All Teachers Non Teaching Staff Can Open Salary Account In Any Bank Of Their Choice
All Teachers Non Teaching Staff Can Open Salary Account In Any Bank Of Their Choice
Teachers and non-teaching staff of private aided primary, secondary, higher secondary and teacher training schools can open a salary account in any bank of their choice
Employees can open a salary account in any bank of their choice
Freedom of Employees to open salary bank account in any bank of their choice
कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही बँकेत वेतन खाते उघडू शकतात
खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही बँकेत वेतन खाते उघडू शकतात
Regarding salary bank accounts of teaching and non-teaching staff in private aided primary, secondary, higher secondary schools and Adhyapak Vidhyalaya
खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन बैंक खात्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः वेतन २७२०/प्र.क्र.९६/टिएनटी-३,मंत्रालय, मुंबई
तारीखः १९ डिसेंबर, २०२३.
वाचा –
शासन परिपत्रक वित्त विभाग, क्रमांक संकीर्ण २०१९/प्र.क्र.१४१/२०१९/कोषा प्रशा-५, दि.८/१०/२०२०
🤞संदर्भीय शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून
प्रस्तावना –
शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन बैंक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. त्याकरीता बँकाकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी/कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक ८/१०/२०२० अन्वये अवगत केलेले आहे.
तसेच बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदानाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र. २०३९/२०१७ व रिट याचिका क्र. १७५/२०१८ झाल्या होत्या. सदर याचिकांमध्ये दि. ९.२.२०१८ रोजीच्या आदेशान्वये शाळा व शाळामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक खाते अन्य बँकेत उघडण्याचे स्वांतंत्र्य राहील, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त बाब मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अवगत करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन परिपत्रक
वित विभागाच्या दिनांक ८/१०/२०२० च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीयकृत बैंकाकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लामाबाबत माहिती दिलेली आहे. सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात शिक्षक
शासन परिपत्रक क्रमांकः वेतन २०२०/प्र.क्र.९६/टिएनटी-३
व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दि. ९.२.२०१८ रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन बैंक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोअर बैंकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील.
२. तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी यांचे मेन पुल अकाऊंट (पार्किंग अकाऊंट) वित्त विभागाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अन्य बँकेत उघडावे.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या🌐👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२०१११३१५९१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
📂👉 सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
उप सचिव, महाराष्ट्र शासन