Vidyanjali Portal School Project Registration
जा.क्र.रा.शै.सं.वप्र.प./सा.शा.वि/विद्यांजली२.०/२०२५/
दि. ३०/०६/२०२५
विषय : विद्यांजली 2.0 पोर्टलवर CSR मॉड्युल सक्रिय करण्यासाठी जिल्हानिहाय थीम निवड आणि जुलै ते सप्टेंबर 2025 साठीचा प्रस्ताव तयार करणेबाबत.
संदर्भ :
१. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र F.N. 4-2/2022/KT दि.०८/०१/२०२५.
२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश दि.३०/०६/२०२५
३. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देश दि.०७/०२/२०२५
उपरोक्त विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली 2.0 वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली 2.0 A Volunteer Management Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची भूमिका आवश्यक आहे. विद्यांजली 2.0 हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रिकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली 2.0 विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला/मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक / शासकीय/ निमशासकीय अधिकारी, कर्मचारी/सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा/कृती, मालमत्ता/साहित्य/उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात
तदनुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकट करण्यासाठी कंपन्या/नागरी संस्था/सरकारी संस्थांकडून संसाधने एकत्रित करण्यासाठी ऑक्टोबर, 2024 मध्ये पोर्टलवर एक विशेष CSR मॉड्यूल
https://vidyanjali.education.gov.in/csr
विकसित करून जोडण्यात आले आहे. यामध्ये 11 व्यापक थीम अंतर्गत शाळांद्वारे निर्माण केलेले जिल्हानिहाय सीएसआर प्रकल्प जसे की डिजिटल पायाभूत सुविधा, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे, मूलभूत नागरी पायाभूत सुविधा वैगेरे राज्य नोडल अधिकाऱ्यांद्वारे पोर्टलवर अपलोड केले जातात. CSR प्रकल्प प्रत्येक तिमाहीत निधी मागणीसाठी जिल्हानिहाय तयार केले जातात, जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीसाठी CSR मॉड्यूल अंतर्गत थीम निवड आणि प्रकल्प तयारीसाठी विंडो आता प्लॅटफॉर्मवर आहे. खालील कालावधीमध्ये संदर्भ क्र.२ नुसार कार्यवाही अपेक्षित आहे.
जिल्हा नोडल ऑफिसर द्वारे थीम निवड: 02 ते 09 जुलै, 2025
शाळांद्वारे प्रकल्प आवश्यकता 10 ते 20 जुलै, 2025
जिल्हा नोडल ऑफिसर द्वारे थीमनिहाय प्रकल्प एकत्रीकरण: 21 ते 30 जुलै, 2025
राज्य नोडल ऑफिसर द्वारे जिल्हानिहाय प्रकल्पांना मंजुरी आणि अपलोड करणे: 01 ते 10 ऑगस्ट, 2025.
CSR सहभागासाठी खुले प्रकल्प: 11 ऑगस्ट 2025 नंतर
उपरोक्त संदर्भ क्र. ३ मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देशानुसार जिल्हा नोडल अधिकारी यांनी डिजिटल पायाभूत सुविधा व सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे या दोन थीमची निवड करून त्यावर आधारित प्रस्ताव तयार करण्यासाठी शाळांशी सक्रियपणे समन्वय साधण्याविषयी कळविण्यात आले होते. तथापि काही जिल्हयांनी जर उपरोक्त थीमची निवड केली नसेल तर या तिमाहीत करून घ्यावी. तसेच ज्या जिल्हयांनी गेल्या तिमाहीत उपरोक्त थीमची निवड केली असेल त्यांनी इतर थीमची निवड करावी. जिल्हा नोडल अधिकारी यांनी वरील विद्यांजली २.० पोर्टल च्या पत्राच्या संदर्भानुसार तालुका स्तरावरील (Block Users) म्हणून आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी (Block Nodal Officer) म्हणून नेमणूक दि.05 जुलै 2025 पर्यंत करण्यात यावी. त्यासाठी संबंधित अधिकारी यांचेकडून पुढीलप्रमाणे माहिती घेण्यात यावी.
१) इंग्रजी मध्ये पूर्ण नाव
२) ईमेल
३) मोबाईल नंबर
सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर Vidyanjali 2.0 portal वर Login करण्यात यावे, यानंतर डाव्या बाजूला Users मध्ये Block Users ला क्लिक करण्यात यावे, उजव्या बाजूला +Add ला क्लिक करण्यात यावे. त्यामध्ये Name,Email, Mobile no. ही माहिती भरल्यानंतर संबंधित अधिकारी यांचा Block निवड करावा व त्यानंतर Save बटन क्लिक करण्यात यावे. अशाप्रकारे तालुका नोडल ऑफिसर यांची नेमणूक करावी. संबंधित अधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेवून Vidyanjali 2.0 portal ची माहिती देण्यात यावी. त्यानुसार तालुक्यातील शाळांची नोंदणी करणे, शाळांनी सामग्री मागणी करणे सदर बाबी वेळोवेळी राज्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तसेच सदर पत्र प्राप्त होताच जिल्ह्यातील पर्यवेक्षीय अधिकारी यांना विद्यांजली पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. विद्यांजली पोर्टलच्या बाबत काही तांत्रिक अडचणी जाणवल्यास विद्यांजली कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव यांच्याशी ९४२३५३७९२७ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संबधितानी सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत आपले स्तरावरून आदेशित करण्यात यावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे,
प्रत माहिती व कार्यवाहीस्तव :
१) जिल्हा नोडल अधिकारी, सर्व
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व
५) शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई
६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा./न.प.सर्व
Also Read 👇

Vidyanjali Portal School Project Registration
Vidyanjali Portal School Project Registration
Registration of projects by schools on Vidyanjali portal
Vidyanjali Volunteer Management Programme
विषय : विद्यांजली २.० पोर्टलवर CSR मॉड्युल सक्रिय करण्यासाठी जिल्हानिहाय थीम निवड आणि एप्रिल ते जून २०२५ साठीचा प्रस्ताव तयार करणेबाबत.
संदर्भ
: १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र F.N. 4-2/2022/KT दि.०८/०१/२०२५.
२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश दि.०३/०४/२०२५
३. मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देश दि.०७/०२/२०२५
उपरोक्त विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली २.० वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली २.० A Volunteer Management Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची भूमिका आवश्यक आहे. विद्यांजली २.० हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रिकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली २.० विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला/मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक / शासकीय / निमशासकीय
अधिकारी, कर्मचारी/सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा/कृती, मालमत्ता / साहित्य/उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.
तदनुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकट करण्यासाठी कंपन्या/नागरी संस्था/सरकारी संस्थांकडून संसाधने एकत्रित करण्यासाठी ऑक्टोबर, २०२४ मध्ये पोर्टलवर एक विशेष CSR मॉडयूल
https://vidyanjali.education.gov.in/csr
विकसित करून जोडण्यात आले आहे. यामध्ये ११ व्यापक थीम अंतर्गत शाळांद्वारे निर्माण केलेले जिल्हानिहाय सीएसआर प्रकल्प जसे की डिजिटल पायाभूत सुविधा, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे, मूलभूत नागरी पायाभूत सुविधा वैगेरे राज्य नोडल अधिकाऱ्यांद्वारे पोर्टलवर अपलोड केले जातात. CSR प्रकल्प प्रत्येक तिमाहीत निधी मागणीसाठी जिल्हानिहाय तयार केले जातात. एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीसाठी CSR मॉड्यूल अंतर्गत थीम निवड आणि प्रकल्प तयारीसाठी विंडो आता प्लॅटफॉर्मवर आहे. खालील कालावधीमध्ये संदर्भ क्र.२ नुसार कार्यवाही अपेक्षित आहे.
जिल्हा नोडल ऑफिसर द्वारे थीम निवड: ०२ ते ०९ एप्रिल, २०२५
- शाळांद्वारे प्रकल्प आवश्यकता: १० ते २० एप्रिल, २०२५
जिल्हा नोडल ऑफिसर द्वारे थीमनिहाय प्रकल्प एकत्रीकरणः २१ ते ३० एप्रिल, २०२५
राज्य नोडल ऑफिसर द्वारे जिल्हानिहाय प्रकल्पांना मंजुरी आणि अपलोड करणे: ०१ ते १० मे, २०२५.
CSR सहभागासाठी खुले प्रकल्पः ११ मे २०२५ नंतर
उपरोक्त संदर्भ क्र. ३ मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देशानुसार जिल्हा नोडल अधिकारी यांनी डिजिटल पायाभूत सुविधा व सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे या दोन थीमचीच निवड करून त्यावर आधारित प्रस्ताव तयार करण्यासाठी शाळांशी सक्रियपणे समन्वय साधावा. तसेच सदर पत्र प्राप्त होताच जिल्ह्यातील पर्यवेक्षीय अधिकारी यांना विद्यांजली पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. विद्यांजली पोर्टलच्या बाबत काही तांत्रिक अडचणी जाणवल्यास विद्यांजली कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव यांच्याशी ९४२३५३७९२७ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संबधितानी सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत आपले स्तरावरून आदेशित करण्यात यावे.
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व कीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र.रा.शै.सं.वप्र.प./सा.शा.वि/विद्यांजली२.०/२०२५/02249 प्रति,
दि. ०३/०४/२०२५
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व
५) शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई
६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा./न.प.सर्व
Also Read 👇
शाळांनी विद्यांजली पोर्टलवर प्रकल्प नोंदविणे
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे भवानी पेठ, पुणे
जा. क्र. जिशिवप्रसं/ सा.शा.वि./ विद्यांजली २.०/२०२४-२५/८०
प्रति,
दिनांक १७/०१/२०२५
विषय-जिल्ह्यातील शाळांना आवश्यक भौतिक, मनुष्यबळाच्या व इतर साधने व सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यांजली २.० पोर्टलवर CSA मॉड्युल सक्रिय करण्यासाठी प्रकल्प मागणी आणि १०० % शाळांची नोंदणीबाबत….
संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे जा.क्र.रा.शै. सं.प्र.प./ सा.शा.वि / विट्यांजली२.०/२०२४-२५/०००१५ दि. ०९/०१/२०२५ रोजीचे पत्र
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली २.० वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली २.० A Volunteer Management Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची भूमिका आवश्यक आहे. विद्यांजली २.० हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रिकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली २.० विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक / शासकीय / निमशासकीय अधिकारी, कर्मचारी / सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर
व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणूनकाम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा / कृती, मालमता / साहित्य / उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.
तदनुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकट करण्यासाठी कंपन्या नागरी संस्था / सरकारी संस्थांकडून संसाधने एकत्रित करण्यासाठी ऑक्टोबर, २०२४ मध्ये पोर्टलवर एक विशेष CSR मॉडयूल
विकसित करून जोडण्यात आले आहे. यामध्ये एकूण ११ व्यापक थीम देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय शाळांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांनी तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांनी आपली मागणी (प्रकल्प) विद्द्यांजली पोर्टल वर नोंदविणे अपेक्षित आहे. शाळांद्वारे प्रकल्प नोंदवण्याचा विहित कालावधी दिलेला आहे. तरी आपल्या अधिनस्त उपरोक्त शाळांना विहित कालावधीत विद्यांजली पोर्टलवर प्रकल्प नोंदविण्याबाबत अवगत करावे. तसेच अजूनही ज्या शाळांनी विद्यांजली २.० पोर्टल वर नोंदणी केलेली नाही अशा सर्व शाळा नोंदणी करण्याबाबत आदेशित करावे, आपल्या अधिनस्त १००% शाळांची नोंदणी होईल याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी.
(नामदेव शेंडकर) प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे