Introduction of one time one way Switch facility from UPS to NPS
Introduction of one time one way Switch facility from UPS to NPS
Unified Pension Scheme (UPS)- Introduction of one-time one-way Switch facility from UPS to NPS- reg.
Unified Pension Scheme (UPS) – एकमार्गी व एकवेळचा पर्याय म्हणून पुन्हा NPS मध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत
दिनांक : ०९ सप्टेंबर, २०२५
वाचा :- १) केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाची अधिसूचना क्र.F/No.FX१/३/२०२४-PR, दि.२४.०१.२०२५
२) पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), नवी दिल्ली यांची अधिसूचना क्र.PFRDA-१२/०१/०००१/२०२३-LEGAL, दि.१९.०३.२०२५
३) पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), नवी दिल्ली यांची अधिसूचना क्र.PFRDA-२०२५/०४/SUP-CG-SG/०१, दि.२६.०६.२०२५
४) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक समक्रमांक दि. २५.०८.२०२५८
५) केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाचे कार्यालयीन ज्ञापन File No.१/३/२०२४-PR, दि.२५.०८.२०२५
शासन परिपत्रक –
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने NPS (National Pension Scheme) लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPS (Unified Pension Scheme) चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यांसदर्भात दि.२०.०१.२०२५ ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच पेंशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), नवी दिल्ली यांनी दि.१९.०३.२०२५ व २६.०६.२०२५ च्या अधिसूचनेद्वारे “पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण, (NPS अंतर्गत UPS योजनेचे परिचालन) नियम, २०२५” जारी केले आहेत. त्यानुसार UPS योजना दि.०१.०४.२०२५ पासून अंमलात आली असून दि.३०.०९.२०२५ पर्यंत केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना UPS निवडण्याबाबतचे विकल्प सादर करावयाचे आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील, NPS लागू असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी UPS चे विकल्प सादर करण्याबाबत आवश्यक सूचना दि.२५.०८.२०२५ च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.
वाचा :- १) केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाची अधिसूचना क्र.F/No.FX१/३/२०२४-PR, दि.२४.०१.२०२५
२. केंद्र शासनाच्या दि.२०.०१.२०२५ च्या अधिसूचनेनुसार एकदा UPS (Unified Pension Scheme) चा विकल्प निवडल्यास तो अंतिम असेल असे नमूद करण्यात आले आहे. तथापि, आता दि.२५.०८.२०२५ च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये, UPS चा विकल्प निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ एकमार्गी व एकवेळची सुविधा म्हणून पुन्हा NPS मध्ये समावेशन करुन घेण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास्तव, केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाचे दिनांक २५.०८.२०२५ चे कार्यालयीन ज्ञापन सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे.
- सदर परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०९०९१२३१४०९४०७ असा आहे. सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: भाप्रसे-१५२५/प्र.क्र.१४५/२०२५/भाप्रसे-३
मंत्रालय, मुंबई