Banks Authorized To Pay Salary Allowances To Officer Employees Pensioners

Banks Authorized To Pay Salary Allowances To Officer Employees Pensioners

IMG 20250115 154926
Banks Authorized To Pay Salary Allowances To Officer Employees Pensioners

Banks Authorized To Pay Salary Allowances To Officer Employees Pensioners

Regarding revising the list of authorized District Central Cooperative Banks for the year 2024-2025 for opening Bank Accounts of Drawing and Disbursing Officers and Personal Bank Accounts of Pensioners for disbursement of salaries and allowances to Government employees.

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२४-२०२५ या वर्षासाठी यादी सुधारित करणेबाबत…..

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.७२/२०/कोषा.प्रशा.५

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १४ जानेवारी, २०२५

वाचा :

१) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.५१/२०२०/कोषा प्रशा ५. दि.१३.०८.२०२०

२) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.५१/२०२०/कोषा प्रशा ५, दि.०६.११.२०२०

३) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/ प्र.क्र.५१/२०२०/कोषा प्रशा ५, दि.१०.०२.२०२२

४) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/ प्र.क्र.७२/२०२०/कोषा प्रशा ५, दि.१७.१०.२०२३

प्रस्तावना :

उपरोक्त वाचा मधील अ.क्र.१ येथील शासन निर्णयातील परिच्छेद ३ नुसार दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या लेखापरिक्षण अहवालात बदल होण्याची शक्यता विचारात घेता, सदर बँकांची यादी प्रतिवर्षी सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाच्या सल्लल्याने वित्त विभाग सुधारित करेल असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुषंगाने सन २०२४-२५ या वर्षाकरीता १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता तसेच सार्वजनिक उपक्रम / महामंडळ यांकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी पात्र ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही बँकेत वेतन खाते उघडू शकतात शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

शासन निर्णय

१. शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून अभिप्राय घेण्यात आले आहेत. सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने मागील ५ वर्षातील लेखापरिक्षण अहवाल “अ” वर्ग असणाऱ्या खालील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची शिफारस केली आहे.

१. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

२. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

३. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

४. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

५.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

६. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

७. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

८. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
९. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१०. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

११. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१२. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१३. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१४. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१५. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

२. उपरोक्त १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सन २०२४-२५ या वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते उघडण्याकरीता, आणि निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता, तसेच सार्वजनिक उपक्रम / महामंडळे यांचेकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीकरीता प्राधिकृत करणेस मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एका महिन्याच्या आत उपरोक्त नमूद १५ बँकांनी वेतन व निवृत्तीवेतन प्रदानाकरीता शासनासोबत आवश्यक करार करणे अनिवार्य राहील.

४. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२५०११४१७२३१२६७०५ असा आहे. प्रस्तुत शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

शासनाचे उप सचिव

Leave a Comment

error: Content is protected !!