Time Limit for Submission of Medical Reimbursement Bill of ZP Employees
Time Limit for Submission of Medical Reimbursement Bill of ZP Employees
Time Limit for Submission of Medical Reimbursement Payment of Zilla Parishad Employees
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
क्र. वैप्रदे-२०२५/प्र.क्र.१३०/आस्था-७
दिनांक :- २४ फेब्रुवारी, २०२५
विषय : जिल्हा परिषद कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक सादर करण्यासाठी कालमर्यादा विहित करण्या बाबत.
महोदय,
ग्राम विकास विभागाकडे जिल्हा परिषद कर्मचारी यांचे वैद्यकीय देयक प्रतिपूर्ती मिळणेबाबतचे मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त होतात. तथापि सदरचे प्रस्ताव जवळपास एक ते दोन वर्ष इतक्या विलंबाने शासनास प्राप्त होत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यासंदर्भात मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राजा, यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४.०२.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रधान सचिव, (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे समिती कक्ष, बांधकाम भवन मुंबई येथे आयोजित बैठकीत मा. मंत्री महोदयांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रलंबित देयकांसंदर्भात तात्काळ कार्यवाही करणे बाबत तसेच जिल्हा स्तर व विभागीय स्तर यांनी विहित कालमर्यादेत देयके शासनास सादर करणेबाबत कालमर्यादा ठरवून देण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.
३. या अनुषंगाने वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खालील प्रमाणे कालमर्यादा ठरवून देण्यात येत आहे.
अ. क्षेत्रीय कार्यालय
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी विहित
कालमर्यादा.
१. तालुका स्तर
संबंधित कर्मचारी यांचेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करावा.
(उदा. पंचायत समिती कार्यालय)
२. जिल्हा परिषद (मुख्य कार्यकारी अधिकारी)
तालुका स्तरावरुन प्राप्त झालेला प्रस्ताव ३० दिवसांच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करावा.
३. विभागीय आयुक्त कार्यालय
१. जिल्हा परिषद कडून प्रस्ताव प्राप्त झालेला प्रस्ताय ३० दिवसांत शासनास सादर करावा.
२. ग्रामविकास विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींचा पूर्तता अहवाल ३० दिवसांत शासनास सादर करावा.
उपरोक्त कालमर्यादेनुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचना विचारात घेऊन प्रस्तावावर कार्यवाही करावी व उपरोक्त कालमर्यादेचे उल्लघंन होणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.
आपला,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रति,
१) विभागीय आयुक्त (सर्व).
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).