Appointment Of Retired Officers On Contract Basis
Appointment Of Retired Officers On Contract Basis
Appointment Of Retired Government Semi-Government Officers On Contract Basis
To engage retired government/semi-government officers for specific work on a contract basis.
शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणे.
दिनांक : १० जून, २०२५.
वाचा
: १) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्र. १००/१३, दिनांक १७ डिसेंबर २०१६.
२) शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक २१ फेब्रुवारी २०१८.
३) शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्रं. १०० (भाग-१)/१३, दिनांक १४ जुलै २०२१.
४) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्रं. १०० (भाग-१)/१३, दिनांक ८ सप्टेंबर २०२३.
५) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्रं. १०० (भाग-१)/आस्थामं (कार्या. १३), दिनांक २३ सप्टेंबर २०२४.
प्रस्तावना:-
शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत संदर्भाकित क्रमांक १ येथील शासन निर्णय दिनांक १७.१२.२०१६ निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीत वेळोवळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. शासन निर्णय दिनांक १७.१२.२०१६ व त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणांचा एकत्रित विचार करुन शासन सेवेतील शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत सर्वसमावेशक एकत्रित सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
सामान्य प्रशासन विभागाचे दि. १७.१२.२०१६, दि.२१.०२.२०१८, दि. १४.०७.२०२१, दि. ०८.०९.२०२३ व दि. २३.०९.२०२४ हे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत. शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा विषयनिहाय एमपॅनलमेंट (empanelment) करुन, विवक्षित कामासाठी करार पध्दतीने उपलब्ध करुन घेता येतील. त्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : सीबीई १५२५/प्र.क्र. ३७/आस्थामं (का.१३),मंत्रालय, मुंबई