Sports Sub Events Eligible For Player Reservation
Sports Sub Events Eligible For Player Reservation
Sports and their subtypes eligible for Sportspersons reservation
खेळ आणि त्यांचे उपप्रकार खेळाडू आरक्षणासाठी ग्राह्य
The benefit of 5 percent player reservation is applicable to the organized sub-types of the respective sport.
क्र. खेआ/खेळ/उपप्रकार/२०३/२०२५/का-१५/५३६०
दिनांक : स्वाक्षरी खालील
18 NOV 2025
विषय: ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे लाभ संबंधित खेळाच्या आयोजित उपप्रकारांना लागू करण्यासंदर्भात (सन २०२४-२०२५ व २०२५-२६).
नक्की वाचाल –
शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन
खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतरक्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण
संदर्भ: १. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासनपत्र क्र. संकीर्ण-१७१६/
प्र.क्र.१८ (भाग-१)/क्रीयुसे-२, दि. ८ फेब्रुवारी, २०१९.
२. कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासनपत्र क्र.संकीर्ण-१७१६/प्र.क्र.१८ (भाग-१)/क्रीयुसे-२, दि. २३ मार्च, २०२३.
३. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे पत्र क्र. खेआ/शाप/शासन पत्र/प्र.प./२२-२३/का-१५/१७९९, दि.१० जुलै, २०२३.
उपरोक्त संदर्भ क्र. ३ नुसार, मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सन २०२३-२४ या वर्षाकरिता खेळ व त्यांचे उपप्रकार निश्चित करण्यात आले होते. तथापि, यामध्ये केवळ ऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील उपप्रकारांचा समावेश करण्यात आलेला होता.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
संदर्भ क्र. १ च्या शासनपत्रानुसार, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ, बुध्दीबळ, कबड्डी, खो-खो तसेच मल्लखांब या खेळातील उपप्रकार/इव्हेंटस चे आयोजन संबंधित खेळाच्या इतर वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा/चषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये होत असल्यास, अशा उपप्रकारांची यादी दर वर्षी माहे जून पूर्वी निश्चित करून जाहीर करावी व तद्नंतर सर्व उपप्रकार खेळाडू आरक्षणासाठी ग्राह्य धरण्यात यावेत, असे निर्देशित करण्यात आले आहे.
यानुसार, त्या-त्या खेळांच्या राज्य संघटनांमार्फत माहिती मागविण्यात आलेली असून, त्याआधारे व संचालनालयाने त्या-त्या क्रीडा प्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संकेतस्थळ, त्यांची नियमावली इ. बादींचा अभ्यास करुन दि.०१ जून, २०२४ पासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच दि.३१ मे, २०२६ पर्यंत (सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षाकरिता) ५% खेळाडू आरक्षणासाठी ग्राह्य धरण्यात येणारे खेळ आणि त्यांचे उपप्रकार (Sub-Events) खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत
खो खो खेळ संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
वरील खेळांच्या उपप्रकारांची सविस्तर यादी सोबत परिशिष्ट-अ सोबत जोडली आहे.
१. उपरोक्त खेळांच्या निश्चित केलेल्या उपप्रकाराव्यतिरीक्त अन्य खेळ उपप्रकाराचे प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येऊ नये,
२. वरील खेळांच्या निश्चित केलेल्या खेळ उपप्रकारासाठी कोणत्याही प्रकारे आक्षेप असल्यास, आपला आक्षेप desk१५.dsys-mh@gov.in या मेल आयडी वर सप्रमाण नोंदवावा.
३. जे खेळ सांघिक आहेत व ज्या खेळाच्या वजनगट/खेळबाबी आहेत अशा खेळाचे उपप्रकार देण्यात आलेले नाहीत.
४. दि.१० जुलै, २०२३ पुर्वीचे उपप्रकार शासनाने दिलेल्या संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये ऑलिम्पिक स्पर्धा, एशियन
स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशीप या स्पर्धांमध्ये असल्यास, त्या उपप्रकारांना शासनाच्या निर्देशानुसार खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. ५. सोवत जोडलेल्या उपप्रकारांमध्ये आवश्यक असल्यास अथवा नवीन उपप्रकाराचा समावेश असल्यास, तो
देखील सप्रमाण वरील मेल आय.डी.वर कळविण्यात यावा, म्हणजे त्याच्या समावेशाबाबत उचित
कार्यवाही करण्यात येईल.
(मा. आयुक्त यांच्या मान्यतेने) सहपत्र: परिशिष्ट-अ (१३ पृष्ठ)
सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य.

