Pre Matric Scholarship Scheme Offline Mode शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्याबाबत

Pre Matric Scholarship Scheme Offline Mode

image 63

Pre Matric Scholarship Scheme Offline Mode

Regarding the implementation of the Prematric Scholarship Scheme offline for the academic year 2024-25.

विषय- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजना offline पध्दतीने राबविण्याबाबत.


संदर्भ- १. शासन पत्र क्र. भासशि-२०२५/प्र.क्र.२९/शिक्षण-१, दि.१२.०३.२०२५


उपरोक्त विषयास अनुसरुन, सन २०२४-२५ या वर्षासाठी सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी शाळांची नोंदणी
आणि विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. तथापि संदर्भिय
शासन पत्रान्वये सन २०२४-२५ साठीचा प्राप्त निधी अखर्चित राहू नये तसेच अनुसूचित जातीचे पात्र विद्यार्थी
शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ साठी offline
पध्दतीने राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यासाठी सैनिकी शाळेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह
भत्ता या योजनेकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण (सर्व) आणि उर्वरित पाच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
योजनांसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित
करण्यात आले आहे.

प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजना अधिक माहिती जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून


तरी सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात याव्यात. ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव प्राप्त करणेकरीता कॅम्पचे आयोजन करुन पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त यांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी मार्च २०२५ अखेर आवश्यक निधीची योजनानिहाय विभागाची एकत्रित मागणी दि.१७.०३.२०२५ अखेर आयुक्तालयास सादर करावी. सोबत – शासन पत्र दि.१२.०३.२०२५ ची छायांकित प्रत



सह आयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

image 64
Pre Matric Scholarship Scheme Offline Mode

क्रमांकः भासशी-२०२५/प्र.क्र.२९/ शिक्षण-१

दिनांक : १२ मार्च, २०२५

विषय : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना Offline पध्दतीने राबविण्याबाबत….

संदर्भ : आयुक्तालयाचे पत्र क्र. सकआ/शिक्षण/मॅट्रीकपुर्व शिष्य/का-४अ/२०२४-२५/५६८ दिनांक २७.०२.२०२५
महोदय,


कृपया उपरोक्त संदर्भाधीन पत्राचे अवलोकन व्हावे.


२. उपरोक्त पत्रान्वये, आपण शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सध्या शिष्यवृत्तींसाठी आर्थिक वर्ष संपण्यास अत्यंत कमी कालावधी राहिलेला आहे, VPDA पद्धतीने राज्य स्तरावर एका DDO कडून तातडीने कार्यवाही होणे शक्य होणार नाही, तसेच शिष्यवृत्ती वितरणासाठी अद्याप परिपूर्ण प्रणाली कार्यान्वित झालेली नाही. त्याचबरोबर या योजनांचे तांत्रिक कामकाज करणेकरीता मनुष्यबळही उपलब्ध नाही. लेखाशीर्ष बदल होण्यास कालावधी लागणार असल्यास प्रतीवर्षीप्रमाणे सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि इ.९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती या दोन योजना वगळून उर्वरित चार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी यावर्षासाठीही आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद यांना करण्यात यावे, अशी विनंती शासनास केलेली आहे.


३. यासंदर्भात सह आयुक्त (शिक्षण), आयुक्तालय, पुणे यांच्याशी चर्चा केली असता संबंधीतांनी उपरोक्त तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने सन २०२४-२५ यावर्षी उपरोक्त सर्व योजना ऑनलाईनरित्या राबविणे शक्य होणार नसल्याने ऑफलाईनरित्या राबविण्यास परवानगी देण्याची त्यानुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद यांना करण्याची विनंती केलेली आहे.


४. सदर बाब तसेच आपण सादर केलेला प्रस्ताव विचारात घेता सन २०२४-२५ साठीचा प्राप्त निधी अखर्चित राहू नये तसेच अनुसूचित जातीचे पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ साठी Offline पध्दतीने राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सबब सैनिकी शाळेत प्रशिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या योजनेकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण (सर्व) यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDO) घोषित करण्यात येत आहे तसेच उर्वरित पाच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद यांना घोषित करण्यात येत आहे.

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
प्रति,
आयुक्त, समाजकल्याण, पुणे
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!