Balbharati Textbooks Online Order Registration Link

Balbharati Textbooks Online Order Registration Link

IMG 20250220 175458
Balbharati Textbooks Online Order Registration Link

Balbharati Textbooks Online Order Registration Link

विषय : समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक सन २०२५-२६ करिता नियमित पाठ्यपुस्तके व लार्ज प्रिंट पाठठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविणेबाबत.

संदर्भ- केंद्रशासनाचे पत्र क्र.२-३/२०२४।९.२ दि.१४/०१/२०२५.

उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार समग्र शिक्षा, स्टार्स व पीएमश्री अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२५-२६ चे कार्यवाही सुरु झालेली आहे. समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२५-२६ मध्ये मोफत पाठ्यपुस्तकांसाठी तरतूद प्रस्तावित करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या निकषानुसार समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके हा उपक्रम इयत्ता १ ली ते ८ वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विदयार्थ्यांसाठी अनुज्ञेय आहे हे आपणांस विदित्त आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरु होण्यापूर्वी बालभारतीच्या ई-बालभारती पोर्टलवर पाठ्यपुस्तकांची नोंदणी करून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देता येतील.

समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकामध्ये मोफत पाठ्यपुस्तके सन २०२५-२६ केंद्रशासनाकडून मंजूर होण्याच्या अधीन राहून, तसेच विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने, इयत्ता १ ली ते ८ वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांमधील सर्व मुलां-मुलींसाठी, यु-डायस प्लस सन २०२३-२४ च्या विद्यार्थी संख्येनुसार, पाठ्यपुस्तकांची बालभारतीच्या ई-बालभारती पोर्टलवर ऑनलाईन मागणी दि.२०/०२/२०२५ पूर्वी तात्काळ नोंदविण्यात यावी.

eBalbharti portal online registration link

नियमित पाठ्यपुस्तके व लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविताना मागील शैक्षणिक वर्षामधील शिल्लक असलेली पुस्तके तसेच पुनर्वापरासाठी उपलब्ध असलेली पाठ्यपुस्तके मूळ मागणीमधून वजा करून उर्वरित पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात यावी व सदर मागणी या कार्यालयाकडून निश्चित करून घेण्यात यावी.

विहित मुदत्तीमध्ये आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिकेची उपरोक्त सूचनेनुसार मागणी नोंदविली न गेल्यास व पाठ्यपुस्तकांचा पुरवठ्यामध्ये विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

राज्य प्रकल्प संचालक मप्राशिप, मुंबई

Balbharati Textbooks Online Order Link

Online ordering of textbooks on Balbharti’s e-Balbharti portal

GOVERNMENT OF MAHARASHTRA SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT SAMAGRA SHIKSHAN MAHARASHTRA PRATHAMIK SHIKSHAN PARISHAD
NIPUN BHARAT

अतितात्काळ / महत्त्वाचे / प्राधान्याने / कालमर्यादित जा.क्र. मप्राशिप/सशि/मोपापु/काअ/२०२४-२५/२९९

दि. – 4 FEB 2025

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग मुंबई यांचे कार्यालय.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व
३) प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व.

Online requisition of Balbharati textbooks

2 thoughts on “Balbharati Textbooks Online Order Registration Link”

Leave a Comment

error: Content is protected !!