Vetan Deyak
Vetan Deyak
Regarding submission of salary payment as per set approval and addition of higher secondary school posts
संच मान्यता व उच्च माध्यमिक शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणे बाबत
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र.शिसंमा/ /२०२५-२६/ शालार्थ/टि-७ 15256
दिनांक :- १२/११/२०२५
परिपत्रक शालार्थ संचमान्यता
विषय: संच मान्यता व उच्च माध्यमिक शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणे बाबत
संदर्भ : श्री पचन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालाथा सिस्टी म यांच्याकडील संदेश दि १२.११.२०२५
शालार्थ व उच्च माध्यमिक संच मान्यता या दोन्ही प्रणालीची जोडणी इंटीग्रशन केलेल असून शालार्थमध्ये पे बील जनरेट करत असताना संच मान्यतेमधील मान्य पदांपेक्षा जास्त पदांचे देयक अदा करावयाचे असल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी सदर देयकास मंजुरी दिल्यानंतर सदर देयक यंतन पथक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. पगार देयका मधील पदे मान्य पदांपेक्षा जास्त असल्यास अशा पर्दाचे वेतन करताना एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांनी अशा देयकांना मान्यता घेणे ऑनवार्य असेल,
या यावतच्या कार्यप्रणाली विषयची सविस्तर युजर मॅन्युअल शालार्थ प्रणालीवर उपलब्ध केले आहे. शालार्थ व उच्च माध्यमिक संच मान्यता या दोन्ही प्रणालीचे जोडणी बाबतच्या कार्य प्रणाली संदर्भात सुचना
खलीलप्रमाणे आहे. १. शालार्थ मध्ये संच मान्यता पोस्ट मॅपिंग व यू डायस कोड मॅपिंगची प्रोसेस पुर्ण असणे अनिवार्य आहे.
२. डी. डी. ओ. लेवल १ कॉलेज देराबर वेतन देयक तयार करता येणार आहे.
३. सदर येतन देयक फॉरवर्ड करताना व संच मान्यता प्रणालीमधून सदयस्थितीमध्ये मान्य पर्दाचा तपशी तपासून जर संच मान्यतंपेक्षा जास्त पदांचे चंतन देयक तयार झालेले असेल तर शालार्थ प्रणाली तसा संदेश येईल व तसेच शाळा स्तरावर त्याचाबतचा सर्व तपशील कॉलेज प्रमुखंच्या लॉगिन मध्ये Error Screen या बटनावर क्लीक केल्यावर उपलब्ध होईल.
४. या नंतर सदर देयक हे एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांना मान्यतेसाठी Forward To DYD या बटनावर क्लीक केल्या नंतर सदर वेतन देयक हे एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांच्या लांगीनला उपलब्ध होईल
५. एक स्तर यरिष्ठ अधिकारी Dy Director यांच्या स्तरावर सदर देयकाचा सविस्तर तपशील उपलब्ध होईल. या स्तराबर मंजूरी मिळाल्या नंतर सदर देयक कॉलेज प्रमुखाकडे कार्यवाही साठी उपलब्ध होईल
६. सद्यस्थितीमध्ये खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांप्रमाणेच उच्च माध्यमिक शाळा करीता सदर सुविधा कार्यन्वीत झालेली आहे.
७. ज्या उच्च माध्यमिक शाळांची संच मान्यता प्रलंयीत आहे त्या शाळांच्या संच मान्यता करण्याची कार्यवाही संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळा प्रमुखा मार्फत त्वरीत नियमाप्रमाणे करावी, शैक्षणिक वर्ष २०२४-२५/२०२५-२६ (या पेको लागू असेल तो) संच मान्यते अभावी संबंधित कॉलेजच्या वेतन देयका संबंधित अडचणी निर्माण झाल्यास याची संपूर्ण जवावदारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील. या पुढे विहीत कालमर्यादित संच मान्यता करीता आवश्यक असलेली माहिती यु डायस व सरल प्रणालीवर अद्ययावत करणे कॉलेज प्रमुखंना अनिवार्य असेल. माहिती योग्य नोंदवली नसल्यास त्या वर्षाची संच मान्यता होणार नाही.
करीता उपरोक्त प्रमाणे कार्य कार्यवाही करण्यात याची
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
