Teachers Suspended Immediately
Teachers suspended immediately
Zilla Parishad suspends teacher for causing reduction in school enrollment
Regarding taking administrative action against teachers who are responsible for reducing the number of students in a Zilla Parishad school.
जा.क्र.बुजिप/शिप्रा/प्रा-२/३/०५/२०२५ शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद बुलडाणा
दिनांक ।। जुन २०२५.
विषय : जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी करण्यास कारणीभुत शिक्षकाविरुध्द प्रशासकीय कार्यवाही करणे बाबत.
संदर्भ : संबधीत शाळांच्या शिक्षकांसोबत झालेली बैठक दि. ११/०६/२०२५.
माझ्या असे निदर्शनास आले आहे की जिल्हयात १ ते १० पटसंख्येच्या अनेक शाळा असुन सदर शाळेवर गत अनेक वर्षापासुन कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या अकार्यक्षमतेमुळे शाळांच्या पटसंख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसुन येत आहे. आज झालेल्या बैठकीत संबधीत शाळांच्या शिक्षकांना घटलेल्या पटसंख्येच्या प्रश्नाबाबत समर्पक खुलासा देता आला नाही त्यामुळे घटलेल्या पटसंख्येसाठी संबधीत शिक्षक जबाबदार असल्याचे सकृतदर्शनी आढळुन येते. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे आहे.
हेही वाचा
निपुण गुणवत्ता विकास अभियान कर्तव्यात कसुर जिल्हा परिषद सेवेतून शिक्षक निलंबित
आपणास याव्दारे सुचित करण्यात येते की, उपरोक्त शाळांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना तात्काळ निलंबित करुन त्यांना कार्यरत पंचायत समिती मुख्यालय देण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलट टपाली या कार्यालयास सादर करावा
हेही वाचा
निलंबित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा
प्रति,गटविकास अधिकारी, पंचायत समिती बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, नांदुरा व मोताळा
प्रतिलीपी.
१) गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, नांदुरा व मोताळा यांना कार्यवाहीस्तव.