन्य भाषा शिकावी यासाठी NCERT मार्फत ग्रीष्म कालीन शिबीराची रचना करण्यात आली आहे.
सदर शिबिरातून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या मातृभाषेशिवाय आणखी एक भारतीय भाषा शिकावी, त्या भाषेतील मुलभूत संवाद व संवाद कौशल्ये शिकविण्यासाठी सदर शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी एका आठवड्यातील एकूण २८ तासाचा कॅप्सूल कोर्स नियोजित असून, प्रत्येक शाळेत किमान ७५ ते १०० इच्छुक विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्रीष्म कालीन शिबीरामध्ये स्व-परिचय, शब्दसंग्रह निर्मिती, वास्तविक जीवनातील संभाषण पद्धती, संस्कृतीचे कौतुक, मजबुतीकरण आणि आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सदर ग्रीष्मकालिन शिबिराची वेळ स्थानिक गरजा आणि शैक्षणिक दिनदर्शिका लक्षात घेऊन त्याप्रमाणे शाळा स्थानिक पातळीवर आवश्यक तो बदल करू शकतात.
सदर शिबिरासाठी संसाधन सामग्री पुरविण्याची जबाबदारी नोडल संस्था आणि तांत्रिक भागीदार म्हणून एनसीईआरटी ची असणार आहे. उक्त भारतीय भाषा उन्हाळी शिबीर आयोजित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना यासोबत जोडल्या आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिबीर राबविण्यासंदर्भात अधिनस्थ यंत्रणेस आदेशित करावे.
सहपत्रः- सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहे.
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे

शाळांमध्ये “भारतीय भाषा समर कॅम्प” बाबत मार्गदर्शक सूचना
“आणखी एक भारतीय भाषा शिका”
Guidelines for “Indian Language Summer Camp” in schools
“Learn another Indian language”
प्रति,
१) उपसंचालक, (प्रादेशिक विद्याप्राधिकरण, सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे
३) शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व जिल्हे