Anganwadi Sevika Madatnis Bhaubij Bhet
Anganwadi Sevika Madatnis Bhaubij Bhet
anganwadi sevika v madatnis yanna bhaubij bhet
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी “भाऊबीज भेट” रक्कम मंजूर करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२६/प्र.क्र.१४५/का.६ (७-१८३९४४२) मंत्रालय,मुंबई
दिनांक :- १४ ऑक्टोबर, २०२६
वाचा :-
१) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय, क्र. एबावि-२०१७/प्र.क्र.१०३/का.६, दिनांक २३ फेब्रुवारी २०१८
२) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र क्र. एबाविसेयो/अं. वाडी-भाऊबीज भेट/२०२६-२७/३८१२, दिनांक ०४.०९.२०२६.
प्रस्तावना:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी रु.२,०००/ प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचा-यांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्रत्येकी रु.२,०००/- प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देत आहे.
२. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी क्रमांक :-एक्स-१, २२३६, पोषण आहार, (०८) (०६) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, (भाऊबीज भेट) (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (२२३६१९५४), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधुन आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्र.०२ येथील पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार रुपये ४२.८१९४ कोटी (अक्षरी रुपये बेचाळीस कोटी एक्याऐंशी लाख चौऱ्यान्नव हजार फक्त) इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
३) ज्या प्रकल्पांतर्गत मुख्यसेविका/पर्यवेक्षिका यांची पुरेशी पदे कार्यरत नसल्यास कार्यरत मुख्यसेविका/पर्यवेक्षिका यांना एकापेक्षा अधिक बीटमधील अंगणवाडी केंद्रांच्या तपासणीचे कामकाज देण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार ग्रामीण प्रकल्पाच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी अन्य प्रकल्पामधील मुख्यसेविका/पर्यवेक्षिका यांना अशा प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांचे तपासणीचे कामकाज द्यावे. तर नागरी प्रकल्पाच्या बाबतीत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी.
४) वरीलप्रमाणे मुख्यसेविका/पर्यवेक्षिका यांनी तपासणीची कार्यवाही दिनांक ५.११.२०२६ अखेरपर्यंत पूर्ण करावी व त्याबाबतचे आपले अहवाल संबधित प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
५) बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रत्येक बीटमधील यादृच्छिक पद्धतीने (Randomly) किमान १ अंगणवाडी केंद्रांच्या भौतिक सुविधेबाबत पडताळणी करावी व मुख्यसेविका/पर्यवेक्षिका यांनी दिलेल्या अहवालाबाबत खातरजमा करण्यात यावी. तद्नंतर प्रकल्पाचा एकत्रित अहवाल (Excel File सह) बाल विकास प्रकल्प अधिकरी यांनी ग्रामीण प्रकल्पाच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद यांना व नागरी प्रकल्पाच्या बाबतीत विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास) यांना दिनांक १३.११.२०२६ अखेरपर्यंत सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे सदर Cross verification नुसार अंतिम झालेल्या माहितीनुसार त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेण्याबाबत अंगणवाडी सेविकांना सूचित करुन त्याप्रमाणे कार्यवाही झाल्याबाबत दक्षता घेण्यात यावी.
६) त्यानुसार ग्रामीण प्रकल्पाच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद यांनी तर नागरी प्रकल्पाच्या बाबतीत विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास) यांनी प्रत्येक प्रकल्पातील यादृच्छिक पद्धतीने (Randomly) किमान १ अंगणवाडीच्या भौतिक सुविधेच्या माहितीची पडताळणी करावी. तद्नंतर एकत्रित अहवाल (Excel File सह) प्रमाणित करुन आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचेकडे दिनांक १८.११.२०२६ अखेरपर्यंत सादर करण्यात यावा.
३. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी याबाबत जिल्हानिहाय विश्लेषण करुन त्याबाबत राज्याचा एकत्रित अहवाल शासनास दिनांक २०.११.२०२६ अखेरपर्यंत सादर करण्यात यावा. तसेच वरील तपासणी मोहिमेच्या अनुषंगाने अतिरिक्त सूचना द्यावयाच्या असल्यास आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी त्याप्रमाणे सूचना निर्गमित करुन सदर कार्यवाही वेळेत पूर्ण होईल याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व स्तरावरुन माहिती संकलित होणार असल्याने त्याबाबतचा Format एकसमान राहण्याकरिता सर्व संबधितांना सूचना व मार्गदर्शन करण्यात यावे. जेणेकरुन राज्यस्तरावरुन अंगणवाडी केंद्रांमधील भौतिक सुविधांबाबतच्या माहितीचे विश्लेषण करणे सुलभ होईल.
४. सदर मोहिमेकरिता उपायुक्त (अंगणवाडी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. राज्यात या मोहिमेमध्ये एकसुत्रीपणा राहण्याकरिता नोडल अधिकारी यांनी व त्यांचे कार्यालयातील तांत्रिक मनुष्यबळ यांनी सर्व क्षेत्रिय यंत्रणांच्या संपर्कात राहून आवश्यक ती कार्यवाही करावी.
५. अंगणवाडीमधील भौतिक सुविधांच्या तपासणीबाबतची सदर मोहिम प्रत्येक वर्षी वर्षातून दोन वेळा करण्यात यावी. त्याबाबतचे ट्रॅकिंग होण्याकरिता विभागाकडून NURTURE प्रणालीमध्ये अथवा तत्सम प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६१०१४१६२४२२१८३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
सह सचिव, महाराष्ट्र शासन
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202610141624221830.pdf