ALL DCPS EMPLOYEES AMOUNT AND INTREST TRANSFER TO NPS
ALL DCPS EMPLOYEES AMOUNT AND INTREST TRANSFER TO NPS
DCPS AMOUNT AND INTREST TRANSFERRED TO NPS
ALL DCPS EMPLOYEES AMOUNT AND INTREST TRANSFER TO NPS
Contributions of teachers and non-teaching staff in primary, secondary, higher secondary and teacher training colleges of Zilla Parishad as well as recognized private 100 percent granted / aided / subsidized posts and interest amount on government share and employee contributions
जा.क्र./प्राशिसं/अं.नि./२०२/२०२५/०१३८७
दिनांक ११/०३/२०२५.
विषय :- जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचा-यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम
संदर्भ :- शासन निर्णय क्रमांक अंनियो-२०२४/प्र.क्र.७९/टिएनटी-६,दि.०६.०३.२०२५
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयानुसार आपणास कळविण्यात येते की, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदाने, शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करणे लेखाशिर्ष ८४४२०२५७ व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने खाली वर्ग करणे लेखाशिर्ष ८३८२०२७५ तरतूद निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी सदरचा निधी दिनांक २५.०३.२०२५ पर्यंत १०० टक्के खर्च करण्यात यावा. सन २०२१ या वर्षापासून परिभाषित अशंदान निवृत्तीवेतनाची जमा झालेली रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निधी वर्ग करण्याची ही अंतिम संधी असून सर्व डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांची रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करण्यात यावी. यानंतर जर कोणाची रक्कम वर्ग करावयाची राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. व अशा शिक्षणाधिकारी यांचेविरूध्द म.ना. से. शिस्त व अपील १९७९ नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
या ओळीला स्पर्श करून परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन,प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
प्रति,१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व,३. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) सर्व