Use of Workbooks Practical Notebook Extra Curricular Books Prepared by Balbharti
swadhyay pustika prataykshik nandvhi tter pustak wapar
बालभारतीने तयार केलेल्या दर्जेदार ‘स्वाध्यायपुस्तिका, प्रात्यक्षिक नोंदवही तसेच पाठ्येत्तर पुस्तकांचा वापर करण्याबाबत
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ‘बालभारती’, पुणे
क्रमांक : व/ड/६/५१६९
दिनांक : १२.१२.२०२४
विषय : बालभारतीने तयार केलेल्या दर्जेदार ‘स्वाध्यायपुस्तिका, प्रात्यक्षिक नोंदवही तसेच पाठ्येत्तर पुस्तकांचा वापर करण्याबाबत….
महोदय,
‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ’ अर्थात ‘बालभारती’, पुणे या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता ८ वी त्ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार ‘स्वाध्यायपुस्तिकांची’ निर्मिती केलेली आहे व तसेच इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रात्यक्षिक नोंदवहीं’ तसेच ‘पाठ्येत्तर’ पुस्तकांची निर्मिती केली आहे. या ‘स्वाध्यायपुस्तिका’ व ‘प्रात्यक्षिक नोंदवह्या’ प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनास चालना मिळते. लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो, प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे. विषयांचे दृढीकरणास उपयुक्त ठरतात, जिज्ञासावर्धक आणि विचारप्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे व यात पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकांपलिकडे नेणारे प्रश्न अंतर्भूत आहेत.
बालभारतीने प्रकाशित केलेल्या ‘स्वाध्यायपुस्तिकांच्या’ व ‘प्रात्यक्षिक नोंदवही’ तसेच ‘पाठ्येत्तर’ पुस्तकांच्या किंमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत कमी आहेत. राज्यातील शासन मान्यताप्राप्त शाळा/शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या नावाने ‘ebalbharati.in’ या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यास त्यांना स्वाध्यायपुस्तिकांच्या दर्शनी किंमतीवर २०%, तसेच प्रात्यक्षिक नोंदवह्यांच्या खरेदीवर १५% तसेच पाठ्येत्तर पुस्तकावर ३०%, ४०% व ५०% सवलत आहे. बालभारतीने निर्मिती केलेल्या इयत्तानिहाय ‘स्वाध्यायपुस्तिका’, ‘प्रात्यक्षिक नोंदवहीं’ व पाठ्येत्तर पुस्तकांची किंमत तसेच वटाव (Discount) चा तपशीलचा तक्ता (परिशिष्ट ‘अ’, ‘ब’ व ‘क’) सोबत जोडला आहे.
करिता आपल्या कार्यालयाच्या निधीतून इयत्ता ७/८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांस ‘स्वाध्यायपुस्तिका’, ‘प्रात्यक्षिक नोंदवहीं’ तसेच पाठ्येत्तर पुस्तकांची खरेदी करून अधिकाधिक विद्याथ्यर्थ्यांना लाभ करून देण्यात यावा. ही विनंती.
आपला विश्वासू,
(कृष्णकुमार पाटील)
संचालक,
पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे