Std 11th 12th Subject Plan Evaluation Framework

Std 11th 12th Subject Plan Evaluation Framework

image 5
Std 11th 12th Subject Plan Evaluation Framework

Std 11th 12th Subject Plan Evaluation Framework

Revised Subject Plan Evaluation Framework
Revised Subject Scheme Evaluation Evaluation plan
Revised subject plan and assessment plan for class 11th and 12th.

इयत्ता ११ वी व इ. १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना.

दिनांक :-०८ ऑगस्ट, २०१९


संदर्भ १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. अभ्यास-२११८/प्र.क्र.२४३/एस.डी.४, दि.९ जुलै, २०१९.


प्रस्तावना-
इयत्ता ९ वी ते इ. १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ. ११ वी व इ. १२ वी करिता या शासन निर्णयान्वये सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

            शासन निर्णय

सन २०१९-२० पासून इ.११ वीसाठी व सन २०२०-२१ पासून इ. १२ वी करिता सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
१) शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इ.११ वी साठी व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इ. १२ वी करिता अंतिम मूल्यमापन हे ६५० ऐवजी ६०० गुणांचे राहील.
२) सद्यस्थितीतील पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या ५० गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल तसेच पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये जल सुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट राहील.
३) लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केले आहे.
४) अंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा राहील यासंदर्भातील नियोजन कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा स्तरावर करण्यात येईल.
५) इ.११ वी ची वार्षिक परीक्षा इ.११ वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व इ.१२ वी वार्षिक परीक्षा इ.१२ वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील.
६) इ.११ वी व इ. १२ वी सत्र तसेच वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळाने संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या/अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित करण्यात येईल.
७) इ.११ वी व इ.१२ मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.
८) राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या/सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.
९) इ.११ वी व इ.१२ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रकारचे किमान २५ टक्के प्रश्न असतील.
१०) इ.११ वी व इ. १२ वी करिता विषय योजना Annexure A प्रमाणे राहील.
११) इ.११ वी इ.१२ वी करिता मूल्यमापन योजना Annexure B व Annexure C प्रमाणे राहील.
१२) इ.११ वी व इ.१२ वी अभ्यासक्रम, विषय योजना, मूल्यमापन योजना यासंदर्भातील माहिती सर्व संबंधितांना मिळावी याकरिता शिक्षकांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन राज्य मंडळातर्फे करण्यात येईल.
१३) इ. ११ वी व १२ वीची विषय व मूल्यमापन योजनेसंदर्भातील सर्व आवश्यक सूचना राज्य मंडळातर्फे सर्व माध्यमिक शाळांना देण्यात येतील.
सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१९०८०८१८०९५९१३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

सह सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क. (२४३/१९)/एसडी-४ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय (विस्तार), मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!