RTE 25 Percent Admission Reimbursement Rate Of Education Fee Expenditure Fixed

RTE 25 Percent Admission Reimbursement Rate Of Education Fee Expenditure Fixed
Regarding fixing the rate of reimbursement of educational expenses fee of students admitted to reserved seats at entry level in schools under 25 per cent under RTE.
आरटीई अंतर्गत २५% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. ५८००,०० लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः आरटीई २०२४/प्र.क्र. ९७/एसडी-१, मंत्रालय, मुंबई
दिनांक: २० मार्च, २०२५
वाचा:
१) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क. आरटीई/टे-८०५/२०२४/५४३७ दि. १२.०८.२०२४
२) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. प्राशिसं/को. के. प्रपू/आरटीई //टे-८०१/२०२४/५८७१, दि. ०३.०९.२०२४
३) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. प्राशिसं/को. के.प्र.पू/टे-८०१/२०२४/७२६३ दि. ००१.११.२०२४
४) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र.. प्राशिसं/को, के.प्र.पू/टे-८०१/२०२४/७४१४ दि.२५.११.२०२४
५) वित्त विभागाचे परिपत्रक क्रर्माका अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३. दि.२५.०७.२०२४
६) शासन निर्णय समक्रमांक दि. १४.०१.२०२५
प्रस्तावना
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (८) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर संबंधीत वर्गातील विद्यार्थी संख्येच्या कमीत कमी २५% जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. तसेच सदर अधिनियमातील कलम १२ (२) अन्वये आरटीई २५% अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनामार्फत करण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती उपरोक्त संदर्भ १ ते ४ येथील पत्रान्वये शासनास केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीसाठी रु. १७३.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. यास्तव, शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून आरटीई २५% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी रू. ६९२०,०० लक्ष इतका निधी शासन निर्णय दि. ०५.०९.२०२४ अन्वये वितरित करण्यात आलेला आहे. तदनंतर संदर्भ क्र. ७येथील शासन निर्णयान्वये रू. ४५००.०० लक्ष इतका निधी आता संदर्भ क्र. १ ते ४ येथील शिक्षण संचालक यांच्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ आणि सन २०२३-२४ या वर्षाच्या चकीत प्रतिपुर्तीसाठी वितरित करण्यात आलेला आहे. आता संदर्भ क्र. १ ते ४ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावामधील शाळांच्या मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अदा करावयाच्या उर्वरित थकीत शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी रक्कम रू. ५८८०.०० लक्ष निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (C) व कलम १२ (२) अन्वये केलेल्या तरतूदींच्या अनुषंगाने आरटीई २५% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी रू. ५८८०.०० लक्ष (रूपये अठ्ठावन्न कोटी ऐशी लक्ष फक्त) इतका निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जिल्ह्यांनी केलेल्या वाजवी मागणीच्या प्रमाणात निधी वित्तरीत कराया. वितरीत करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भ क्र. १ ते ४ येथील न्यायालयीन प्रकरणामध्ये मा. उच्च न्यायालयाने प्रतिपुर्ती करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत तसेच मा. उच्च प्रतिपुर्तीसाठी वितरित करण्यात यावा.
- शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करतांना शासन परिपत्रक दि.२१.८.२०१९ नुसार खालील बाबींची पडताळणी करून घ्यावी.
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ कायद्यांतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिले आहेत, अशा शाळांनी इ.१ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी आकारण्यात येणा-या शैक्षणिक शुल्काचा तपशील सरल या पोर्टलवर अथवा आरटीई पोर्टलवर जाहीर केलेला असावा. ज्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ (Website) आहे. अशा शाळांनी शुल्काचा तपशील संकेतस्थळावर देखील जाहीर केलेला असावा.
२. शाळेने शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत आरटीई थी मान्यता प्राप्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
- ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीने यापूर्वी ज्या शाळेत प्रवेश मिळालेला आहे, असे विद्यार्थी संबंधीत शाळेतच शिकत असल्याची खात्री सरल व आरटीई पोर्टल वरून करावी.
४. सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड सरल पोर्टलवर नोंदविलेले असावे. केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरावी, तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त २५ टक्के संख्या ही प्रतिपूर्तीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
५. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम-१२ (२) मधील परंतुकात नमूद केल्यानुसार कोणतीही जमीन, इमारत, साधन सामग्री किंवा इतर सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात प्राप्त झाल्याच्या कारणावरून ज्या शाळांना विशिष्ट संख्येतील बालकांना मोफत शिक्षण देण्याची अट घालण्यात आली असेल, अशा शाळा, बालकांच्या विशिष्ट संख्येच्या मर्यादेपर्यंत शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी हक्कदार असणार नाहीत.
सदरचे अनुदान ज्या प्रयोजनार्थ मंजूर करण्यात आले आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे. वित्त विभागाच्या दिनांक १२.४.२०२३ च्या शासन परिपत्रकातील सर्व अटींची पूर्तता होत आहे.
वित्त विभागाच्या उपरोक्त संदर्भ-१ येथील परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांनुसार सदर प्रकरणी खर्च करावा यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
प्रत सर्व जिल्हा परिषदा तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून तसेच आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनास सादर करावे.
- आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्राप्त झालेला निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करावा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदरचा निधी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे सुपूर्द करावा, जिल्हास्तरावरील प्रलंबित मागण्यांचा आढावा घेऊन त्यानुसार त्यासंदर्भातील नोंदी केंद्र शासनाच्या प्रबंध पोर्टलवर नोंदवाव्यात.
८. सदर खर्च मागणी क्रमांक ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक शिक्षण, १०३, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य (०१) प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य (०१४१९) २५ टक्के विद्यार्थी कोट्याकरिता शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करणे (२२०२एच८७५) ३१ सहायक अनुदाने” या लेखाशिर्षांखालील सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.
९ सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २६४/२०२५/व्यय-५ दि.२०.०२.२०२५ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा २०२५०३२०१२३०४९७७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
हे ही वाचा 👇
आरटीई अंतर्गत २५ टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत.
दिनांक:- २१ फेब्रुवारी २०२५.
वाचा :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, क्र. आरटीई २०१८/प्र.क्र. २४५/एसडी-१, दि.२१.०८.२०१९.
२) शासन निर्णय, क्रमांक, दि. २८.०२.२०२४.
प्रस्तावना :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानीत प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (२) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेशीत विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती शासनाने प्रतिवर्षी निश्चित केलेले दर व शाळांनी त्या त्या वर्षी तरविलेली फी यापैकी जे कभी असेल त्यानुसार संबंधित शाळांना करण्यात येते. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ह्या वर्षाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
शासन निर्णय
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९, कलम १२ (१) (सी) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना खाजगी विनाअनुदानीत स्वंयअर्थसहाय्यीत शाळांमध्ये उच्च प्राथमिक स्तरापर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते.
२ त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर रु. १७,६७०/- प्रती विद्यार्थी करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
- शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करताना शासन परिपत्रक, दि. २१.०८,२०१९ नुसार खालील बाबीची पडताळणी करावी.
१) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ कायद्यांतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी २५% जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिले आहेत, अशा शाळांनी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काचा तपशिल सरल या पोर्टलवर अथवा आरटीई पोर्टलवर जाहीर केलेला असावा. ज्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ (Website) आहे, अशा शाळांनी शुल्काचा तपशिल संकेतस्थळावर देखील जाहीर केलेला असावा,

२) शाळेने शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत आरटीई ची मान्यता प्राप्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोवत जोडावे,
३) ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरी पध्दतीने यापूर्वी ज्या शाळेत प्रवेश मिळालेला आहे, असे विद्यार्थी संबंधित शाळेतच शिकत असल्याची खात्री सरल व आरटीई पोर्टलवरून करावी.
४) सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड सरल पोर्टलवर नोंदविलेले असावे. केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरावी तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त २५% संख्या ही प्रतिपूर्ती साठी ग्राह्य धरण्यात येईल.
५) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम, २००९ मधील कलम १२ (२) मधील परंतुकात नमूद केल्यानुसार कोणतीही जमीन, इमारत, साधन सामग्री किंवा इतर सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात प्राप्त झाल्याच्या कारणावरून ज्या शाळांना विशिष्ट संख्येतील बालकांना मोफत शिक्षण देण्याची अट घालण्यात आली असेल, अशा शाळा, बालकांच्या विशिष्ट संख्येच्या मर्यादेपर्यत शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी हक्कदार असणार नाहीत.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२२११५४८१३७७२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
GR PDF COPY LINK
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागशासन निर्णय क्रमांक:- आरटीई २०२३/प्र.क्र. १६/ एसडी-१, मुंबई
