NIPUN Abhiyan kartavyat Kasur ZP Prathmik Shikshak Nilambit
NIPUN Abhiyan kartavyat Kasur ZP Prathmik Shikshak Nilambit
NIPUN Dereliction of duty Z P Primary Teacher Suspended
NIPUN campaign duty Dereliction ZP Primary Teacher Suspended
निपुण गुणवत्ता विकास अभियान कर्तव्यात कसुर जिल्हा परिषद सेवेतून शिक्षक निलंबित
दि 4/12/2024
आदेश
ज्या आर्थि संदर्भ क्रं. ३ अन्वये गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती हिंगोली यांचेकडील चौकशी अहवाला वरुन मा. जिल्हाधिकारी, कार्यालय हिंगोली, शिक्षणाधिकारी (प्रा) जिल्हा परिषद हिंगोली व गटशिक्षणाधिकारी, हिंगोली यांच्या पथकाने निपुण हिंगोली गुणवत्ता विकास अभियानांतर्गत दिनांक-२०/१२/२०२४ रोजी प्रा.शा. पेडगांव शाळेस भेट दिली असता, इयत्ता ४ थी वर्गाची अध्ययन स्तर तपासणी केली असता संकलित मुल्यमापन चाचणी क्रं-१ अध्ययन स्तर मध्ये तफावत दिसुन आलीआहे. त्यानुसार श्री—– सहशिक्षक, प्रा.शा. पेडगांव कें.प्रा.शा. सिरसम ता. जि. हिंगोली यांनी माहे ऑक्टोंबर २०२४ महिन्यात घेतलेल्या संकलित मुल्यमापन उत्त्तर पत्रिका वस्तुनिष्ठपणे तपासलेल्या नाहीत. विद्यार्थी प्रारंभीक स्तर मुळाक्षर वाचन स्तर, सोपे शब्द वाचन स्तरावर असुन मराठीच्या उल्लर पत्रिकेमध्ये शब्द लेखन, वाक्य लेखन, उत्तरलेखन सोडवुन घेवुन चुकीचे गुणदान मराठी मध्ये केल्याचे दिसुन येते. गणित विषया मध्ये विद्यार्थी १ ते १० अंकवाचन स्तर, साधी बेरीज, वजाबाकी स्तरावरील विद्यार्थ्याच्या उतर पत्रिकेमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरण सोडवुन घेवुन चुकीचे गुणदान केल्याचे दिसुन येते. इंग्रजी विषयात ११ वि प्रारंभीक. ०६ हि मुळाक्षर स्तरावर असतांना त्यांच्या उत्तरपत्रिकेत इंग्रजी संभाषण, कविता गायन, शब्द लेखन, वाक्यलेखन करुन त्यांना चुकीचे गुणदान केल्याचे दिसुन येते. मराठी उत्त्तर पत्रिके मध्ये ——, गणित विषयात ___, विद्यार्थ्याच्या उत्तर पत्रिकेत हस्तांक्षर बदल केलेला दिसुन येतो. तसेच काही प्रश्नाची उत्तरे वेगळ्या हस्ताक्षरात दिसुन येतात असा चौकशी अहवाल सादर केला आहे. ही प्रशासनाच्या दृष्टिकोणातुन गंभीर स्वरुपाची बाब आहे. यावरुन संबंधिताने शासकीय कार्यात कसुरी केल्याने, शालेय कर्तव्यपरायणता न ठेवता कर्तव्यात कसुर केल्याची बाब निदर्शनास येते.
हेही वाचा 👇
जिल्हा परिषद कर्मचारी थेट न्यायालयात जाऊ शकत नाही पूर्व परवानगीची आवश्यकता
त्या आर्थि मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली मला प्राप्त अधिकारा नुसार श्री.____ सहशिक्षक, प्रा.शा. पेडगांव कें.प्रा.शा. सिरसम ता. जि. हिंगोली यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे नियम ३ अन्वये जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करीत आहे.
निलंबन काळात संबंधिताचे मुख्यालय गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कळमनुरी हे राहील. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कळमनस यांचे पुर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन काळात संबंधितास निर्वाह भत्ता म्हणुन संबंधितास जर अर्धपगारी रजेवर असते तेवढे वेतन मिळाले असते तेवढा निर्वाह भत्ता देण्यातयावा. निलंबन काळात संबंधितास कोणताही खाजगी व्यवसायअथवा नौकरी करता येणार नाही. सदर आदेशाची नोंद संबंधिताच्या मुळसेवा पुस्तिकेत घेण्यात यावी.
मुख्यकार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद हिंगोली.
जिल्हा परिषद, हिंगोली शिक्षण विभाग (प्राथमिक)
जाक्र/जिपहिं/शिविप्रा/विचो/कावि/ 12/2025
PDF COPY LINK
२. मा जिल्हाधिकारी, हिंगोली, शिक्षणाधिकारी (प्रा) जिल्हा परिषद हिंगोली व गटशिक्षणाधिकारी, हिंगोली यांची पथकाने निपुण हिंगोली गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शाळा भेट दिनांक. २०/१२/२०२४.
३. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती हिंगोली जि. हिंगोली यांचेकडील अहवाल जाक्र पंसहि आस्था कावि /१२४६ दिनांक २३/१२/२०२४.
वाचा : महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे नियम ३ अन्वये GF101/2025
प्रतिलिपी
१. मा. जिल्हाधिकारी, कार्यालय हिंगोली यांना माहितीस्तव सविनय सादर
२. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती हिंगोली जि. हिंगोली यांना देवुन कळविण्यात येते की, संबंधिता विरुध्द परिशिष्ट दोषारोप १ ते ४ साक्षीदाराची यादी व पुराव्याच्या कागदपत्रासह परिपुर्ण प्रसताव या कार्यालयास सादर करावा.
३. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती
४. मुख्याध्यापक, कें. प्रा.शा. सिरसम ता. हिंगोली जि. हिंगोली
५. संबंधितास