Aashramshala Shikshak Bharti Pavitr Portal

Aashramshala Shikshak Bharti Pavitr Portal
Ashram Shala Shikshak Bharti Pavitr Portal
Ashram School Teacher Recruitment Through Pavitr Portal
Aashramshala Schools Recruitment
दि. ९ एप्रिल, २०२५
वाचा :
१. केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- २००९.
२. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक अआशा-२०१३/प्र.क्र. २००/का-११, दि. ०३/१०/२०१३.
३. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक अआशा-२०१९/प्र.क्र.१०२/का-११, दि. ११ जून, २०१९
४. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक अआशा-२०१९/प्र.क्र.१०१/का-११, दि. १८ जुलै २०१९
५. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक अआशा-२०१९/प्र.क्र.१२३/का-११, दि. २० ऑगष्ट २०१९
६. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक अआशा-२०१९/प्र.क्र. १२३/का. ११ दि. ११ मे, २०२२.
७. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्र. क्र. १३९/का-१५, दि. १६ नोव्हेंबर, २०२२.
८. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५ (प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२, दि. १५ मार्च २०२४.
९. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५ (प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२, दि. १९ सप्टेंबर, २०२४.
१०. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५ (प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२, दि. ०९ ऑक्टोबर, २०२४.
प्रस्तावना –
आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाच्या मुलां-मुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. सदर निवासी आश्रमशाळा शासनामार्फत तसेच स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदानित तत्वावर चालविण्यात येतात.
२. केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अंतर्गत विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षक कर्मचारी संख्या निर्धारित केलेली आहे. तेव्हा सध्या अस्तित्वात असलेली वर्गनिहाय शिक्षक संख्येमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ अन्वये संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित केलेले आहेत. तसेच त्यामध्ये दि. १९ सप्टेंबर, २०२४ व दि. ०९ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारणा केली आहे.
३. आदिवासी विकास विभागाने यापुर्वी शासन निर्णय दिनांक १८/०७/२०१९ व २०/०८/२०१९ अन्वये अनुक्रमे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संच मान्यतेचे निकष ठरविले होते. सदर शासन निर्णय अधिक्रमित करून शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १५/०३/२०२४, दि. १९ सप्टेंबर, २०२४ व दि. ०९ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यामध्ये काही सुधारणा करुन संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित करण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय
केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ मधील तरतुदी लक्षात घेवून आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे याबाबतचे सुधारित निकष शालेय शिक्षण विभागाच्या दि. १५ मार्च २०२४, दि. १९ सप्टेंबर, २०२४ व दि. ०९ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयांच्या धर्तीवर पुढीलप्रमाणे विहीत करण्यात येत आहे.
अनुदानित आश्रमशाळांचे संच मान्यतेचे यापुर्वी निर्गमित शासन निर्णयाचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करुन शिक्षक संचमान्यतेचे सुधारित निकष लागू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: अआशा-२०२४/प्र.क्र. २१२/का.११ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई