Five Percent Reservation for Sportspersons for Jobs in Government Semi Government And Other Sectors
Five Percent Reservation for Sportspersons for Jobs in Government Semi Government And Other Sectors
5% reservation for sportspersons for jobs in government, semi-government and other sectors
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः खेआक्ष-१७१९/प्र.क्र.१७६/क्रीयुसे-२ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय विस्तार भवन,मुंबई
दिनांक: २० जून, २०२४
वाचा:
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/ क्रीयुसे-२, दिनांक ०१ जुलै, २०१६
२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः संकीर्ण-१७१७/प्र.क्र.३९/ क्रीयुसे-२, दिनांक २७ मार्च, २०१७
प्रस्तावना :-
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाबाबतचे सुधारीत धोरण संदर्भ क्र.१ येथील दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये विहीत केले आहे. याअनुषंगाने संदर्भ क्र.२ येथील दिनांक २७/०३/२०१७ च्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयामधील अ.क्र.३ (अ) (iv) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ येथील शासन निर्णयातील काही तरतुदींबाबत सुधारीत आदेश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०१/०७/२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र. (३) स्पर्धाविषयक अन्य अटी व शर्ती अ) (ii) (iv) (v) (vi) खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत- (अ) (iii) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन भारतीय ऑलिम्पिक समितीची मान्यता/संलग्नता असलेल्या संबंधित खेळाच्या राष्ट्रीय फेडरेशनने/संघटनेने केलेले असावे.
(iv) राज्य क्रीडा अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनची मान्यता/संलग्नता असलेल्या संबंधित खेळाच्या राज्य संघटनेने केलेले असावे. तसेच ज्या खेळांच्या नोंदणीकृत राज्य संघटनांना त्यांच्या अधिकृत राष्ट्रीय संघटनांनी मान्यता/संलग्नता दिलेली असेल, तसेच सदर खेळांच्या राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशने मान्यता/संलग्नता दिलेली असल्यास, अशा राज्य संघटनेच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय प्राविण्यप्राप्त खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी संबंधित राज्य संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता/संलग्नता हा निकष अनिवार्य राहणार नाही.(v) एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा असल्यास स्पर्धा काळात सदर राष्ट्रीय संघटनेस इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची (IOA) मान्यता/संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील.
(vi) एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राज्य स्पर्धा असल्यास स्पर्धा कालावधीत सदर राज्य संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची (MOA) मान्यता/संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील.
सदर शासन निर्णय हा ५% खेळाडू आरक्षणाअंतर्गत खेळाडूंद्वारे संबंधित उप संचालक (क्रीडा) यांचेकडे पडताळणीसाठी (Verification) केलेला अर्ज, सह संचालक यांचेकडे केलेले प्रथम अपील, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्याकडे केलेले द्वितीय अपील या प्रकरणांना तसेच क्रीडा संचालनालयाकडे पुनर्पडताळणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांनादेखील लागू राहील.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०६२०१७२७४३९६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(ज्ञानेश्वर आव्हाड)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन