Talathi Bharti Update
Talathi Bharti Update
Talathi Padbharti 2026 Update Information
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
त्रिशूल गोल्ड फिल्ड इमारत, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीवीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४.
Email Id: contact-secretary@mpsc.gov.in
क्रमांक : सीएमए-०४२६/प्र.क्र४२/२०२६/जाहिरात
दिनांक :- २२ जुलै, २०२६
-: शुद्धिपत्रक :-
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६ जाहिरात क्रमांकः ०१७/२०२६, दिनांक २५ जून, २०२६
आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, आयोगाच्या दिनांक १६ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धिपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रानिमं१२२४/प्र.क्र.७०/सेवा-४, (का.१३-अ), दिनांक ०५ मे, २०२६ अनुसार महाराष्ट्र गट-क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे :-
३. उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.
४. सदर शुद्धिपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
अ.क्र. तपशील विहित कालावधी
१ अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०५ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
२ ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) शुल्क भरणे आवश्यक आहे.
५. सदर शुद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मधून एकूण ५७०७ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
६. मूळ जाहिरातीमधील तसेच दिनांक १६ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
(सं. पां. देशमुख)
उप सचिव, जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
https://mpsconline.gov.in/candidate/login
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून
क्र. तलाठी-२०२२/प्र.क्र.१९० (भाग-२)/ई-१०
दिनांक: १६ फेब्रुवारी, २०२६
विषय- तलाठी पदभरती सन २०२३ बाबत.
संदर्भ- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०२३/प्र.क्र.५४/आरक्षण-५, दि.११.०२.२०२६.
महोदय,
तलाठी भरती २०२३ अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीस अनुसरून एकूण ४७९३ पदांकरीता ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्याने पेसा क्षेत्रातील ५७४ पर्द वगळता सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या निर्देशास अनुसरुन तलाठी भरती २०२३ च्या अनुषंगाने दि.११/३/२०२४ रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांकरीता जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती.
२. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ०५.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित क्षेत्रातील (पैसा) १७ संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्त्वावर भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या, सदर शासन निर्णयानुसार तलाठी पद भरती २०२३ च्या अनुषंगाने जिल्हयातील पेसा क्षेत्रातील पदांकरीता प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्ग निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करुन सदर शासन निर्णयातील सर्व सूचना विचारात घेवून त्यानुसार निवड यादीतील पात्र उमेदवारांना दिनांक ०८/१०/२०२४ पर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत महसूल व वन विभागाच्या दि.०५/१०/२०२४ व दि.००७/१०/२०२४ रोजीच्या पत्रान्वये पेसा क्षेत्रातील संबंधित १३ जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे.
३. आता मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १७.११.२०२५ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गाची पदभरती करतांना करावयाच्या कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाने दि. ११.०२.२०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयान्वये सामान्य प्रशासन विभागाने अनुसूचित क्षेत्रातील (पैसा) अधिसूचित १७ संवर्गातील पदांच्या आरक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच मुहदा क्र. ६ य ७ नुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवितांना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवडप्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक ०५.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी, त्यानंतर उर्वरीत रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात यावी. तसेच सदर कार्यवाही मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा वाचिका क्र.२२१०९/२०२३ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील अशा सूचना दिल्या आहेत.
४. सबब अनुसूचित क्षेत्रातील (पैसा) अधिसूचित १७ संवर्गातील पदभरतीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ११.०२.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सुचनांनुसार तलाठी भरती २०२३ च्या अनुषंगाने कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर कराया.
आपला,
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रतः संग्रहार्थ, कार्यासन आस्था-१०
प्रति,
१. सर्व विभागीय, आयुक्त.
२. जिल्हाधिकारी, अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड, ठाणे.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून
क्र. तलाठी-२०२२/प्र.क्र.१९० (भाग-२)/ई-१०
दिनांक : २८ जानेवारी, २०२६
विषय- तलाठी पदभरती सन २०२३ बाबत.
संदर्भ-
१. समक्रमांकाचे दि.१०.०३.२०२५ रोजीचे शासन पत्र
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दि.०२.१२.२०२५
महोदय,
तलाठी पदभरती २०२३ च्या अनुषंगाने एकूण ४७९३ रिक्त पदांकरीता दि.१७.८.२०२३ ते दि.१४.९.२०२३ या कालावधीत टीसीएस-आयऑन कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दि.११.३.२०२४ रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, निवड याद्या व प्रतिक्षा याद्या दि. १४.३.२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
तलाठी भरती बाबत अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दि.४.५.२०२२ मधील परिच्छेद क्र.११ मध्ये निवडसूचीची कालमर्यादा नमूद केलेली आहे. त्यानुसार निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य राहील. त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल, अशी तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार तलाठी पदभरती २०२३ बाबतचा कालावधी दि.१३.३.२०२५ अखेरपर्यंत संपुष्टात आला होता. सबब निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती २०२३ बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता, विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती २०२३ बाबत निवडसूची व प्रतिक्षासूचीचा कालावधी ६ महिने इतका म्हणजेच दि.१३.९.२०२५ पर्यंत वाढविण्यास संदर्भाधिन शासन पत्र दि.१०.०३.२०२५ अन्वये शासन मान्यता देण्यात आली आहे.
४. सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधिन दि.०२.१२.२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार दिनांक ४ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमधील परि.क्र.११ “निवडसूचीची कालमर्यादा” अंतर्गत (अ) मध्ये या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे:-
🙋
👉 तलाठी भरती २०२३ बद्दल अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून 👈
"निवड समितीने तयार केलेली निवडसूची २ वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवाभरतीची जाहिरात देण्यात येईल, त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल, त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य ठरेल. तसेच ही मुदतवाढ निवडसूची तयार करताना ज्या दिनाकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत, त्या पदांपरतीच असेल."
५. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०२ १२.२०२५ राजीच्या शासन निर्णयातील उक्त तरतूद विचारात घेता तलाठी पदभरती २०२३ बाबत निवडसूची व प्रतिक्षासूचीचा कालावधी २ वर्षाच्या कालमर्यादेत्त म्हणजेच दि.१३/०३/२०२६ पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यानुसार राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे जा.क्र. तलाठी भरती प्रसिद्धी पत्रक / ११२७/ २०२३, दि.६.११.२०२३ रोजीचे प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद पदांपैकी रिक्त राहिलेली पदेच सदर वाढीव कालमर्यादेत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
६. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.
आपला,
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून
सह सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रति,
१. सर्व विभागीय, आयुक्त
२. सर्व जिल्हाधिकारी.


