विविध स्तरावर शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत Player Age Verification Test

Player Age Verification Test

Player Age Verification Test

Kheladu Vay Nishiti

Player age determination

Steps to be taken to determine the age of players

Regarding the steps to be taken to determine the age of athletes participating in school and other sports competitions at various levels

महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठपुणे

क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/वय/कागदपत्रे/२०२५-२६/का-४/४७५२

प्रति,

दिनांक: ०८ ऑक्टोबर २०२५

१. विभागीय उपसचांलक (सर्व),
२. जिल्हा क्रीडा अधिकारी (सर्व),

विषयः विविध स्तरावर शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

संदर्भ:
१. संचालनालयाचे पत्र क्र. क्रीयुसे/एखेसं/स्पर्चा/वय/२०२२-२३/का-४, दि. २७.०४.२०२२
२. भारतीय शालेय खेळ महासंघाचे पत्र दि. २७.०५.२०२५
३. संचालनालयाचे पत्र क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/वय/कागदपत्रे/२०२५-२६/का-४/३९५२

दिनांक: ०१ ऑगस्ट २०२५.

राज्यात, भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा स्पर्धा, सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा तसेच जवाहरलाल नेहरु कप हॉकी स्पर्धांचे आयोजन विविध स्तरावर करण्यात येते, सदर स्पर्धांचे आयोजन हे ११, १४, १५, १० व १९ वर्षे वयोगटामध्ये करण्यात येते.

हे हि वाचाल Documents Proof of Age are Mandatory for Players
शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना वयाच्या पुरावा म्हणून कागदपत्रे अनिवार्य करण्याबाबत.
दिनांक: १५.१०.२०२४
संदर्भः संचालनालयाचे दिनांक २७.०४.२०२२ चे पत्र
परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून

सदर स्पर्धमध्ये अधिक वयाचे खेळाडू, बय कमी केलेली कागदपत्रे तथा वयाबाबतचे पुरावे सादर करुन सहभागी होत असल्याच्या तक्रारी संचालनालयास प्राप्त होत होत्या, तसेच काही खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धा व एकविध खेळ संघटना पुरस्कृत क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या जन्मतारखा धारण करुन खेळल्याचे संवालनालयाच्या निदर्शनास आले होते. यास्तय संदर्भिय पत्रानुसार, संबधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला, खेळाडूच्या १ ल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत व आधारकार्ड ही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत.

सदर परिस्थितीत काही खेळाडूंचे पालक अज्ञान असल्याने अथया संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षे असेपर्यंत त्याचा जन्मदाखला काढू शकलेले नाहीत, तसेच काही खेळाडू पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यन्नत विविध कारणास्तव क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी सादर करु शकलेले नाहीत यामुळे विरोधी सघ तथा खेळाडूंकडून संबंधित खेळाडूंस तथा संघास स्पर्धेमधून बाद करण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे असे खेळाडू योग्य वय असूनही शालेय स्पर्धेपासून वंचित राहीले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन शालेय व इतर क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे अनिवार्य करण्यात येत आहेत.

१. संबंधित खेळाडूचा शासकीय विभागाने वितरीत केलेला भुज जन्मदाखला,

२. संबंधित खेळाडूचे मुळ आधारकार्ड

३. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची साथथात अनिवार्य असून ती नसल्यास भारतीय शालेय खेळ महासंघाने निर्देशित केलेली वय निखितीसातीची Age Verification Test.

खालील नमूद परीस्थितीमध्ये सहभागी खेळाडूंना मुळ जन्मदाखला तसेच पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत या कागदपत्रांच्या अनिवार्यतेमध्ये शिथिलता असेल, तथापी अशा सखेळाडूंना वच निखितीसाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने निर्देशित केलेली वय चाचणी (Age Verification Test) अनिवार्य राहील.

१. संबंधित खेळाडूने जर परदेशातील शाळेमधून अथवा इतर राज्यामधून महाराष्ट्र राज्यातील शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास.

२. संबंधित खेळाडू जर मुक्त शाळेतून राज्यातील शाळेमध्ये प्रवेश घेतला असल्यास,

३. संबंधित खेळाडूचे पालक ऊसतोड कामगार, वीट मट्टी कामगार किंवा तत्सम तसेच मटके, स्थानांतरीत आयुष्य जगत असल्याचा पुरावा सादर केल्यास.

सन २०२५-२६ पासून भारतीय शालेय खेळ महासंघाने, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना वयनिश्चितीसाठी Age Verification Test अनिवार्य केली असून, त्याशिवाय खालीलप्रमाणे नमूद परिस्थितीत स्पर्धा आयोजक कार्यालय संबंधित खेळाडूस स्पर्धा आयोजनाच्या कोणत्याही स्तरावर Age Verification Test करण्याचे निर्देश देऊ शकतात.

१. शिक्षण विभागाच्या मान्यतेने एखाद्या खेळाडूची जन्मतारीख बदलून व्य कमी केलेले असल्यास.

२. स्पर्धेत सहभागी खेळाडूच्या बोगस जन्मतारखेचा पुरावा तक्रारदाराकडून प्राप्त झाल्यास.

३. अनिवार्य कागदपत्रांची पुर्तता न केल्यास.

४. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत नसल्याबद्दल शिथिलता मिळाली असल्यास परंतु शिथिलतेसंबंधी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्यास.

वरील नमूद परीस्थितीत Age Verification Test करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यासंबंधी प्रक्रिया तातडीने पुर्ण करुन त्याचा अहवाल स्पर्धा आयोजक कार्यालयांस पुढील स्तरावरील स्पर्धा कार्यक्रमाच्या किमान २ दिवस सादर करावयाचा आहे. अशा वयनिश्चिती चाचणीमध्ये तसेच बोगस कागदपत्रांच्या आधारे संबंधित खेळाडूचे वय, स्पर्धेतील सहभागी वयोगटापेक्षा जास्त असल्याची खात्री झाल्यास आयोजक कार्यालयांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

४. वयचाचणी अथवा बोगस वयनिकिती कागदपत्रांच्या आधारे अधिक वयाचा आढळून आलेला खेळाडू जर वैवक्सिक खेळाप्रकारांतील असेल तर अशा खेळाडूस स्पर्धेतून बाद ठरवावे.

VI. वयचाचणी अथवा बोगस वयनिश्विती कागदपत्रांच्या आधारे अधिक षयाचा आढळून आलेला खेळाडू जर सांधिक खेळ प्रकारांतील असेल तर असा खेळाडू सांधिक स्पर्धेतील प्रत्यक्ष सामन्यात खेळला असल्याची खात्री झाल्यास, त्याच्या पूर्ण संघास स्पर्धेतून बाद उरवावे तसेच असा खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात खेळला नसल्यास अशा खेळाडूस स्पर्धेतून बाद करावे व उर्वरीत संघास स्पर्धेत सहभागी करून घ्यावे.

VII,.वरीलप्रमाणे नमूद परीस्थितीत स्पर्धेतून बाद केलेल्या खेळाडूंनी यापुर्वीच्या स्पर्धामध्ये चुकीच्या जन्मदिनांकाच्या आधारे शालेय व इतर स्पर्धेत सहभागी होऊन प्रमाणपत्र मिळविली असल्यास त्याची खात्री करुन सर्व स्तरावरील प्रमाणपत्रे रद्द करावीत.

V. शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत वयनिश्चितीसाठी बोगस कागदपत्रे तयार करून त्याआधारे स्पर्धेत सहभागी झाला असल्याचे सिध्द झाल्यास संबंधिताविरुध्व कायदेशीर कारवाई करावी.

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजक कार्यालयांनी वरील नमुद निर्देशित कार्यवाहीची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे होईल याबाबतची दक्षता घ्यावी.

(मा. आयुक्त महोदयांच्या मान्यतेने)

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

उपसंचालक

क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीसाठी सविनय सादर,

१. मा. अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रीडा (अ.का.), मंत्रालय मुंबई

२.मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, (सर्व) (जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत)

Player Age Verification Test
Player Age Verification Test

Leave a Comment

error: Content is protected !!