ULLAS NBSK Survey
ULLAS NBSK Survey
विषयः-केंद्र पुरस्कृत उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS NBSK) सन २०२२-२७अंमलबजावणीसाठी सन २०२५-२६ च्या देण्यात आलेल्या जिल्हानिहाय उद्दिष्टानुसार (असाक्षर व्यक्ती संख्या) असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करणेबाबत
Regarding conducting a survey of illiterate persons as per the district-wise target (number of illiterate persons) given for the year 2025-26 for the implementation of the centrally sponsored Ullas-Nav Bharat Saksharta Programme (ULLAS NBSK) for the year 2022-27
संदर्भ:-१) केंद्र शासनाद्वारे नभासाका/अंमलबजावणीसाठी देण्यात आलेला Road Map
२) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः नभासाका ०३२२/प्र.क्र/एस.डी-२, दि.१४/१०/२०२२ व दि. २५/०१/२०२३
३) मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि. १०/०४/२०२३ रोजी संपन्न राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण-नियामक परिषद बैठकीचे मंजूर इतिवृत्त दि. ११/०५/२०२३
४) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/नभासाका/मार्गदर्शक सूचना/२०२३-२४/१३२२, दि.०४/०७/२०२३
५) Letter No. Desk-३/NILP AWP&B २०२५-२६/००००१, दि.०६/०१/२०२५
६) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/नभासाका/उद्दिष्ट वितरण २०२५-२६/००७४० दि.०९/०४/२०२५
केंद्र पुरस्कृत उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्र. २ मधील अनुक्रमे शासन निर्णय दि. १४/१०/२०२२ व दि. २५/०१/२०२३ नुसार सन २०२२ ते २०२७ या कालावधीत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS NBSK) ची अंमलबजावणी करणे व या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर विविध समित्यांची स्थापन करण्यात आलेली आहे.
संदर्भ क्र.५ नुसार वार्षिक कार्यनियोजन व अंदाजपत्रक सन २०२५-२६ साठी राज्याकरिता ६ लक्ष २० हजार एवढे असाक्षरांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यानुसार संदर्भ क्र. ६ अन्वये, जिल्हयाकरिता असाक्षर उद्दिष्ट वितरण करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास मोबाईल अॅपवर करण्यासाठी असाक्षरांचे सर्वेक्षण, नोंदणी, असाक्षर व स्वयंसेवक यांची जोडणी व प्रत्यक्ष अध्य-अध्यापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमार्फत सन २०२५ मध्ये प्रवेशपात्र/दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण व शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षर व्यक्तींचेही सर्वेक्षण करण्यात यावे. संदर्भ क्र.४ नुसार असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करणेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार आपण आपल्या जिल्ह्यातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रांमध्ये असाक्षर व्यक्ती व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करून असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास मोबाईल अॅपवर नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग व प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन करणेबाबत सूचना द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सोबत – असाक्षर व्यक्ती सर्वेक्षण प्रपत्र १ ते ६ साठी या ओळीला स्पर्श करा
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे