राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडकड़े वर्ग करण्याबाबत Transfer of Amount NPS to NSDIL

Transfer of Amount NPS to NSDIL

Transfer of Amount NPS to NSDIL

Transfer of Amount Under NPS to NSDIL

Regarding the transfer of amount under National Pension Scheme to National Securities Depository Limited (NSDIL).

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

जा.क्र./प्राशिसं/अंदाज व नियोजन/२०२/२०२५/1542355
दिनांक १२/११/२०२५
14 NOV 2025

 विषयः- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDIL) कड़े वर्ग करण्याबाबत.

संदर्भ :
१) वित्त विभागाचे पत्र क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र.५८/सेवा ४. दि.०१/१२/२०२२
२) शासनाचे समक्रमांकाचे दि. ०२/१२/२०२२ चे पत्र
३) शासनाचे अ.शा.प. क्रमांकः-संकीर्ण-२०२१/प्र.क्र.६३/टीएनटी-६दिनांक. ०८.१२.२०२२
४) शासनाचे समक्रमांकाचे दि. १२/०४/२०२३ चे पत्र.
५) शासनाचे अर्धशासकीय पत्र क्रमांक क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७७/टीएनटी-६, दि.१०.११.२०२५

जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचा-यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम दिनांक ११/०३/२०२५.वाचा या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त संदर्भीय विषयांकित अर्धशासकीय पत्राची प्रत व विहीत नमुना सोबत जोडला आहे.
संदर्भीय पत्रान्वये शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखे दि.३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत पूर्ण करुन संबंधित रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत रितसर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात करणेबाबत तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कडे वर्ग करण्याबाबत व त्यांच्याशी खर्चाचा ताळमेळ करून अहवाल सादर करणेबाबत आपणास निर्देश देण्यात आलेले होते. तसेच संचालनालयाकडून वेळोवेळी बैठकीव्दारे (व्ही.सी. व्दारे) सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Unified Pension Scheme (UPS) – एकमार्गी व एकवेळचा पर्याय म्हणून पुन्हा NPS मध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: भाप्रसे-१५२५/प्र.क्र.१४५/२०२५/भाप्रसे-३
दिनांक : ०९ सप्टेंबर, २०२५ वाचा या ओळीला स्पर्श करून

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये जमा असलेल्या रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील खात्यावर वर्ग करणे आवश्यक आहे. संचालनालयाकडून जिल्हा परिषदासंदर्भात शालार्थ प्रणालीमधील प्राप्त माहितीनुसार दि. १७/१०/२०२५ रोजी सादर केलेल्या विवरणानुसार अद्यापही रु.९० कोटीपेक्षा जास्त रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये वर्ग करण्याचे बाकी आहे. सदर बाब वित्तीय औचित्यानुसार निश्चितव चिंताजनक आहे. याबाबत शासनाकडून अर्धशासकीय पत्र प्राप्त झालेले असून तात्काळ विशेष मोहिम राबवून १५ दिवसात सदर रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये वर्ग करण्याची कार्यवाही करून सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात त्याची माहिती तात्काळ सादर करावी. तसेच ज्यांचे एनपीएस चे खाते उघडण्यात आलेली नाहीत अशा कर्मचायांचे एनपीएस खाते उघडून त्यांच्याही रकमा एनएसडीएल कडे वर्ग करण्याची कार्यवाही करून याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची रक्कम गहाळ (missing credit) असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.२१/सेवा-४, दिनांक : १०.०७.२०२५. वाचा या ओळीला स्पर्श करून

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये जमा असलेल्या रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील खात्यावर वर्ग न करणे ही बाब निश्चितच सकृतदर्शनी आपली कामाप्रती अनास्था दर्शविते. सदरची कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियमास धरून नाही. तरी विषयांकित प्रकरणी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व यांनी प्राथम्याने विशेष लक्ष घालून १० दिवसात कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.

सदरची कार्यवाही विहीत कालावधीत म्हणजेच १० दिवसात पूर्ण न झाल्यास आपली कामाप्रती अनास्था असल्याचे गृहीत धरून आपणाविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव मा. आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे प्रस्तावित करण्यात येईल याची गांर्भीयांने नोंद घ्यावी.

सोबत विहीत नमुना व शासनपत्र संलग्न पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

Transfer of Amount NPS to NSDIL
Transfer of Amount NPS to NSDIL

Leave a Comment

error: Content is protected !!