SSC Board Exam 2025 HISTORY AND POLITICAL Question Paper With Answer PDF
SSC Board Exam 2025 HISTORY AND POLITICAL Question Paper With Answer PDF
Maharashtra State Board Exam 2025 SOCIAL SCIENCES (73) HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER-I(M) Question Paper With Answer PDF
Std 10th Exam Feb / Mar 2025 History Political Answer Key
SOCIALSCIENCES (73) HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER-I(M)
(REVISED COURSE)
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र पेपर-१ (म)
Total Marks: 40 एकूण गुण ४०
2015 111 151100
Seat No. बैठक क्र. Time: 2 Hours
सुचना
(1) अकृती प्रोडविणे आवश्यक आहे.
(2) उजवीकडील अंक प्रश्नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात.
(3) प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न/कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न/कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत.
(4) प्रश्न क्रमांक 1(अ) आणि 6 मध्ये संपूर्ण विधाने लिहिणे आवश्यक आहे.
(5) प्रश्न क्रमांक (अ) आणि 8 (ब) मधील संकल्पना चित्रे/कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
(6) प्रश्न 1ला (अ), (ब) व प्रश्न 6वा या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळ लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल,
- (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: 3
(1) जगातील सर्वात प्राचीन संग्राहालय ……………… या शहराचे उत्खनन करताना सापडले
(अ) दिली
(ब) हडप्पा
(क) उर
(ड) कोलकाता
योग्य उत्तर – (क) उर
(2) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ……………… हे होते.
(अ) वसंतराव नाईक
(4)शवंतराव चव्हाण
(क) शंकराचा
(3) संतदादा पाटील
योग्य उत्तर – (4)शवंतराव चव्हाण
(3) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ……………… यांनी केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
योग्य उत्तर – (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : 3
(i) रायगडाला जेव्हा जाग येते – वसंत कानेटकर
(ii) टिळक आणि आगरकर – विश्राम बेडेकर
(iii) साष्टांग नमस्कार – आचार्य अत्रे
(iv) एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर
योग्य उत्तर – (iv) एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर
(2) (i) लिओल्डि व्हॉन रांके – द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
(ii) मायकेल फुको – आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज
(iii)) कार्ल मार्क्स – दास कॅपिटल
(iv) रेने देकार्त – रिझन इन हिस्टरी
योग्य उत्तर – (iv) रेने देकार्त – रिझन इन हिस्टरी
(3) (i) प्रभाकर – आचार्य प्र. के. अत्रे
(ii)दर्पण – बाळशास्त्री जांभेकर
(iii)दीनबंधू – कृष्णराव भालेकर
(iv) केसरी बाळ गंगाधर टिळक
योग्य उत्तर – (i) प्रभाकर – आचार्य प्र. के. अत्रे
(अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन): 4
(1) पुढील तक्ता पूर्ण करा
भारतातील ग्रंथालये शहरे
शहरे ग्रंथालयाचे नाव
कोलकाता → नॅशनल लायब्ररी
दिल्ली → नेहरू मेमोरियल म्युझियम
हैदराबाद → स्टेट सेंट्रल लायब्ररी
मुंबई →लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसाईटी व डेव्हीड ससूनलायब्ररी मुंबई
(2) पुढील संकचित्र पूर्ण करा
‘भारत एक खोज’ मालिकोतून मांडलेल्या घटना
→
→
→
→
(3) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
→महाबळेश्वर
→चिखलदरा
→माथेरान
→लोनावळा
(ब) थोडक्यात टिपालिहा (कोणतेही दोन)
(1) उपयोजित इतिहास
योग्य उत्तर –
उत्तर : (१) एखादा विषय इत्तर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘उपयोजन’ होय.
(२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच ‘इतिहासाचे उपयोजन’ असे म्हणतात.
(३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते
(2) मराठा चित्रशैली
योग्य उत्तर –
इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.
(१) सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.
(२) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.
(३) वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
(४) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलींचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
(3) स्थळ कोश
योग्य उत्तर –
३ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):
(1) फूको यांच्या लेखनाला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे.
योग्य उत्तर –
(१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली,
(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.
(३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
(४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर
(2) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे.
योग्य उत्तर –
(१) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णन इत्यादी साधनांबरोबरच ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
(२) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.
(३) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
(४) बखरींमध्ये तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतातः म्हणून ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
(3) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे.
योग्य उत्तर –
दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद है भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिवस’ म्हणून पाळ जातो. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
प्रश्न :
(1) 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते ?
(2) भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून साजरा केला जातो ?
(3) हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा.
योग्य उत्तर –
(i) उत्तर :- मेजर ध्यानचंद
(ii) उत्तर:- 29 ऑगष्ट
(iii) उत्तर:- हॉकी खेळ हा आपल्या भारताचा खेळ आहे. हा एक साहसी खेळ आहे 29 ऑगष्ट राष्ट्रीय क्रिडा दिवस जाणून साजरा केला जातो. ह्या खेळामुळे आपली बौद्धिक मानसिकस्थिती मजबूत होते. शरीर जर चांगले असेल मन अपोआप चांगले राहते असा खेळाचा नियम आहे.सन १९९२ मध्ये हॉकी संघाने अनेक पदके जिंकली आहेत
प्रश्न ४ (३) पोवाडा म्हणजे काय, हे स्पष्ट करा.
योग्य उत्तर –
(१) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतिपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे ‘पोवाडा’ होय.
(२) पोवाडा हा गदय-पदद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
(३) पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर पोवाडे सादर केले जात असत.
(४) पोवाड्यांतून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रितीरिवाजांचे वर्णन केलेले असते.
(५) लोकजागृती आणि मनोरंजन हे पोवाड्यांचे मुख्य हेतू असतात.
(६) पोवाड्यांत दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हे इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
प्रश्न ४ (४) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा
योग्य उत्तर –
पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार
(१) ऐतिहासिक पर्यटन पर्यटन आणि इतिहास यांचे अतूट नाते आहे; म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाहतच आहे. आपल्या पूर्वजाचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.
(२) भौगोलिक पर्यटन अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे
संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.
(३) आंतरराष्ट्रीय पर्यटन आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
- दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : 2
(1) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ………….. जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
(अ) 25%
(ब) 30%
(क) 40%
(ड) 50%
योग्य उत्तर –(ड) 50%
(2) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ………………….. करण्यात आली.
(अ) जलक्रांती
(ब) हरितक्रांती
(क) औद्योगिकक्रांती
(ड) धवलक्रांती
योग्य उत्तर –(ब) हरितक्रांती
- पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) : 4
( 1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.
योग्य उत्तर – हे विधान बरोबर आहे; कारण-
(१) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देती.
(२) एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.
(३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.
(2) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
योग्य उत्तर – हे विधान चूक आहे; कारण-
(१) लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे, हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.
(२) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.
(३) शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.
प्रश्न ८ (अ) २ कामगार चळवळ.
योग्य उत्तर –
(१) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.
(२) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.
(३) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघटनांची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली.
(४) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.
प्रश्न ८ वा (ब)
(ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतीही एक) : 2
(1) पुढील तक्ता पूर्ण करा :
निवडणूक प्रक्रिया
निवडणूक आयोग (भूमिका)
(1)
(1)
मतदार (भूमिका)
(2)
(2)
योग्य उत्तर –
निवडणूक आयोग (भूमिका)
१. मतदारसंघांची निर्मिती करणे.
२. मतदार यादया निश्चित करणे.
३. निवडणुका घोषित करणे.
४. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे.
५. मतदानाची व्यवस्था करणे.
६. मतमोजणी व निकाल जाहीर करणे,
निवडणूक प्रक्रिया
मतदार (भूमिका)
१. आचारसंहितेचे पालन करणे.
२. प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.
३. मतदान करणे.
(2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने
योग्य उत्तर –
जातीयवाद
धार्मिक तेढ
गरिबी
निरक्षरता